Posts

Showing posts from October, 2013

कळसुबाई-एक सर्वोच्च अनुभव - (खंड-२)

Image
    भाग १ साठी  चालू होती मध्ये मध्ये लोखंडी शिड्या मार्ग सोपा करत वर घेऊन जात होत्या. विक्रांत सुहास सुरज विलासदादा  आबा नेह्मीप्रमने आघाडीवर होतेच. राहुल न. व मल्हार (शिवकवी) यांची चौफेर फोटोग्राफी चालू होतीच…राजू सर शांतपणे सर्व एन्जोय करत होते. मधेच विठ्ठल कोणत्यातरी कड्यावर वा एखाद्या उतरावर pano च्या नादात असलेला दिसायचा. भलताच हुरहुन्नरी पोरगा तो ;* ;* :* :* :*मी संतोष संकेत निलेश राहुल मध्ये मध्ये बसत उठत हसत मार्गक्रमण करत होतो . न most imp म्हणजे आम्ही कळसुबाई चा ला कळस गाठण्याआधीच कल्पेश भाऊंच्या गमतीजमतीने कळस गाठलेला… खूपच खेळकर व्यक्तिमत्व. त्यांच्या गमती जमती पाहत आम्ही एका टप्प्यावर पोहचलो तिथे एक छोटेखानी हॉटेल व एक बावडी होती जर आराम करून वाट धरली.. धुक्याची दुलई पांघरून शिखर अजूनही अदृश्यच होते. मधूनच पावसाची हलकी सर येउन गेली, जाता जाताच सुहास सोबत ''महाराष्ट्राचा अद्यगिर्यारोहक कोण?'' या विषयावर परिसंवाद करत असतनाच आम्ही शिखराच्या अगदीच नजीक आल्याचे लक्षात आले सुहास म्हणजे एक स्थितप्रज्ञ माणूस('स्थितप्रज्ञ' साठी शब्दकोश पाहावा ). इतक्या

कळसुबाई एक सर्वोच्च अनुभव (खंड-१)

  २८/०९/१३ कळसुबाई - एक सर्वोच्च अनुभव           रोजच्या comfort zone मधून बाहेर पडून एक दिवस निसर्गात भटकणे हे स्वत;ला reboot करण्याचा एक उत्तम मार्ग. यामध्ये प्रत्येकाचे आवडी वेगळ्या, कोणाला समुद्रकिनाऱ्याची शांत गुंज आवडेल तर कोणाला फेसाळणारे धबधबे प्रिय तर काहीना घाटमाथे तुडवण्यात मजा, काहीना गडकिल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, मनाचा व शरीराचा कस पाहणारी गिरिशिखरे खुणावत असतात या प्रकारातला मी एक अवली. अशा मुशाफिरीत आनंदाने मनाची ओंजळ काठोकाठ भरत असते काहीना सदेह जाता नाही आले तरी एखाद्याचे अनुभव वाचून ते अनुभवत  असतात अशा माझ्या मित्रांसाठी शब्द्क्रीडेचा एक केविलवाणा प्रयत्न…कळसुबाई शिखर हे मला पाचवी पासूनच साद घालत होते माझ्या या इच्छेला गडवाट परिवारामुळे मूर्त स्वरूप मिळाले ते २९.०९.१३ रोजी सकाळी ११:३० वाजता. माझ्या या भ्रमंतीचा एक धावता आढावा म्हणून हा लेखप्रपंच (धावता आढावा असल्याने अनावश्यक नोंदी टाळल्या आहेत)                अखेर खुप दिवसाची प्रतीक्षा संपून, जाण्याची रात्र उजाडली (???!!!) सुहास च्या नियोजनानुसार आम्ही दादर चित्रा सिनेमा येथे जमलो. मला जरा उशीरच झाला(नेहमीप्रम