Posts

Showing posts from July, 2015

हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.

Image
हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.  टंक लेखनाविना बरीच हस्तलिखिते पडून होती आज लक्ष गेले न इरीलाच पेटलो…घेतलाना भो टायपायला. ;) असो,  सह्याद्रीच्या मुख्य रंगांपासून थोडी वेगळी झालेली हरिश्चंद्र- बालाघाट रांग, यामध्ये असणारा हा गड व तो सर्व भटक्यामध्ये  प्रसिद्ध करणारा सह्याद्रीने प्रसवलेले रौद्र भीषण अस सौदर्य प्रदान झालेला कोकणकडा ,  महाराष्ट्रतील सर्वोच्च शिखरांपैकी एक असे तारामती शिखर. या सर्व गोष्टीं पाहण्याची, जगण्याची एक अनामिक ओढ आंतरिक ओढ इच्छा नसेल असा गिर्यारोहक मिळणार नाही. माझ्याही मानगुटीवर हे भूत होताच कि.!!!! मध्ये मध्ये google map वर satellite mode  ताकाने तहान भागवत होतोच. आणि याच धामधुमीत आबासाहेबांचा मेसेज आला "गडवाट आयोजित हरिश्चंद्रगड"  येतोय का ??? योग जुळला. मी निघालो. !!             या गडाला बुरुज, तटबंदी, तोफा यासारखी दुर्ग सौदर्याची आभूषणे दिसणार नाहीत पण याचा इतिहास मात्र २००० वर्षापुर्वीपर्यंत घेऊन जातो. राजा हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास, चांगदेव या ऐतिहासिक लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या गडाला लाभली आहे.        गडाचा विस्