Posts

Showing posts from January, 2016

अपरिचित अदगाव बीच

Image
अपरिचित अदगाव बीच. मनुष्याला पर्यटनाची हौस भारी !! अलीकडच्या काळात माणसाचा मानसिक त्रास वाढला व त्याला अनुसरून पर्यटन पण वाढले . पण आपण पर्यटनावर का निघतो ??रोजच्या धावपळीतून, सिमेंटच्या जंगलातून , बजबजपुरीतून , गर्दीतून बाहेर पडून शांततेचे एकांताचे क्षण शोधायलाच ना ? पण आपण जातो तिथे तर एवढे पर्यटन जोमात असते कि वाटते गाड्या आपली ती मुंबापुरी बरी !!! ;) त्यावर उपाय म्हणजे अलीकडेच बहरास येत असलेले ग्रामीण पर्यटन, काही अपरिचित किनारे, दुर्गम भागातील गडकिल्ल्यांच्या पायथ्याची खेडी हे चांगले पर्याय ठरू शकतात. असाच परवा एका अपरिचित ठिकाणी जाण्याचा योग आला त्याबद्दल जरासं… सूर्यास्त अस्ताला जाणारा सुर्य टिपताना          अदगाव चौपाटी एक नितांत सुंदर ठिकाण. विस्तीर्ण समुद्र किनारा, छोटास गाव, नारळी-फोफळीच्या बागांनी वेढलेलं टिपिकल कोकणी बाज असलेले हे गाव दिवेआगर पासून १० किमी उत्तरेला आहे. मी व संतोष दोघेच बाईक वरून निघालो, मुंबई पासून व पुण्यापासून २०० किमी अंतर. सारथ्य संतोष कडे दिल्याने मी मागे निवांत होतो. त्याचाच फायदा म्हणजे रातोडी गाव च्या हद्दीत रस्त्याचे काम चालल्याने काह