Posts

Showing posts from September, 2016

झपाटलेला ट्रेक

Image
झपाटलेला ट्रेक  जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता.  तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस  मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही.          शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला  व सरळ घनगड ला गेलो. दुपारी घनगडावरून समोर सुधागड पाहत न्याहारी सोडली तर उजवीकडे तैलबैला रात्री मुक्कामाला खुणावत जो मुक्काम सुधागडावर होता. संध्याकाळी तैलबैला गावात मुक्काम करून सकाळी निवांत पणे सवाष्णीकडे निघाल. मळभ भरून आलेले. एकटाच भटकत होतो भुतासारखा रानोमाळ.  घाट उतरणीला जरा एका झाडाखाली गार सावलीला बसलो. १० मिनिटासाठी आडवा झालो न तब्बल २ तासांनी उठलो. भयंकर गाढ झोप. दचकून उठलो घड्याळ पाहिलं ३ वाजलेले, वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. माझी होती कि वातावरणाची माहिती नाही. उरलेला घ

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा

Image
दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा      जुलै मधील  एक रविवार, बाहेर मुसळधार पाऊस चालूय, गाडी काढून कुठेतरी नवीन ठिकाणी जाण्याचे वेध लागलेत. साम्याने उत्तर कोकणातील एक मजबूत किल्ला सुचवला , उत्तर कोकणात जायचे तर प्रचंड रहदारीचा सामना व त्यामध्ये पाऊस तर आणखी मंद गतीचा प्रवास. इति- योगेश आलेकरी.  पश्चिम-मध्य महाराष्ट्राकडे माझा कल. अखेर सरतेसमयी सम्याच्या म्हणण्याप्रमाणं उत्तर पश्चिम किनारपट्टीवर लक्ष ठेऊन असलेला एक भक्कम डोंगरी किल्ला निश्चित झाला व आम्ही निवांत पणे गाडी हाकत निघालो नवी मुंबई - ठाणे - घोडबंदर - संजय गांधी अभयारण्यातून पलीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर आलो.       एका प्रतिष्ठित लेखकाचे पुस्तक सोबतीला होते त्यातील चुकीच्या नकाशानुसार चुकीच्या फाट्यावर गेलो. स्थानिकांकडून योग्य माहिती मिळाली किल्ल्याकडे जाण्यासाठी, पण तोपर्यंत ४० किमी विनाकारणच भरकटणे झालेले. पुस्तकात दिलेला रस्ते मार्ग चुकीचा निघाला पण ट्रेन ने जाण्यासाठी दिलेला योग्य ,जो कि आमच्या कामाचा नव्हता. शोधमोहिमेत या पाऊसामुळे वैतागलो होतोच . शिरसाट फाट्यावर उभे होतो बाजूलाच एक हॉटेलवाला मस्त कांदा भजी काढत ह