Posts

Showing posts from November, 2016

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

Image
।। भटकंतीची पूर्व तयारी ।।                                               प्रागैतिहासिक काळात शेतीचा शोध लागला आणि माणूस भटकंती सोडून स्थिर झाला, पण प्रगत काळात मानवाला पुन्हा भटकंतीचे वेध लागले. या मधल्या काळात भटकंती या विषयामध्येही बरीच स्थित्यंतरे झाली व भटकंती किंबहुना ट्रेकिंग हा शब्द परवलीचा झाला किंवा हा एक छंद म्हणून नावारूपास आला. निसर्गापासून दूर गेलेला मानव या निमित्ताने पुन्हा निसर्गाकडे वाळू लागला, यातून आनंद मिळवू लागला. आता भटकंती करणे म्हणजे डोंगर, दऱ्या, पर्वत, नदी, नाले ,गावे, शहरे, विविध ठिकाणे, प्रांत सर्व सर्व आले. पैकी आपण शहरी किवा ग्रामिण जीवनास रुळलेली मंडळी तेव्हा इतर ठिकाणी भटकायचे तर काही नियम पूर्वतयारी मर्यादा यांचे हि अवलोकन हवे. नाहीतर आनंदावर विरजण पडू शकते ना! तर इथं आपण भटकंतीची पूर्वतयारी या विषयावर व फक्त याच विषयावर बघणार आहोत.                             आता इथेही भटक्यांचे २ भाग पडतात पहिला भटकंतीतून इतिहासाकडे वाळलेले तर दुसरं इतिहासातून भटकंतीकडे वाळलेले किंवा इतिहासाच्या शोधात भटकंती करणारे म्हटलं तरी चालेल या इतिहास भ