Posts

Showing posts from 2017

सफर मेघालय

Image

सिक्कीम ची सैर

Image
बकथान्ग धबधबा सिक्कीम ची सैर  खूप दिवसाची पूर्वांचल भटकंतीची इच्छा पूर्ण होणार होती, ऑगस्ट २०१६ कोलकाता येथून दुचाकीवरून सुरु झालेला प्रवास पश्चिम बंगाल, असम, मेघालय, त्रिपुरा, मिझो, अरुणाचलप्रदेश करून आता वेध लागलेले ते सिक्कीम या राज्याचे. भूतान देशाला वळसा घालून असम, बंगाल प्रांतातून प्रवास करून सिक्कीम जावे लागणार होते. प्रचंड वादळी वारा व पाऊस यामुळे प्रवासाचा १८ वा मुक्काम अनपेक्षितरित्या धुपगुडी येथे पडला. ७ सिस्टर्स गटात अलीकडेच समावेश झालेले हे एक छोटंसं पण नितांत सुंदर राज्य आता  माझ्यापासून फक्त १२८ किमी दूर होतं. १६४२ मध्ये फूंटसोंग नामग्यालने नवे राज्य स्थापन केले म्हणून मग याचे नाव नवे घर किंवा राजवाडा म्हणजेच सिक्कीम. सिक हिम अशी संस्कृत मध्ये संज्ञा. तर तिबेटी लोक या भूमीला भाताचे कोठार म्हणून ओळखतात.             तब्बल ४५०० किमी प्रवासात सोबत केलेली होंडा शाईन आता हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सिक्कीम साठी सज्ज झालेली. भल्या पहाटे धुपगुरी सोडल व मायनागुरीतुन गाडी उत्तरेला गोरूमारा अभयारण्यातून धावू लागली, हत्ती व बिबट्यांसाठी ओळखले जाणाऱ्या या जंगलात अनेकठ

आनंदभूमी भूटान (भाग -१ )

Image
                                                       आनंदभूमी भूटान (भाग -१ )            भारत आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये आपले इवलेसे सांस्कृतिक व भोगोलिक अस्तित्व टिकवून असलेला एक सार्वभौम देश भूटान . स्थानिक लोक भूतान ला ' द्रुक युल ' संबोधतात म्हणजे ड्रॅगनचे घर. देशाचा जवळपास सर्वच भूभाग हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे नीसर्गिक साधनसंपत्तीची नुसती रेलचेल. हिमालयाच्या दक्षिण उतारावरीती  मध्यम  उंचीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या नितांत सुंदर देशाला भेट देण्याचा योग नुकताच जुळून आला तो मेघालय ते मुंबई या आमच्या दुचाकी प्रवासाच्या निमित्ताने भुटानचीही भटकंती होऊन गेली . मेघालयातील वृक्षराजीतून लपंडाव खेळत खासी टेकड्या उतरत जाणाऱ्या रस्त्याने आम्हाला आसामच्या  सपाट मैदानी प्रदेशात आणून सोडले. मी व महेश आणि आमची बुलेट आता भुटानच्या दिशेने धावू लागली. ब्रम्हपुत्रा नदीचे विशाल  पात्र डाव्या बाजूला तर उतुंग हिमालय उजव्या बाजूने क्षितिजावर करवती प्रमाणे आपली गिरिशिखरे आकाशात खुपसून बसला होता. या निसर्गरम्य वातावरणात कधी फूंटशोलींग आले कळलेच नाही. ब्रह्मपुत्रेवरील