Posts

Showing posts from February, 2017

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

Image
माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )          आजमितीस जी काही फिरण्याची माझी आवड जोपासलीय त्याची पाळे मुळे अगदी थेट शालेय जीवनात जातात, प्रवासाचं भाग्य तस खूप लहानपणापासूनच लाभलेलं मला. कारण हि तसच, आपले लाड जिथे सर्वाधीक पुरवले जातात असे नातेवाईक  मामा व आत्यांची गावे ७० किमी च्या परिघाच्या बाहेर. त्यामुळे लांबचा (त्यावेळी हा लांबचाच ) प्रवास पप्पांसोबत घडायचाच. पाहत गेलो. शिकत गेलो. खेडे गावातील पार्श्वभूमी असली तरी आमच्या गावाला डोंगराचं भाग्य लाभला  नव्हतं ती कसूर भरून काढली ती जवळील च ३ किमी वरील तुकाई देवी डोंगराने. प्राथमिक शाळेत असताना तुकाई देवीच मंदिर व डोंगर आणि त्या डोंगरात असणारी गुहा हे उत्सुकतेचे विषय असत.         हे झालं कौटुंबिक. पण माझा पहिला विनाकौटुंबिक प्रवास घडला तो इ. ५ वी मध्ये. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने. तर आपण आपण आत्ता त्या दिवसाचा धावता आढावा तब्बल १७ वर्षांनंतर घेणार आहोत. आमची शाळा श्री मुकुंदराज विद्यालय शाळगांव         तर झाले असे कि, इ.४ थी पास झाल्यानंतर समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्यान परंपरेला अनुसरून मला इ. ५ वी मध्ये घालण्यात आले. गाव