बदलाचे वारे

बदलाचे वारे. वयाच्या 19 व्या वर्षी, मी 2009 ला मुंबई ला गेलो, कॉलेज, जॉब, बिजनेस हे सर्व सेट करण्यात 10 वर्षे कशी गेली कळलं ही नाही. या काळात चार दोन महिन्यांनी मी गावी यायचो पण गडबडीत असायचं सर्व. 4 दिवसांत परत जोखड खांद्यावर घ्यायला मुंबई ला रवाना. आता 4 महिने गावी आहे. कोरोनामुळे सर्व जग ठप्प आहे, कोरोनाने सर्वांची वाट लावलीय. सर्वांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. मी पर्यटन व्यवसायात, आमच्या फिल्ड चे तर सर्वात जास्त आणि दूरगामी नुकसान झालेलं आहे. लाखोंचं नुकसान भोगून ही कोरोनामूळे मला 4 महिने निवांत जगता आले म्हणून कोरोना ला मनाच्या एका कोपऱ्यातून थँक्स म्हणणारा मीच असेल. कोणीही ठरवून असे 4 (किंवा 5 6 ही) महिने सर्व व्याप सोडून आयुष्यात कधीच थांबणार नव्हता. निवांतपणा अनुभवणार नव्हता. कोरोना ने सक्ती ने ते दिलंय. वाईटातून चांगले. या 4 महिन्यात मी खूप निरीक्षण केले, गावाचे, गावातील लोकांचे, समाजातील बदलाचे, निसर्गाचे, त्यांच्यातील बदलाचे, पशुपक्षी यांचे. शेती चे. तर मी आज शेती मधील बदल अनुभवलेले आणि निसर्गचक्र कसं बिघडले त्यावर केलेलं निरीक्षण लिहत आहे.