Thursday, 23 October 2014

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा…

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा… 

कुणीतरी ईमेल केले होते… जसेच्या तसे इथे पोस्ट 
करतोय. ज्याने कुणी लिहिले आहे 
त्याच्या निरीक्षणशक्तीला दाद द्यायला हवी… 

१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच 
काहीना काही कीडे केलेले असतात . 
त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल 
मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स 
असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत 
त्यांना मुली असे म्हणतात 
२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले 
किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही 
३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे 
* सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात 
चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत 
पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap 
किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर 
अडकवलेली असते. 
* शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब 
फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , 
Bombay Natural History Society चे 
कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले 
टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज 
आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात 
अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम 
अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच 
नवखा असल्यास भारी बूट 
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर 
उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट 
…काही ट्रेकर्सउघडे नसतात त्यांना मुली असे 
म्हणतात 
४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे 
* सोमवार ते शुक्रवार सकाळ: 
आपापला धंदा नोकरी व्यवसाय …नाईलाजाने. 
* शुक्रवार रात्र: CST 
स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली … ही trek 
साठी भेटण्याची जागा. 
* शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, 
कसारा, इ. इ. S T stand 
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: 
कुठल्यातरी गडावरील केव्ह 
५.अन्य विशेष लकबी: 
* हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर 
असतात , पण ९० % वेळा दुसर्या club 
बरोबरट्रेकला जातात 
* ट्रेकला वा शहरात 
कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत 
नाहीत …. साधी गोळी जरी खाल्लीतरी कागद 
व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . 
कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . 
पणकिल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + 
वायु प्रदुषण जरुर करतात 
त्यातही त्यांची फारशी चूकनसते . 
रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, 
दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते 
* बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, 
अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, 
पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी 
* यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , 
एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ 
सैकमध्येप्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, 
कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, 
तिच्यात छोटीडबी , तिच्यात 
कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी 
यांचा wastepouch ही एक धमाल चीजअसते : यात 
caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत 
जगातील काहीही अफलातून गोष्ट 
असतेएका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ 
A बघीतला होता आता बोला सैक 
सुद्धा अशी सुरेखभरतील की पाहत रहावं . 
६.खाण्या पिण्याच्या सवयी: 
* कशालाही नाही म्हणणार नाहीत हवे ते 
हक्काने मागून घेणार 
* काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून 
घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून 
खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी 
* पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील 
पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . 
बाटलीचेझाकण उघडून बाटलीच्या तोंडावर 
डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे 
आणिथोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार 
कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही 
७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने: 
* खणखणित आवाजात पोवाडे गाणे 
* जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे 
* बैटिंग ला जाणे 
८.यांची दैवते: 
* offcourse शिवाजी महाराज 
* रायगडचा जगदीश्वर 
* हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन 
गडचा अमृतेश्वर इ . इ . 
९.यांची तिर्थस्थळे: 
* राजमाचीचा तलाव 
* बाण चा ब्लू लगून 
* नाणे घाटातील केव्ह 
* कोंकण कडा इ . इ . 
आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं 
एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते 
त्याचप्रमाणेप्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू 
इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक 
कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न 
असते 
१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज 
* यांना मुली आवडत नाहीत 
काही म्हणी आणि वाक्प्रचार : 
* खाईन तर तुपाशी नाहीतर……… adjust करेन 
* वाट पाहीन पण एस टी नेच जाईन 
* केव मध्ये “आला वारा गेला वारा” तो कुणाचा सोयरा 
* An alive ordinary rock climber is always better 
than an excellent dead rock climber !!! 

Tuesday, 7 October 2014

ट्रेकर्सचे वाक्प्रचार...

आमच्या भटकंतीमध्ये काही वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, ज्यांमुळे ट्रेकला रंगत चढते. त्यातले काही जसे आठवले तसे इथे देत आहे. आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे.

१. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे
२. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे.
३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे.
४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती.
५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.
६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे.
७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे.
८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे.
९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे.
१०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो).
११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे.
१२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे.
१३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे.
१४. मश्रूम ब्रेक: २ मिनिटांसाठी आडोशाला जाणे. कुत्र्याची छत्री आठवून पहा, समजेल हा वाक्प्रचार.
१५. वाघ मारायला जाणे: १५-२० मिनिटांसाठी आडोशाला जाणे. ’गाडी सुटणे’चा समानार्थी.
१६. ससा मारायला जाणे: मश्रूम ब्रेकला पर्यायी वाक्प्रचार.
१७. बायोडायव्हर्सिटीला हातभार लावणे: मश्रूम ब्रेक, गाडी सुटणे, वाघ मारायला जाणे यांसाठी एकत्रित वाक्प्रचार.
१८. टोटल ’लागणे’: खूप हाल होणे.
१९. पाय घसरणे: घसरून पडणे. पण पडता पडता सावरणे.
२०. तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.
(पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.)
२१. भैसटणे: अतिउत्साहाने किंवा खूप थकल्यामुळे वेडे चाळे करणे.
२२. पोटातल्या कावळ्यांचे हत्ती होणे: फार भूक लागणे.
२३. बातम्या खाणे: गडावर किंवा गुहेत पोचल्यावर घरुन किंवा येताना रस्त्यात घेतलेल्या वडे, पोळ्या, पराठे यांवर पेपरची शाई उमटते. पण ते तसेच खाणे.
२४. ढील देणे: जुन्या ट्रेकच्या आठवणी फारच (जरा जास्तच) रंगवून सांगणे.
२५. घरी यायला थोडासा उशीर होणे: घरी पोचायला रात्रीचे १२:०० + होणे.
२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).
२७. रोबो होणे: ट्रेकनंतरच्या दुसऱ्या दिवशी पाय फार दुखुन वाकवता न येणे.

तुमच्याकडे आणखी खजिना असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.

[वरील मजकूर कॉपी पेस्ट केलेला आहे ]

Saturday, 11 January 2014

सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग - २

बरीच पायपीट झाल्याने भुकेने सार्वजन व्याकूळ झालेले. अन् जेवणाचा मेन्यु पण भन्नाट होता चपाती, टोमाटोची व बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, पापड, लोणचे व महाभयंकर असा हिरव्या मिर्चीचा ठेचा बस् !!!!! भुकेचा तडाखा एवढा मोठा होता कि, अर्धे पोट भरल्यावर सर्वांच्या संवेदना जाग्या झाल्या व ठेच्याची जहालता जाणवली. हाsss हुssss श्श्शssss हुश्यss अशा उद्गारांनी गाझाब माजवला. डोळे तोंड नाक पाणीदार झालेले ;) त्या धुमश्चक्रीत ठेच्याची झळ बसलेल्यान्साठी दोन ओळी -                                                    
                   भाजी एवढा ठेचा
                   कधीच खायचा नसतो
                   बिघडलेल्या सिस्टीम चा दोष
                  वाढणाऱ्यावर लादायचा नसतो !!

   हालचाली मंदावल्या होत्यच. घासांची वारांवारिताही न्यूनतम पातळीवर स्थिरावली होती, इतक्यात राजू सर दत्त म्हणून उभे राहिले अन् तब्बल अडीच किलो पेढे बाहेर काढले व वाटप सुरु केले. ठेच्याच्या आगीवर पेढ्याची फुंकर  मनाला दिलासा देणारीच ठरली राजू सरांचे पेढ्या पेक्षा गोड शब्दात कौतुक करून तो रसभरीत भरगच्च कार्यक्रम आटोपून गडाच्या शिखराकडे कूच केली. वाटेतच एक ३०×२० ची बंदिस्त इमारत लागली. गडावरील एकमेव छत असलेली व राहण्यायोग्य वास्तू. जाता जाताच राजू सारणी छायाचित्रणातील काही बहुमुल्य कानमंत्र  दिला. संक्या खुश. अन् तसाही दिवसभर संक्याचा DSLR व रोहिणीचा दुबईचा कॅमेरा यांचीच चर्चा होती. असो.गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलोही आम्ही खुओ थंड वारा झोंबत होता अंगाला. ११३० मीटर उंची असलेला हरिहर, इथून सह्य्द्रीची खूपच उदात्त रूपे दाखवत होता. पूर्वेला भ्रम्हगिरी, त्रिंबक रांग, अंजनेरी पर्वत. दक्षिणेला दूर कुठेतरी कळसुबाई, त्रिंगलवाडी, सोबत अनामिक पर्वत राजीची वर्दळ होतीच. या ठिकाणीही काही अनामिक देव शेंदूर फसलेले दाटीवाटीने बसलेले होतेच वर भगवा अखंड फडकत होताच. खरेतर कळसुबाई शिखरावरून धुक्यामुळे     जे काही अपूर्ण राहिला त्याची पूर्तता हरिहरि गडावरील या टोकाने केली.  धन्य झालो. आनंदाची ओंजळ तुडुंब भरली होती. सह्याद्री ज्या ज्या गोष्टीसाठी वेड लावतो ते ते सर्व हरिहर वर मिळत. वर्षातील तिन्ही ऋतूत हरिहर गडावर यायचाच हा निश्चय करूनच गड उतरण्यास सुरुवात केली. वाट घासार्याची असल्याने काहींना भुई भेटही मिळाली. दरवाज्याच्या डाव्या बाजूला एक कैदखाना दगडात खोदला होता सुहास्कडून त्याची माहिती घेतली वव गर्दी झालेल्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो,गर्दी झालेली कारण वाहतूक मंद गतीने चालू होती, कारण हरिहर ची वाट सुंदर दिसत असली तरी वाट लावणारी होतीना.उतरताना चांगलीच कसरत करावी लागली. गडाची रचनाच अशी आहे कि, मुख्य दरवाजा बंद केला कि'गडावर प्रवेश केवळ अशक्य!! अशा या अभेद्य  गडच रूप ओजारत्या डोळ्यांनी मनी साठून उतरणीला लागलो. सूर्यास्त झाला होता. काही दमलेले तर काही अजूनही उत्साह टिकून होते. त्यातच आमचा एक शिलेदार खूपच थकला होता अक्षरश: चालेच अशक्य झालेले त्याचे मग काय सुहासराव आले घेतले त्याला पाठीवर अन् प्रवास चालू. जबाबदारी ती हीच. ७ च्या दरम्यान गावात पोहचलो सहाणे बंधूंनि गडाचा इतिहास अगदी मोजक्या शब्दांत मांडला. व कांटाळलेले सार्वजन मुक्कामासाठी त्रिंबकेश्वरला रवाना झाले. साधारण ३० कि मी अंतर असेल. तिथे एका प्रशस्त इमारतीमध्ये   तिसऱ्या माळ्यावरील ती शयनगृहे पाहून मन अगदी हेलावून गेले.भरुन आले. एका खोलीत आठ अशी पांगापांग झाली. जेवायला गेलो तर आणखी एक सुखद धक्का :* पुरी भाजी मसाले भात वाटच पाहत होता. ट्रेक च्या नियमात हे तास काहीच बसत नव्हत, उघड्या माळावर अथवा गुहेत मंदिरात धरणीमायचे अंथरून न अभाळ पंघारायची सवय असणारे आम्ही भटके, जीव गुदमरला या इमारतीत पण वेळेची गरज अन् नाशिकारांचे प्रेम पाहून स्वताला सावरले व "एन्जोय टू बी कंटिन्यू" म्हणत मस्त उशी घेऊन निद्रिस्त झालो :)             
        
       सकाळी ४ ला उठले व तब्बल २ तासाने तयार होऊन न्याहारीसाठी जमलो एवढा निवांत पणा प्रथमच मिळाला होता! त्या २ तासात प्रत्येक खोलीत खूपच नाट्यमय घडामोडी झाल्या ;) काहींनी पहिल्या, काहींनी अनुभवल्या :p (ठेचा म्याटर) असो. पोहे व चहा भरपेट हाणला व चौकातील शंभू महाराजांचे स्मरकाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. गारद देऊन महाराजांना मनाचा मुजरा करून किल्ले अंजनेरी ला प्रस्थान केले. साधारण १ तासातच   गडाच्या पायथ्याला पोहचलो. हनुमानाचे जन्म ठिकाण म्हणून याची प्रसिद्धी. पायथ्यालाच हनुमानाची पद्मासनातील भव्य अशा मूर्तीच मनोभावे दर्शन करून गडचढाई सुरु झाली.वन विभागाने बांधलेल्या पायऱ्या एका खिंडीपर्यंत घेऊन आल्या गच्च भरलेली ब्याग, पायात बुट्ट, हातात कॅमेरा  अशा वेशात छातीचा भाता खालीवर करत त्या खिंडीतील नळीच्या वाटेने वर जात असतानाच डाव्या बाजूला कातळात कोरलेली जैन लेनी पाहायला मिळाली,१०/११ जैन तीर्थकरांच्या मुर्त्या काही पद्मासनात तर काही उभ्याच होत्या. गावकरी याला पार्श्वनाथगुंफा म्हणून ओल्खत. पुढे ५ मिनिटातच पठारावर पोहचलो. अतिप्राचीन काळी इथे एक दरवाजा होता यावर विश्वासच बसणार नाही. या पर्वताचे पठार तसे विस्तीर्ण, सगळीकडे गवताचे साम्राज्य. कोणे एके काळी इथ अम्भीर नावाच्या राजाची राजधानी होती. चालता चालता अंजनी मातेच्या मंदिराजवळ आलो काहींनी तिथेच आराम ठोकला तर आम्ही काही जन पुढे चाललो. थोडासच वर चढल्यावर सगळा थकवा घालवणार' अस ते दृश्य- जांभळीच्या गर्द हिरव्या वनात एक निळाशार जलाशय अंगावर कोवळी सूर्यकिरणे घेत पहुडला होता. त्यामध्यें जलक्रीडा करण्याचा मोह टाळून त्याला वळसा घालून पुढे चाललो उजव्या बाजूला एका भग्न वाड्याचे अवशेष दिसले त्याचा अंदाज बांधत गाई-बैलांच्या कळपातून वाट काढत एका अश्रामाजवळ आलो. इथ अस काही पाहायला मिळेल यावर  विश्वासच बसेना!! गर्द हिरव्या वृक्षांची दाटीवाटी, निरव शांतता, किन् किन् घंटानाद करत रवंथ करणरे गाई-बैल, कफनी घातलेले शिष्य असा तो प्रपंच रामायणातील आश्रमच भासला. त्यातून वाट काढत थोड्याशा चढणीवर असलेली सितागुम्फा तर अप्रतिम नमुना. आत टोर्च मारून साप विंचू नसल्याची खात्री करून प्रवेश केला रामायणातील काही प्रसंग कोरलेले होते. काहींची पूजा झालेली होती. बर आज राम्सेज हि पाहायचा असल्याने ते सर्व तिथेच मागे टाकून पटापट उतरणीला सुरुवात केली.  जाताना जे जे मिळाल ते ते मन पटलावर पुनश्च : चक्षून घेत्ल. ती साधी वाटणारी पण सोपी नसणारी वाट उतरून जेवणासाठी पंचवटीला रवाना झालो (रोहिणी व विठल च्या फोटोसेशन मुळे अर्धा तास उशीर झाल तो भाग वेगळा :) :p) गाडीत मस्त झोप झाली. पंचवटीतील चौकातील शिवस्मारकाचे दर्शन घेतल. जेवण तयारच होत ते मिळमिळीत पंचपक्वान्न घरत असताना कालच्या ठेच्याची कमी मात्र जाणवली. जेवण आटोपून सुस्तीतच रामसेज गाठला

सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग -१

भाग - २  साठी       
साहसी खेळ खेळणाऱ्या गिर्यारोहकांना व निसर्गसौंदर्यावर लुब्ध असणार्यांना आपल्या सह्याद्रीसारखा जिवलग नाही. या सह्याद्रीच्या गिरीशिखारावरील किल्लेकोट म्हणजे आमच्या आनंदाचे खजिनेच. असाच एक खजिना लुटण्यासाठी गडवाट परिवाराकडून नाशिक जिल्ह्यातील किल्ले हरिहर गड, अंजनेरी व रणधुरंधर रामसेज अशा भ्रमंतीचे नियोजन करण्यात आले. चाकोरीबाहेरील दुर्गभेटी हे गडवाट परिवाराने जपलेले वैशिठ्यच आहे, कारण "इये "इये दुर्गाचिये नगरी, बहुत किल्ल्यांचा सुकाळ" असे वैभव असताना त्याच त्याच चाकोरीत का राहावे?? "नित्य नूतन हिंडावे!" या उक्तीप्रमाणे आमचे गिरीभ्रमण चालणार होते. अन असेही डिसेंबर संपत आला तरी मुंबईतील थंडीने थंडीची भूक काही भागवली नव्हातीच. तशी मागच्या रविवारी ढाक बहिरीच्या वनात रात्र गवतात झोपून काढावी लागल्याने भूक भागली होतीच. (नव्हे जिरलीच  होती ;) :p )…तसे नाशिक म्हंटले कि गार गार वारा, सह्याद्री, सातमाळ, नद्या, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिकता व धार्मिकता यांचा सुरेख मिलाप अन त्यातही सोबत गडवाटची म्हणजे दुग्धशर्कराच. गडवाट सोबतचा trekk चुकवणे म्हणजे मी अक्षम्य अपराध च मानतो त्यामुळेच प्रचंड अडचणींचा सामना करत जायचं नक्की झालच. आदल्या रात्री bag pack करते समयी घरातून विरोधाच्या वावड्या उठल्या, नाराजीचे सूर उमटले, निषेधार्ह वल्गनाही झाल्या पण मी मात्र माझ्या उद्धीष्टापासून यत्किंचितही ढळलो नाही. (निर्लज्जम सदासुखी अस काहीतरी genral मराठीत म्हणतात)… ही चकमक संपवली व सकाळी मटरेल पाठीला बांधून ६ ला दादरला आलो. मी जर उशीरच पोहचलो(नेहमीप्रमाणे ) बाकी दादरला येणारे आलेलेच होते तपोवन एक्स्प्रेस आली तुफान गर्दीशी सामना झाला परिणामी बसलेल्या प्रवाशांना इगतपुरीपर्यंत standing ovation द्यावी लागली।
           ठाणे, कल्याण ला उर्वरित मंडळी चढली त्यानाही तेच भाग्य !त्यातही रोहीनीने डब्यात चांगलाच कल्ला केल्याच ऐकल…इगतपुरीमध्ये उतरलो नेहमीच्या  आनंदभुवनमध्ये गरमा गरम मिसळ व फक्कड चहा झाला. नाशिककर  स्वागताला तयार होतेच ईश्वर् दादा,अमितदादा सचिन दादा ज्ञानेश भाऊ यांनी छान व्यवस्थापन केल होते, त्यानुसार २ महिंद्र pickup ने आम्ही बराचसा प्रवास करून वैतरणा धारणाचा शांत शीतल जलाशय  मागे टाकून कोटमपाडा या हरिहर गडाच्या पायथ्याच्या गावात १२:३०  च्या  सुमारास  दाखल झालो.  खानेसुमारी करुन trekk  चे नियोजन, नियम अटी, मार्गदर्शक सूचना सुहास ने केल्या व लगेचच विक्रांत च्या खर्ड्या आवाजातील गारद झाली. शिवगर्जनेने अंगभर शहरे आले होते अंगात एक जोश आला  होता त्या जोशातच जोशातच आम्ही गडाकडे कूच केली .आदिवासी गाव व भात शेती मागे टाकत आम्ही झापा झप मार्गक्रमण करत होतो. एक छोटे खाणी ओढां पार करून  प्रत्यक्ष डोंगर चढाईला सुरुवात झाली झाडा-झुडपातील वाट असल्याने उन्हाचा तसा त्रास नव्हताच। मध्ये मध्ये झाडांच्या कवडश्यातून नजर थेट हरिहर गडाच्या कातळभिंतीवर जाऊन थडकत होती तर कधी कधी त्या गडाच्या सर्वोच्छ माथ्यावरील भगवा खुणावत होता, तसे तिथे पाय ठेवण्यासाठी मन अधिकच उतावीळ होत होते.
एक चढण  पार झाल्यावर क्षणभर विश्रांती घेऊन पुढे सरसावलो काहीच वेळात एका सपाटीवर  फासलेले काही अनामिक देव दिसले. त्या देव दरबाराने क्षणभर का होईना पण लक्ष वेधून घेतल. तिथून पुढे मोठमोठ्या दगडी शीला उजव्या हाताला ठेऊन चालत राहिलो अन त्या ऐतिहासिक ,रौद्रसुंदर, निष्ठुर रानटी इंग्रजांच्या हृदयालाही पाझर फोडणाऱ्या कातळ कोरीव पायर्यांपाशी पोहचलो. गड त्रिकोणी आकाराचा असून तिन्ही बाजूंनी  २०० मीटर  तशीव कड्यांमुळे अधिकच भक्कम व अभेद्य वाटतो…थोडा वेळ नजरेत तो नजर साठवून  सरळ सरळ आम्ही त्या कातळ कड्यातील दगडी शिडीला भिडलो. निसर्गातील रौद्रतेला मानवी कलाकृतीने सुंदर रूप दिल्याने इथे एक रौद्रसुंदर नजराणा  आपल्याला पहायला मिळतो. ती २००फुट उंच वाट चढल्यावर दोन आखीवरेखीव बुरुजामध्ये बसवलेला दरवाजा  स्वागताला तयारच असतो. त्यातून आत प्रवेश करते होताच उजव्या बाजूच्या सुबक गणेश मूर्तीला नकळतच हात जोडले गेले.
      तिथून पुढील दुष्य तर त्याहून मनोहारी, पुन्हा दगडात खोदलेले एक  भुयार आपणास पुढे घेऊन जाण्यास सज्ज असते. उजव्या बाजूला कातारलेला कातळ वर दगड अन् डाव्या बाजूला २०० फुटाची सरळसोट दरी अशी या भुयाराची रचना. मनपटलावर ती आकृती साठवतोय तोच समोर आणखी एक नागमोडी वळणाची शिडीची उभी चढण. चढण खडी. पाठीमागे २०० फीत खोल दरी, या patch मध्ये मला तर फक्त माझा जीव अन् पुढील पायरी एवढच दिसत होत बाकी जग शुन्य!!(तस न करतो तर प्रकाशवेगाने पायथा गाठला असता :p ) इथेही दगडी पायऱ्यांमध्ये  असल्याने चढण थोडी सुकर होते. दगड फटीतून असे बोटे अडकून वर जात असताना नराचा वानर होतोच ;) :) पुढे आणखी एक दरवाजा पार करून आम्ही गडाच्या पठारावर पोहचलो, तो पठारी वारा अंगाला झोंबताच एक नवे चैतन्य निर्माण झाले. "जीव भांड्यात पडणे" या म्हणीचा प्रत्यय इथे आल्यशिवाय होत नाही. सार्वजन सुखरूप आल्यानंतर पुढे आम्ही सरकलो समोरच पाण्याच्या काही टाक्या होत्या पण पाणी पिण्यायोग्य नव्हते, त्यापुढे एक तलाव व हनुमान मंदिर दिसले समोरील शिवलिंग विनाछतच होते. मुख मार्जिन केले भुकेची जाणीव झालेली, तसे मन त्या चढण प्रकारात जाणीवेच्या पलीकडे    गेलेलेच पण आत्ता मात्र जाम भूक लागलेली. नाशिककरांनी गडाच्या पूर्व टोकावर भोजनव्यवस्था ठेवलेली ४ च्या सुमारास उतरणीचे उन अंगावर घेत गोल करून जेवायला सार्वजन बसले 

Saturday, 5 October 2013

कळसुबाई-एक सर्वोच्च अनुभव - (खंड-२)

   भाग १ साठी
 चालू होती मध्ये मध्ये लोखंडी शिड्या मार्ग सोपा करत वर घेऊन जात होत्या. विक्रांत सुहास सुरज विलासदादा  आबा नेह्मीप्रमने आघाडीवर होतेच. राहुल न. व मल्हार (शिवकवी) यांची चौफेर फोटोग्राफी चालू होतीच…राजू सर शांतपणे सर्व एन्जोय करत होते. मधेच विठ्ठल कोणत्यातरी कड्यावर वा एखाद्या उतरावर pano च्या नादात असलेला दिसायचा. भलताच हुरहुन्नरी पोरगा तो ;* ;* :* :* :*मी संतोष संकेत निलेश राहुल मध्ये मध्ये बसत उठत हसत मार्गक्रमण करत होतो . न most imp म्हणजे आम्ही कळसुबाई चा ला कळस गाठण्याआधीच कल्पेश भाऊंच्या गमतीजमतीने कळस गाठलेला… खूपच खेळकर व्यक्तिमत्व. त्यांच्या गमती जमती पाहत आम्ही एका टप्प्यावर पोहचलो तिथे एक छोटेखानी हॉटेल व एक बावडी होती जर आराम करून वाट धरली.. धुक्याची दुलई पांघरून शिखर अजूनही अदृश्यच होते. मधूनच पावसाची हलकी सर येउन गेली, जाता जाताच सुहास सोबत ''महाराष्ट्राचा अद्यगिर्यारोहक कोण?'' या विषयावर परिसंवाद करत असतनाच आम्ही शिखराच्या अगदीच नजीक आल्याचे लक्षात आले सुहास म्हणजे एक स्थितप्रज्ञ माणूस('स्थितप्रज्ञ' साठी शब्दकोश पाहावा ).
इतक्यात चिन्मयीला एक सर्प दिसला सुहास ने ''बांबू वयपर' अशी त्याची ओळख करून दिली. आणखीही  एक साप दिसला होता पण त्याची ओळख पटण्याअधीच तो त्याच्या ओळखीच्या जागी जाऊन लपला । धुक पाऊस थंड वारा अंगावर घेत निसर्गाची विविध रूपे अनुभवत आम्ही शेवटची शिडी चढलो न महाराष्ट्राच्या सर्वात उंच जागेवर पाय ठेवला…ढगांच्याही वर गेल्याचा तो अनुभव होता. जेमतेम ५०  फुटाचा   घेर असणाऱ्या त्या जागेवर कळसुबाईचे   छोटेखानी मंदिर होते. बाजूला एक साखळदंड खाली सोडला होता नवस पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर होतो अशी माहिती सुहास ने पुरवली होती.
              वरून सर्व धुक्याचे साम्राज्य पसरले होते.सुहास माहिती सांगत होताच, त्याचे भौगोलिक पांडित्य अगाध.,त्यामुळेच केवळ वर्णनावरून आजूबाजूला दिसत नसणाऱ्याही  किल्ले/डोंगर यांची चित्रे आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली होती, धुक्यामुळे छायाचित्रकार जरा नाराजच होते. सह्याद्रीच्या त्या देखण्या अरस्पानी सौदर्याला कोणाची नजर नको लागायला यासाठीच बहुधा ती धुक्याची धडपड असावी. मध्ये मध्ये धुके जागा देत होते आणि क्षणभरात पुन्हा त्याचेच अस्तित्व. नखशिखांत सजलेल्या नववधूचा हलकासा चेहरा पदारडून दिसावा क्षणात तिने मान वळवावी अशीच काहीशी आमची न निसर्गाची जुगलबंदी चालू होती. तो मोह आवरून आम्ही खाद्यसंस्कृतीकडे वळळो गडवाट सोबत अशी गडावर क्केलीली न्यहारी नेहमीच विलक्षण ठरलेली असते. विविध प्रकारचे दहा एक पदार्थ तोंडाला लागले. त्यात १५४६  फुट उचीवर शेजवान राइस उपलब्ध करून देणारी चिन्मयी अलौकिकच :) :) ;)तो भरगच्च्च कार्यक्रम आटोपला न् संतोष जाधव साहेबांच्या खर्ड्या आवाजातील गारदीने अंगावर शहरे आणले. _/\_     
                                  १२ :४५ झाले होते परतीची वाट धरली झपाझप  उतरू लागले सर्व. हा एक गोष्ठ राहिली आमच्या सोबत एक द्विसद्स्सीय श्वानपथक पण होते त्यांच्यासाठी या चार ओळी अर्पण- 
                                      या उपेक्षित जीवाला माणूस
                                     पदोपदी हेटाळत असतो
                                        तो मात्र वेडा जीव  जागोगागी
                                     आपला स्वभावधर्म पाळत असतो

     -असो.आम्ही उतरत होतो समोर द्विपाद प्राणी एका रांगेत उतरत होते दिसायला ते छानच होते. काही जोशात तर काही मंद चिन्मयीची चाल जरा मंदावलीच होती(राइस मुळे) गोडसे काकाही तरुणाला लाजवेल अशा उत्सहे सामील झाले होते.
आणि हो राहुल गहरवाल व संतोष यांनी एक स्तुत्य
उपक्रम राबवला होता त्यानी वाटेल आढळलेला सर्व प्लास्टिक कचरा खाली आणून टाकला. याकामी त्याला रोहिणी व चिन्मयीने मौलिक साथ दिली..
निम्मी उतरण झाल्यावर आबासाहेबांच्या लक्षात आले वेळेत गणित चुकतंय मग काय त्यांनी ते साधण्यासाठी एक मोहीमच हाती घेतली। मागे राहून(मागून लीड'' मल्हारच्या भाषेत) सर्वाना झाडून  खाली घेऊन आले. त्यांच्या या बाबतीतल्या आक्रमक धोरणांपुढे आमचे आराम/बसत/उठत य्रणे असे मनसुबे पायदळी तुडवले गेले. परिणामस्वरूप आम्ही वेळेच्या अधीच पंगतीला हजर. जेवण करून पटापट बसमध्ये बसलो जवळील रंधा धबधबा पाहण्याचे धावते नियोजन झाले होते,बस चालू झाली जेवणामुळे आलेल्या  स्पुर्तीत म्हणा किवा सुस्तीत म्हणा विक्रांत सारख अवाढव्य मावळा मागे राहिल्याचे कोणाच्याच लक्षात नाय आले. :p बारी ते रंधा २० मिनिटच अंतर सुस्तीत जाणार असाच वाटत होते तोच कल्पेशभाऊ dhaun आले त्यांच्या अकल्पित नृत्याविष्काराने आमचे येथेच्छ मनोरंजन झाले त्यांना सर्वांचीच साथ लाभली.राजू सर फटफटी(हल्ली बाईक म्हणतात)वरून असल्याने ते याला मुकले. रंध धबधबा  आला. माझे धबधब्याबद्दलचे सर्व अंदाज कल्पना धाब्यावर बसवुन हा रंधा धबधबा खालून खाली कोसळत होता. सौदर्याची पुन्हा एकदा उधळण दिसत होती. ते दृश्य पाहताच आमचे फोटोग्राफर्स सर्वत्र बागडले. प्रत्येक जन आपल्यचं नादात होता वाहवा,चर्चा,फोटो,पोझ या धामधुमीतच रोहिणीच्या पायाला एक लोखंडी गज लागला. सर्वानीच पाहिल्यामुळे तिचा चेहरा केविलवाणापणाची शिव ओलांडून रडकुंडीच्या राज्यात केव्हाच गेला होता. :p पण चावरे बाबा आले म्हणता क्षणी  ती सर्व विसरून दाणादाण पावले टाकायला लागली.  आबासाहेबांच्या एका हाकेसरशी सर्वजन एका मिनटात गाडीत जमले. पुढचा प्रवास दणक्यात सुरु.मला काही शवासनाचा मोह आवरला नाही.मध्ये कुठेतरी बस लघुशंकेला ठ्माबली थांबली न् मला जग आली. अर्धनिद्रिस्थ असतानाच मल्हार ने शांकात्मक आरोप केले(लघुशंका केल्याशिवाय याच्या शंकेला उत्तर सुचणार  नव्हते) त्या अनुषंगाने मग एक चांगलेच वैचारिक/जातीय/धार्मिक/वांशिक असे बहुद्देशीय चर्चासत्र घडून आले, त्याचे फलित म्हणून म्ह निलेश(सत्ता) याचा माझ्याबद्दल असणारा कट्टरते बद्दलचा (गैर)समाज दूर झाला, मल्हार च्या शंकांना उत्तर मिळाले. रवींद्र सावंत ने आपले जातीय/आंतरजातीय सूक्ष्म निरीक्षणे मांडली. तोच ठाणे आले न प्रमुख चर्चे करीउतरले व एक इप्सित सध्या केल्याच्या आनंदात घरी गेले. गाडीत चार टाळकी उरली होती. दादर आले. वेळेच्या २ /३ तास उशिरा येणारे कार्ट  ९ लाच दरवाजासमोर उभ दिसल्याने घरच्यांचा त्यांच्या पर्सनल डोळ्यांवरही विश्वास बसेना,पुढच्याच क्षणी स्वताला सावरत खातरजमा करून आत घेतल। व मी पुन्हा कुठ जायचे हा विचार करत नकाशा उघडला… 


समाप्त…    
kalasubai / कळसुबाई भाग १ साठी


कळसुबाई एक सर्वोच्च अनुभव (खंड-१)

 २८/०९/१३

कळसुबाई - एक सर्वोच्च अनुभव 


         रोजच्या comfort zone मधून बाहेर पडून एक दिवस निसर्गात भटकणे हे स्वत;ला reboot करण्याचा एक उत्तम मार्ग. यामध्ये प्रत्येकाचे आवडी वेगळ्या, कोणाला समुद्रकिनाऱ्याची शांत गुंज आवडेल तर कोणाला फेसाळणारे धबधबे प्रिय तर काहीना घाटमाथे तुडवण्यात मजा, काहीना गडकिल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, मनाचा व शरीराचा कस पाहणारी गिरिशिखरे खुणावत असतात या प्रकारातला मी एक अवली. अशा मुशाफिरीत आनंदाने मनाची ओंजळ काठोकाठ भरत असते काहीना सदेह जाता नाही आले तरी एखाद्याचे अनुभव वाचून ते अनुभवत  असतात अशा माझ्या मित्रांसाठी शब्द्क्रीडेचा एक केविलवाणा प्रयत्न…कळसुबाई शिखर हे मला पाचवी पासूनच साद घालत होते माझ्या या इच्छेला गडवाट परिवारामुळे मूर्त स्वरूप मिळाले ते २९.०९.१३ रोजी सकाळी ११:३० वाजता. माझ्या या भ्रमंतीचा एक धावता आढावा म्हणून हा लेखप्रपंच (धावता आढावा असल्याने अनावश्यक नोंदी टाळल्या आहेत)   
            अखेर खुप दिवसाची प्रतीक्षा संपून, जाण्याची रात्र उजाडली (???!!!) सुहास च्या नियोजनानुसार आम्ही दादर चित्रा सिनेमा येथे जमलो. मला जरा उशीरच झाला(नेहमीप्रमाणे). सुहास,रवींद्र, देवेंद्र, विलासदादा, विठ्ठल, गीताताई राहुल गहरवाल व निवनगुने हे आधीच पोहचले होते. ११:३० ला बस आली ठाण्यापरयन्तचा प्रवास शांततेतच झाला. ठाण्यात उर्वरीत मंडळी चढली आणि बस गोकुलळासारखी गजबजली. पुढचा प्रवास सुरु झाला. ठाण्यातील खड्ड्यांमुळे व driver ने (सवयीप्रमाणे) एक दोन ब्रेक मारल्यामुळे सर्व मंडळी आपापल्या जागी चपखल बसली. गप्पांचे फड रंगले दंगा मस्ती हास्यकल्लोळ सर्वच चालू होते इतक्यात रोहिणी ने कळसुबाईची ऐतिहासिक रंजक (दंत)कथा सांगायला सुरुवात केली ती काही कोणाच्या पचनी पडेना, संकेत, निलेश, राहुल ग. यांनी जोरदार विरोध करत नानाविध प्रश्नांचा भडीमार केला पण रोहिणी आपल्या कथेच्या सत्यतेवर ठाम राहिली येथूनच ''येऊ का'' हा शब्दप्रयोग प्रचलित झाला…चिन्मयी किलकिल्या डोळ्यांनी सर्व पाहत होती…. रात्र होत होती तशी पेंगणाऱ्यानी झोप जवळ केली,,, सीटवर आपापले देह झोपवताना काहींना चांगलीच कसरत करावी लागत होती त्याचे फलित म्हणून समर्थांनी दासबोधात वर्णिलेले झोपेचे सर्व प्रकार पाहायला मिळात होते :p  मी आणि आबा मात्र मधल्या जागेत अगदी शवासनातच झोपलो होतो.,.,.,      
       सकाळी ४:३०  ला जग आली तीच मुळात रोहिणीच्या "ये दंगा करू नका रे" या गर्जनेने. एव्हाना बस कळसूबाईच्या पायथ्याशी असणाऱ्या बारी गावाच्या स्वागत कमानीपाशी दाखल झाली होती.  उठून पाय मोकळे केले(आणखीही काही :p ;) :D ) इतक्यात न्याहारीवालाही धावत धावत(कॉसमोस टोर्च घेऊन) हजर झाला. त्यांच्या घरी गेल्यावर दिवाणखान्यात एक तळवट टाकलेला निदर्शनास आला न काही कळायच्या आतच त्यावर सर्वांच्या झोपेसाठी धपाधप उड्या पडल्या, अक्षरश: जागा मिळेल तिथे… (अगदी काहींनी काहींच्या अंगावरील जागाही नाही सोडली :p )पण हा झोपेचा आनंद फार काळ टिकला नाही लगेचच सुहास ने 'चला रे उठा रे' ची आवर्तने सुरु केली ;) (साला झोपतो कि नाय कधी? !!!) त्यामुळे इच्छा नसतानाही उठाव लागल तोच सर्वांची नैसर्गिक क्रीयाक्रमासाठीची लगबग सुरु असलेली दिसून आली. त्याची opening राहुल गहरवाल (अन closing निलेश नलावडे) ने केलेली ऐकिवात आहे…या सर्व धुमश्चक्रीत सर्वांचे चेहेरे ताजेतवाने होऊन न्याहारीसाठी सज्ज कधी झाले समजलेच नाही मी पण त्यातलाच एक ;) :) ;) घाईतच न्याहारी उरकली ओळख परेड झाली. विशेष म्हणजे त्यादिवाशी राजू ठोकळ सर, ईश्वर व राजेंद्र सहाणे बंधू  आमच्या तीन सहकाऱ्यांची नव्याने ओळख झाली ती त्यांच्या कार्यामुळे सहाणे बंधू आपला शेती व्यवसाय सांभाळत मिळेल तिथे समाजकार्यात सहभागी होत असतात… तर राजू सरांनी शिक्षकी पेशाला नवीन आदर्शच घालून दिलाय त्यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी काही तरी करावे यासाठी आपली बदली आदिवासी भागात करून घेतलीय, त्यांच्या कार्यास गडवाट परिवाराकडून अनंत शुभेच्छा _/\_ । सहाणे बंधूनी याही वेळेस 'अतिथी देवं भावं' अनुसरून एक छानशी भेटवस्तू देऊन परिवाराचे स्वागत केले,,,,…।  
            ७ वाजले होते खानेसुमारी करून प्रत्यक्ष चढाईला सुरुवात केली अन १० मिनिटातच एक मंदिर लागले दर्शन घेऊन  पुढील मार्गक्रमण चालू ठेवले वाट अगदीच सुलभ असल्याने हालचाल गतिमान होती त्यात ताजातवाना जोश. आजूबाजूची भातशेती मागे टाकत आम्ही समोरील बेलग प्रचंड अशा सह्यागीरीला गवसणी घालायाल पुढे सरसावत होतो. सर्वत्र निसर्गाने हिरवळीची सढळ हातानी उधळण केली होती. कड्यांवरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडत होते… काही नागमोडी वळणे घेत रान तुडवत आम्ही एका लोखंडी शिडीपाशी पोहचलो व तिथूनच मुख्य पर्वत चढायला सुरुवात झाली, नजर फिरवील तिकडचे नजारे नजरेला सुखावत होते… या सह्याद्रीचे वर्णन शब्दांत ते काय मावणार त्यासाठी ''याची देही याची डोळा''  तो अनुभवणेच उत्तम… तरीही अपल्या छायाचित्रकारांनी होता होईल तेवढा तो आपल्या कॅमेऱ्यात साठव्लाय तो पहालच आपण…क्रमश:
भाग २

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...