Thursday, 11 May 2017

शाळा- मंतरलेले दिवस

                                शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार
                   शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक  हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं. दहावीचा शेवटचा पेपर दिल्यावर मला अचानक भरून आलं शाळा संपली या जाणीवेनेच मी बैचैन झालो व ४ तास रानात वडाच्या झाडाखाली बसून गेल्या ५ वर्षात डोकावून पाहिलं.
एप्रिल महिना कडाक्याचा उन्हाळा चालूय, सर्वत्र भकास वातावरण, उन्हाच्या झळांनी दुपार अगदी न्हाऊन निघालीय, शाळू व खपली गव्हा ची शेते उरलेल्या पालापाचोळ्यासह निपचित पडून आहेत, दूर कुठेतरी कडबा भरून जाणाऱ्या  बैलगाडीच्या चाकाचा लयबद्ध आवाज कानी पडतोय, बाजूलाच गव्हाचं भुस्काट चघळत २ म्हशी संथपणे  रवंथ करण्यात मग्न आहेत. सावलीला जमलेल्या पाखरांची हलकीशी किलबिल सुरु असतेय मी मात्र स्वतःतच मग्न. !!आता आपले मित्र दुरावणार, सर्वजण वेगवेगळीकडे जाणार या विवंचनेत हायस्कुल ला प्रवेश घेतल्यापासून च्या एक एक घटना डोळ्यासमोरून सरकू लागल्या,, डोळे घट्ट मिटून मनाला अगदी खोलवर घेऊन जात आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागलो -

             ____________________  -पाचवी ते सातवी -  __________________
 
             दिनांक १६ जून १९९९ इ पाचवी मध्ये गावापासून ३किमी दूर पंचक्रोशीत एकमेव असणाऱ्या श्री मुकुंदराज विद्यालय  शाळगाव येथे प्रवेश घेतला,गावापासून दूर माळरानावर २०-२५ एकरात पसरलेली ती भव्यदिव्य शाळा पाहून जॅम हरकून गेलो. २ भलीमोठी लाल मातीची  मैदाने, सभोवताली निलगिरी व पिंपर्णीच्या झाडांची गर्दी व मधोमध १४ खोल्यांची कौलारू टुमदार इमारत. 

शाळेचा दर्शनी भाग
                           करांडेवाडीतून ४ मुले व ७ मुली पाचवीत प्रवेशती झाली, सर्व अनोळखी मुले आपापले गट करून ,  त्यामुळे न्यूनगंडात भरच.  पण हळू हळू वातावरण निवळलं  नवे मित्र झाले, विषयांत गोडी लागली, पाहता पाहता सत्र संपले द्वितीय सत्र सुरु झालं प्रगतिपुस्तकावर मार्कांच्या राशी पडू लागल्या त्यामुळे एकूणच मी त्या वातावरणात मिसळून गेलो, त्यातच सहलीच पत्रक आले. जाऊन हि आलो.  द्वितीय सत्र हि उत्तम मार्कानी पास झालो पुढच्या वर्गात नव्या गमतीजमती सुरुपुन्हा  तो पावसाळा, ते सायकल वरून रपेटी मारलेल्या, चिखलात ब्रेक दाबून सायकल फरफडत नेत केलेले स्टंट, तो सुरपाट्यांचा डाव, शाळेच्या कित्येक हेक्टर वर पसरलेल्या मैदानात पावसात खेळलेले फुटबॉल अशी मनात आठवणींची रेलचेल सुरु झाली.


 वरील  सर्व फोटो साभार - राम करांडे
                                एव्हाना वेगवेगळे विषय व त्यांचे सर यांची समीकरणे मनात पक्की होत गेली.  मराठीसाठी  मराठीची बोलीभाषेपासून वाङमयपर्यंत भाषेची उत्तम जाण असणाऱ्या सौं. घाडगे मॅडम,   विज्ञान  म्हंटलं  हलक्या फुलक्या भाषेत सजीव उदाहरणासह पण शेजारचे ४ वर्ग शिकून निघतील अशा खड्या आवाजात  शिकवणाऱ्या सौ शिंदे मॅडम. हिंदीला अभंग सर, इंग्रजीला हेरवाडे सर हे जरा जास्तच कडक व्यक्तिमत्व, शाश्त्र च्या विषयात मात्र बऱ्याच सरानी प्रयत्न करूनही  विषयाला योग्य हाताळतील असे शिक्षक नव्हते मिळाले ती कसर मात्र नवखेच पोरसवदा असलेले कदम NV  यांनी भरून काढली,इतिहास भूगोल शिकविण्याची त्यांची पद्धत खूपच रंजक-परिणामी  इतिहासातील मगध साम्राज्याचा उदय, मौर्य, सातवाहन,  बिदूंसार, कनिष्क, कलिंग ची लढाई इ. प्रकरणे कायमची कोरली गेली.  त्याचबरोबर  भूगोलात कांगो नदीचे खोरे, टुंड्रा प्रदेश, नाईल चे खोरे इ शब्द त्यांच्याच आवाजात अजूनही कानात गुंजतत्.
                    तत्कालीन आमच्या दृष्ट्या मुख्याध्यापकांच्या दूरदृष्टीने शाळेत आलेल्या संगणकासाठी तसे पूर्णवेळ तद्न शिक्षक न लाभल्याने व नाविन्याची गोडी आधीपासूनचीच असलयाने स्वतःच विविध पुस्तके आणून अभ्यास परिणामी मी, धनंजय, जयवंत आमचं वजन आपसूकच वाढल व पुढे तद्न शिक्षक आल्यानंतर आम्ही बऱ्या पैकी टेकसवी झालो ते कायमचेच. विविध कारामतीत हेही वर्ष गेले आणि हो सहल !! पुणे देहू आळंदी भन्नाट झालेली हि पण अविस्मरणीय सहल !
                         ________________________________________________________ 

         सर्व कसे मजेत होते पण एक गोष्ट जरा विदारकच! तत्कालीन सामाजिक परिस्थीचा परिणाम म्हणा हवं तर पण शाळेत मुला -मुलींच्यात कमालीचं भेदभावाच वातावरण होतं. वर्गात मुलींशी बोलणे म्हणजे मोठा गुन्हाच तो . त्यातच वर च्या वर्गातील पोरांनी आधीच घाबरवून सोडलेलं मुलींशी बोलायचं नाही सरानी पाहिलं तर बेदम मार  मिळतो इ. सरांनीही कधी या आमच्या गैरसमजला दूर नाही केलं उलटपक्षी तो दृढ कसा होईल अशीच काहीशी धोरणं  असायची अर्थात त्यामागे त्यांची कदाचित मुलींच्या सामाजिक सुरक्षेची भावनाही असेल पण मार्ग मात्र चुकीचा होता. आमच्या सारखा निरागस, खट्याळ पोरांवर दाखवेल अविश्वास वाटतो तो मला. परिणामी मुलांच्या दोन ओळी व मुलींच्या २ ओळी यामद्धे प्रचंड खुनशी वातावरणाने जागा घेतली. जिथं खेळी मेळीच वातावरण असावं तिथंच विरोधीपणाची भावना वाढीस लागलेली. एक एक प्रसंग आठवतोय मला तुम्ही चकित व्हाल- एकदा एक मित्र धावत धावत एक बातमी घेऊन आला, क्षणाचाही विलंब न करता आम्ही बातमीची खातरजमा करायला १० अ या वर्गाकडे धावलो. बातमी अशी होती कि  १० वि तील एक आमच्या गावातील विद्यार्थी वर्गातील एका मुलीशी वर्गात खुलेआम गप्पा मारतोय! कदाचित मुलं कळती झाल्यामुळे वा एखाद्या सरांच्या विषयप्रगल्भतेमूळे थोडंसं तिकडील वातावरण निवळलं असेलहि पण आमच्या साठी मात्र तो प्रसंग दुर्मिळातील दुर्मिळ प्रसंगातील एक होता. अक्षरशः काहीतरी बेकायदेशीर कृत्य शाळेत चालू आहे या अविर्भावात अचंबित होऊन आम्ही त्या घटनेचे साक्षीदार झालो . असो अशी विषमता होती त्यावेळी पण मी मात्र माझ्या वयक्तिक पातळीवर हि विषमता दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू ठेवलेलं. त्याच्याच एक भाग म्ह्णून मी इ. ७ वि पर्यंत वार्षिक एक प्रयत्न असे ३ प्रपोज पाठवलेले पण या प्रयत्नांना सपाटून अपयश आले. (नंतरच्या काळात  संबंधित व्यक्तीना  बालपणीच्या नाकारघंटेचा पश्चाताप झालंही असेल म्हणा ;) ) मुलींचा किल्लेकोट अगदीच भक्कम असल्याने मला ती तटबंदी भेदता  आली नाही आणि दरी आणखी वाढत गेली.
        असो याच वर्षात गणिताला तिवले सर नवीन रुजू झालेले सडपातळ बांधा, सदैव उत्साही मनुष्य, हासरा चेहरा, आपल्या वेगळ्या शैलीत अगदी सोप्पे करून शिकवणारी गणिताची पद्धत यामुळे अचानक माझा गणिताचा ग्राफ उंचावला. दरम्यानच्या काळात जाधव AD सर चित्रकलेला आले, माझ्या काही चित्रांचा आखिवरेखीवपणा पाहून जरा प्रोत्साहन देताच लहान गटात मला प्रथम पारितोषिक मिळाले ते सालाबादप्रमाणे इ.९वी  पर्यन्त सोडले नाही (१० वित असले चांगले उद्योग करणे बंद केलेले मी )आणि मला सूर गवसला.
याच काळात गांगुली च्या संघाने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पडसाद आमच्याही भागात उमटले परिणामी आम्ही सदैव कुठेतरी माळावर बॅट बॉल घेऊन दिसू लागलं. तेव्हा जर IPL असते ना तर आमचा MSB अर्थात Mukundraj Super Blasters नावाचा एखादा तरी संघ आमचा असताच :D

               _______________________-आठवी ते नववी- __________________
 
 हेही वर्ष संपले मोठे होऊ  लागलो.  
२००४ चा उत्तरार्ध दुष्काळ घेऊनच आला. किरकोळ परीक्षा शुल्क भरतानेही पालकांची चाललेली घालमेल अनुभवली, १०/२० रुपये सुद्धा संकट वाटू लागलेले... नोकरदारांना पगार फिक्स असतोच त्यांचं जगणं  सुसह्य होते मात्र शेतकऱ्यांचे हाल पाहवत नव्हते. अचानक समज आली.पैशाची किंमत कळली. जबाबदारी अंगावर आली. सर्वत्र रान कोरडे पडलेलं, पाऊसकाळ कमी, गुरांसाठी शाळेच्या माळावर चारा छावणी लागल्या. दुपारच्या सुट्टीत गुरांसाठी शासनाकडून येणारा ऊस खाणे हा आमचा टायम पास! टँकर आला की  रंगलेला क्रिकेट चा डाव सोडून जमेल तितका ४   दिवस पुरेल एवढे पाणीसाठा करून घेण्यासाठी धावाधाव करायला लागायची.
८वी साठी  दुष्काळ हीच एक आठवण
इ. ९वी teenagers मधील एका महत्वाच्या टप्प्यावर होतो अभ्यासातील प्रगतीही उत्तम होती, विविध उपक्रमात सहभाग चालूच होता (अप्रत्यक्षरीत्या पोरींना प्रभावित करण्याची कोणतीच संधी सोडली  जायची  नाही ;) )
सेप्टेंबर महिना आला कि वेध लागायचे ते विविध स्पर्धांचे निमित्त कर्मवीर जयंती रयत च्या सर्व संस्थामधील मानाचा उत्सव. यावर्षी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन काही मुली खूपच हवेत गेल्या होत्या साहजिकच  त्यांना खाली आणण्याची जबाबदारी उरावर घेऊन रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. गालिचा, मोर, ठिपक्यांची कासवं-बिसवं याना फाटा देत कृष्णाला प्रेम पत्र लिहणारी राधिका चितारली व रांगोळीचे रंग भरले. चित्रकलेच्या राज्यस्तरीय स्पर्धा केलेल्या असल्याने बारकाव्याचा भारी अभ्यास!  सोबत अचूक रंगसंगती, शृगांरिक भाव व घट्ट असे मापकच कपडे यामुळे खूपच आकर्षक रांगोळी झाली होती. नंबर पक्काच !पण आमच्या परीक्षकांना या रांगोळीतील किंवा चित्रातील आखीव रेखीवपणा, गोलाई (curves ) हे  माझे वय लक्षात घेता रुचला नाही व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चालायचे !
                यावर्षीची सहल जरा खास च ठरली कारणेही तशीच, महत्वाचे म्हणजे आम्ही जाणते(???) झालेलो. मुक्कामी सहल, खट्याळ बुद्धी. आणि अतिमहत्वाचं म्हणजे स्वतःचा कॅमेरा घेऊन त्या काळी सहलीला जाणारा पहिला विद्यार्थी.नशीबवान होतो सहलीसाठी कपडे खरेदीला गेलो असता एके ठिकाणी सेल होता विविध सरप्राईझ गिफ्ट होते माझं लक्ष कॅमेरावर होत आणि 'मेरी सून ली ' कॅमेरा लागला रोल वाला.(आत्ताच्या हवा करणाऱ्या पोरांना कोण सांगणार कि मोबाइलपण नव्हते तेव्हा योगेश आलेकरी कॅमेरा वापरत होता ) (मनोमन म्हटलं या या कॅमेराच्या भांडवलावर ३-४ तरी लायनी क्लिअर होणार ;) )पुढे त्या कॅमेराने मोठं रामायण रचलंच.
   सहलीवरून आल्यावर एक रोल बाकी होता कोडॅक चा होता वाया नव्हता घालवयचा म्हणून मग आम्ही NCC च्या ड्रेस वर आमच्या ग्रुप चे फोटो काढायचे संमत झाले. एव्हाना माझ्या प्रयत्नांना थोडंफार यश येऊन दरी कमी झालेलीच त्यामुळे काही मुलींनी पण फोटोसेशन साठी विचारणा केली आणि आम्हीही  निर्णयाचं स्वागत करत सामील करून घेतलं (आम्हालाही तेच हवं होत म्हणा ).
                                झालं तारीख ठरली २६जानेवारी २००५ प्रजासत्ताक दिन आटोपून आम्ही, आम्ही संगोपन केलेल्या पेरूच्या बागेत आमचं छायाचित्रण चालू असतानाच जाधव सर व भोसले सर यांनी धाड टाकली आणि एकेकाला चोप दिला अचानक झालेल्या हमल्याने गांगरून गेलो. कर्णधार या नात्याने मलाच पाहिलं धरला आणि तुडवून काढलं आणि माझ्यातील एका उभारी घेणाऱ्या फोटोग्राफेरला अक्षरशः तुडवून मारला रे !
नंतर स्टाफ रूम मध्ये उलगडा झाला कि का मारला एवढं, कारण कि,  मुलींचे फोटो काढणे गुन्हा आहे.फोटो एडीट करून काहीही करता येऊ शकत असे बेबुनियाद आरोप लावले गेले पण आमच्या मुख्याध्यापकांच्या सहिष्णू वृत्त्तीमुळे त्यांनी आमची बाजू घेतल्याने दिलासा मिळाला.... !!!                                         
                   वर्ष संपलं पुन्हा तेच दुपारचे पेपर, विहिरीवर येथेच्छ डुंबणे, कैऱ्या, पेरू, काकड्या चोरणे आणि क्रिकेट.
                            __________________  -दहावी -________________
                
                        आता अभ्यासाच ओझं वाढलं  बघता बघता दहावीत आलो, समज वाढली सकाळी ८ वाजता अभ्यासिकेला शाळेत सर्वजण जमू लागलो. गप्पांच्या फडात अभ्यास पेक्षा लैगिक विषय जास्त या चर्चा होऊ लागल्या. हाच काय तो आमचा माहितीचा स्रोत.
काळ शारीरिक संक्रमणाचा होता. भिन्नलिंगबद्दल आकर्षण, मानसिक शारीरिक बदल जाणवू लागलेले एका बाजूला अभ्यास तर एका बाजूला हे मानसिक हलकल्लोळ सांभाळणे कठीण जात होते. प्रश्न  होते उत्तर मिळत नसत. स्वतःची सतसतविवेकबुद्धी  वापरून बऱ्याच प्रश्नाची उकल हि  व्हायची पण खात्रीशीर उत्तर नसायचे. भावना नुसत्याच चाळवल्या जायच्या. आजच्या सारखं गूगल नव्हते त्यावेळी कि लगेच हातात सर्व. संगत चांगली राहिल्याने तसल्या फिल्म हि खूप च उशिरा पाहण्याचा योग्य आला. 'जेवढे दूर तेवढी उत्कंठा जास्त' या नैसर्गिक नियमानुसार या साऱ्याच गोष्टींची उत्कंठा जास्त होती, होणारच कारण आमच्याकडे मुलींशी बोलणेही वर्ज्य होते.  अशा फावल्या वेळात गाप्पान्चे फड रंगायच पोरं स्वतःच जोड्या लावायचे 'हि' माझी 'ती'  ह्याची वगैरे वगैरे.  कधी एखादा मनोराजा उगीचच एखादी सोबतच्या घालवलेल्या वेळेच्या  सुरस कथा सांगायचा. आम्हीही आपले कान देऊन ऐकायचो कधीतरी एखाद्याची सत्य घटना असली तरी बाकी ९९%  थापाच असायच्या त्याही आम्ही मजा घेत ऐकायचो... मग प्रत्येकाला वाटायचं आपली पण एक मस्त लव्हस्टोरी असावी यातून मग एकेक काल्पनिक कथा  स्वताची म्हणून घोळक्यात मारली जायची, ज्याच्या त्याच्या बुद्धीवर कथेचा दर्जा ठरला जायचा काहींची कथा फारच सुमार असायची सुरवात होता क्षणीच आम्ही त्याला वेड्यात काढायचो. पण काहींनी मात्र जान ओतलेले असायची आह्ह काय ती कल्पना .... काय ते वर्णन ... काय ते टाईमिंग जुळलेलं ..देखावाच डोळ्यासमोर उभा राहायचा ... !
तिकडे मात्र ती  स्वप्नसुंदरी  धुनी-भांडी केरकचरा काढण्यात एवढी गर्क असायची कि आपण कुणाचे आणि आपला कोण राजकुमार? व  आपल्यासोबतच्या शृगांरिक कथांच्या रंगलेल्या महफिलीचा तिला  तिळमात्र गंध नसायचा.अभ्यासाच्या सोबतीला हा सिल्याबस बाहेरचा अभ्यासहि आला होता. खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा लैंगिक शिक्षण द्यायला  बाहेरचे शिक्षक आले व ज्यादाचे तास घेतले गेले. मुला-मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवून दहावीच्या वर्गाला  लैगिक शिक्षण देण्याचा घाट घातलेला आणि त्याची गरज हि होतीच. समोर मानवी शरीर त्याची रचना, गुप्तांग, त्यामधील बदल, समस्या, काळजी वगैरे समोर दाखवले जात होत पण आम्हला चिंता कशाची ? हेच तिकडे मुलींच्या रूम मध्ये पण दाखवला गेले असेल तर मुलींची काय रिअक्शन असेल ? पुढे वाढलेलं राहिलं बाजूला आम्ही या विवंचनेत कि तिकडे अमकी अमकी फारच निरागस  आणि लहान तिच्या बाल  मनावर काय विपरीत परिणाम होईल हि चित्रे पाहून, तिची काय अवस्था होईल हे पाहून या नुसत्या विचारानेच आमच्या काळजात चर्रर्र व्हायचं !का न व्हावं ? काळजीच तेवढी होती.
"मुलांना आपण जेवढे लहान समजतो किंवा ठेवतो तेवढी ती लहान नसतात" 
दहावी 'ब' २००६ बॅच    (मागिल रांगेत उजव्या बाजूला डावीकडे खाली पाहणारा मी आहे )

आम्ही कितीही विनोदात ते घेतले असले तरी माहिती खूप मिळाली होती खुप उत्तरे मिळाली होती बदल झाला  होता नंतर  कंडोम कसे असतात कसे वापरतात याची प्रात्यक्षिके दिली, सेक्स म्हणजे काय प्रेम, सेक्स, आकर्षण यातील फरक हळू हळू स्पष्ट झाला. एव्हाना बरेच कळते झालेलो एक बाजूने दहावीचा अभ्यास होताच यावर परिणाम नाही पण काहींच्या अभ्यासावर मात्र खुप परिणाम दिसून आला. एका अवलियाने त्या बाहेरच्या शिक्षकांचे कंडोम चे बॉक्स पळवले मग नंतर ४ दिवस फुल्ल टाईमपास नुसता प्रात्यक्षिके घेण्यातच ! त्यात एक बकरा सापडला एकाने गुपचूप कंडोम लावून पहिला व कौतुकाने आम्हाला सांगितलं म्हटलं याची गम्मत करावी - त्याला बोललो 'चूक केलीस मोठी असं नसतं करायच.  लग्नाआधी कन्डोम लावलास तर नंतर हे हे त्रास होतात "हे' होणार नाही "ते" होणार नाही . घाबरला तो . त्याला बोलो उपाय एकाच गोमुत्राने धुवून पवित्र करून घे मी ऐकलंय कुठंतरी खरं असतंय. बिचारा २ तास रानोमाळ हिंडून गाई शोधून पवित्र होऊन आला. असो अशा गंमती होत राहायच्या. लिहण्यासारखं खूप आहे. ;)  पण लेखन सीमा.

दहावी 'अ' २००६ बॅच
असो. रात्र अभ्यासिका झाली.सराव झाली. मुख्य परीक्षा आली, हिंगणगाव जे कि ५किमी दूर होत तिकडे परीक्षा केंद्र. मुलींनी टमटम ठरवलेली प्रवासाला तर आम्ही सायकल फ्रीफेर केली. येडे फाट्यावर वडापावच्या गाड्यावर झालेली गर्दी पाहून फुकट वडापाव खाऊन गुपचूप पळ काढताना भारी मजा यायची .. !
पेपर काहींना अवघड तर काहींना सोपे गेले. माझी बेरीज ७१% वर जात होती तेव्हाच जाणवले या सर्व वातावरणाचा नकळत आपल्याला फटका बसलाय. दुर्दैवाने फक्त ६८% मिळाले जे खूपच कमी होते.
निकालानंतर ज्याचे काका, मामा, दादा बाहेर होते त्यांनी पोरांना बाहेर नेले शिकायला, काही कडेगाव, काही कराड, आहि विट्याला रवाना झाले. पोरीचं हक्काच भरती विदयापीठ कडेगाव होतंच.. ! मी दूरवर चांदोली अभयारण्यायतील एका निवासी कॉलेज मध्ये भविष्य शोधायला जाणार होतो.
    त्या चार तासात असा सर्व पट डोळ्यासमोरून सरकून गेला. बालपण सोडून मी आता एका जबाबदार जगात प्रवेश करता झालो.. आणि आयुष्यातील एक सुवर्णकाळ मनाच्या कुपीत बंद झाला तो फक्त आयुष्याच्या एखाद्या वळणावर आठवणी उगाळून चेहऱ्यावर हास्य उमटवायला.. !

आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा एक सुंदर अभंग ...

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।
- संत तुकाराम

 _____________________________________________________________________

Monday, 6 February 2017

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

         आजमितीस जी काही फिरण्याची माझी आवड जोपासलीय त्याची पाळे मुळे अगदी थेट शालेय जीवनात जातात, प्रवासाचं भाग्य तस खूप लहानपणापासूनच लाभलेलं मला. कारण हि तसच, आपले लाड जिथे सर्वाधीक पुरवले जातात असे नातेवाईक  मामा व आत्यांची गावे ७० किमी च्या परिघाच्या बाहेर. त्यामुळे लांबचा (त्यावेळी हा लांबचाच ) प्रवास पप्पांसोबत घडायचाच. पाहत गेलो. शिकत गेलो.
खेडे गावातील पार्श्वभूमी असली तरी आमच्या गावाला डोंगराचं भाग्य लाभला  नव्हतं ती कसूर भरून काढली ती जवळील च ३ किमी वरील तुकाई देवी डोंगराने. प्राथमिक शाळेत असताना तुकाई देवीच मंदिर व डोंगर आणि त्या डोंगरात असणारी गुहा हे उत्सुकतेचे विषय असत.
        हे झालं कौटुंबिक. पण माझा पहिला विनाकौटुंबिक प्रवास घडला तो इ. ५ वी मध्ये. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने. तर आपण आपण आत्ता त्या दिवसाचा धावता आढावा तब्बल १७ वर्षांनंतर घेणार आहोत.
आमची शाळा श्री मुकुंदराज विद्यालय शाळगांव 

       तर झाले असे कि, इ.४ थी पास झाल्यानंतर समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्यान परंपरेला अनुसरून मला इ. ५ वी मध्ये घालण्यात आले. गावात जि.प. शाळा ४ थी पर्यंत असल्याने पंचक्रोशीतील तब्बल ३ किमी अंतरावरील एकमेव विद्यालय असे श्री. मुकुंदराज विद्यालय शाळगाव येथे आम्ही उत्साहाने जाऊ लागलो.
संक्रमणाचा काळ होता तो. साल इ. स. २०००. विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात जग प्रवेशत होत. एका बाजूला तिकडे दूरदेशी अमेरिकेत ४२ वे अध्यक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे बिल क्लिंटन यांचेकडून ४३ वे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज डब्लू बुश यांच्याकडे सूत्रे आलेली तर इकडे केंद्रात मोठा सत्ताबदल झालेला. नुकतेच १३ वे पंतप्रधान म्हणून अटलजीनी NDA तर्फे  ११वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल UPA यांच्याकडून सत्ता हातात घेतलेली, तर महाराष्ट्रात उलट झालेलं, नुकतीच जन्माला आलेल्या NCP ने स्थिर स्थावर होत INC सोबत आघाडी करत महाराष्ट्रात युती कडून सत्ता हिसकावून घेतलेली.
                  तिकडे सचिन  तेंडुलकर कडून क्रिकेट टीम चे नेतृत्व सौरव गांगुलीकडे सरकलेले तर ऑस्ट्रेलीयामध्ये मार्क टेलर कडून स्टीव्ह वॉ कडे नेतृत्व बदल होत होता, संगणक सर्वसमावेशक होण्याकडे एक एक पाऊल पुढे सरकत होता आणि दुसऱ्या बाजूला या बदलाचा भाग होत आमच्या शाळेतील मा. घाडगे सरांनी तब्बल १० वर्षांनंतर शाळेतून सहल काढण्याचा घाट घातलेला. व तो यशस्वी करूनही दाखवला. वर्गात नोटीस येताच घरच्या गृहीत  धरून नावनोंदणी केली हि, व अपेक्षेप्रमाणे घरून मंजुरीही मिळाली लहान गटास ७५ रुपये प्रत्येकी व १५० रुपये मोठा गट असे विवरण होते. तत्कालीन परिस्थितीत सहलीसाठी खर्च हा अनावश्यक गटात मोडत असल्याने, व पालकांची मानसिकताही सहलीयोग्य नसल्याने, सहलीचे प्रयोजन बारगरळे  जायचे पण आम्ही नशीबवान ठरलो न यंदा इरादा पक्का झाला. !! ठिकाणे ठरली चाफळ - वाई - पाचगणी - महाबळेश्वर - प्रतापगड. सगळंच नवीन होत चाफळ वगळता, कारण आईसोबत संक्रातीला चाफळ च्या राममंदिरला बरेचदा जाणे झालेले.
                          उत्साह शिगेला पोहचलेला बालमित्रांसोबत पहिल्यांदाच प्रवासास निघत होतो. घरातील मंडळी झाडून तयारीला लागलेली, आईने खाऊ बनविला, ताईने कपडे इस्त्री करून ठेवली, पप्पानी ५० रुपये खर्चाला दिले जी कि खूप मोठी रक्कम होती. पोरगं सहलीला चाललंय कोडकौतुक झालं!
प्रातिनिधिक चित्र 

                     दिवस ठरला १६ डिसेम्बर २०००. वार शनिवार भल्या पहाटे बोचऱ्या थंडीत, शाळेतील मैदानात पप्पानी सायकल वरून आणून सोडल. १० शिक्षक, १०० विद्यार्थी, २ बस असा आमचा लवाजमा कदम सर व घाडगे सरांच्या नेतृत्वाखाली पहाटे ५:३०वा. चाफळ च्या दिशेने सरकला.तांबडं फुटायला आम्ही चाफळ ला पोहचलो . मांड व तारळी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या चाफळ गावात थंडीचा जोर आणखीच जाणवत होता. मुख्य द्वाराने प्रवेशते झालो, मुख्य मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता व समोर नम्र भावे दास मारुती आहे  जे समर्थ रामदासांनी शके १५६९ (सन १६४८ )स्थापन केलेले आहे. त्यानंतर इतिहासात चाफळ हे समर्थ संप्रदायचे मुख्य मठ म्हणून नावारूपास आले.  असं म्हणतात १९६७ च्या भूकंपातही या  मंदिरांना  धक्का लागला नाही कि तडा गेला नाही.
                      दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झालो अन मला माझी कानटोपी हरवल्याचा साक्षात्कार झाला मग ती शोधण्याच्या नादात ४/५ प्रदिक्षिणेसह संपूर्ण कॅम्पस फिरून  झाला आणि शेवटी किश्यात खोचलेली आढळली अशी झाली गम्मत....आनंद च एवढा होता कि भान हरपून मजा घेत होतो ना !
                    झालं !! न्याहारी होतेय तोच कदम सरांची शिट्टी कानी पडली आणि गाडी सुटली ती थेट पाचगणी
च्या टेबल लँड पठारावरच  थांबली
     पाचगणी.
.कोवळी ऊन्ह अंगावर  घेत सर्वजण गाडीतून उतरली.  त्या विस्तीर्ण पठारावर काय पाहायला न का आलोय हे  त्यावेळी तरी  उमगलं नव्हत. १०० जणांमध्ये एका कडे कोणाकडे तरी कॅमेरा होता असा पुसटसं आठवतंय. त्यामुळे फोटोसाठी जो आत्ता वेळ वाया जातो तो आम्ही मस्त मित्रांनी गृप करून टंगळमंगळ करण्यात जायचा, खोड्या काढणे, टपली मारणे याची जागा पुढे जाऊन सेल्फी घेणार होती, म्हणून ती मज्जा आम्ही त्यावेळीच करून घेतली .. टेबल लॅन्ड वर थंड हवेत एक फेरफटका मारला  तोच शिट्टी वाजली. एव्हाना १० वाजत आले होते. आता वाईचा भला मोठा गणपती खुणावत होता. पाचगणीवरून फार दूर नव्हता वाई लगेचच वाई मध्ये दाखल झालो, घाईतच गणेश दर्शन झालं,बाजूच्या काशी विश्वेश्वराचेह.  दर्शन घेऊन  संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे लांबूनच आशीर्वाद घेतले.  घाटावरील तो मंदिरसमूह पाहून वेगातच प्रतापगडच्या दिशेने गाडी निघाली. १२ वाजत होते. महाबळेश्वर च्या घाटात मध्येच एक झरा पाहून गाडी थांबली गेली, सर्वजण उतरले इथे जेवणाचा कार्यक्रम पार पडायचा होता. खळखळत्या पाण्याच्या मंजुळ आवाजासोबत निसर्गात तो जो जेवणाचा आनंद होता तो निव्वाळ अविस्मरणीय!!
                 शिट्टी वाजली. गाडी सुटली ! १० वी मधील काही पोरांनी एक टेपरेकॉर्डर आणला होता मागच्या सीट वरील गोंधळात मीपण सामील झालो, धडकन, ढाई अक्षर प्यार के, बिच्चू या सिनेमांतील त्यावेळी बस मध्ये ऐकलेली गाणी आजही कानात गुंजतात.त्यापैकी 'dulhe का सेहरा... ' अक्सर इस दुनियामे अनजाने मिलते हे' हि गाणी खूपच भाव खाऊन गेलेली. मीही कधी गोंधळात सामील झालो कळलंच नाही ....
आला प्रतापगड आला !
                   आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी गडावर भटकणार होतो, योगच नव्हता त्याआधी, तसं पप्पानी एकदा बस मधून सदाशिवगड दाखवलेला इतकीच काय ती गडाशी ओळख. गाडी थांबली, उतरताच समोर अजस्र तटबंदीने वेढलेल्या किल्ल्याचे दर्शन झाले. अफजल खान इथेच फाडला होता कसा फाडला असेल ? कुठे ते युद्ध झाले असेल ? अशी प्रश्ने मनात घर करून होती उत्तरे आज मिळणार होती.
कदम सरानी काही शिस्तीच्या सूचना केल्या आणि आम्ही त्यांच्या मागे चालते झालो. वीसेक मिनिटात मुख्य द्वारापाशी आलो द्वाराची गोमुखी पद्धतीची रचना इतिहासाच्या सरानी समजावून सांगितली आणि पुढे आम्ही ध्वज स्तंभाच्या बुरुजावर गेलो. तिथून समोर कोयनेचे खोरे आणि अभयारण्याच्या घनदाट जंगलाचा परिसर पाहून उरात धडकी भरली आणि असली जंगले भविष्यात तुडवून काढायची उर्मी पेटू लागली ती आजतागातायत जिवंत आहे.
                          आता बालेकिल्ल्याकडे जाऊन शिवछत्रपतींची अश्वारूढ मूर्ती पाहून सारेच अवाक झाले पुस्तकात शिकलेला इतिहास डोळ्यासमोर तरळू लागल, ती मूर्ती पाहून चौथीत शिकलेल्या शिवरायांपेक्षा शिवराय कितीतरी पटीने भव्यदिव्य आहेत असे वाटू लागले , पलीकडेच कोकणकड्यावरून खाली खाली खोलवर दिसणारे कोकण पाहून प्रतापगडाची उंची मनात घर करून गेली. नंतर भवानीदेवी मंदिर पहिले, शिवरानी स्वतः याची स्थापना केलेली हे जेव्हा घाडगे सरांकडून  तिथे ऐकलं तेव्हा हे मंदिर नव्हे तर साक्षात इतिहासच पुढे उभा आहे असा भास त्या सरांच्या बोलण्यातून हाऊ लागला होता. पुढे नगार खाण्यात गेलो एका गाईड काढून आम्ही प्रतापगडच्या संग्राम ऐकला आणि इतिहासाबद्दलची  गोडी वाढत गेली.
वेळ झाला होता अजून अफलखानाची कबर पाहायची होती, शिट्टी वाजली सर्वजण एकत्र झालो सरांच्या मागे मागे खाली उतरलो, कंबर पहिली तो शामियाना इथेच कुठेतरी उभारला असेल.
                    गडदर्शन झालं. जेमतेम २ तासाच्या त्या गड भेटीत खूप काही मिळवलं होत. एक प्रेरणा मिळाली होती, एक आवड मिळाली होती मला.
                         आता गाडी पुन्हा महाबळेश्वर च्या दिशेने निघाली होती, ४:३० च्या दरम्यान महाबळेश्वर ला पोहचलो. गांधीजींची तीन माकडे म्हणून त्या गाईड ने दाखवलेली आठवतंय, आरडा ओरडा करूंन आवाज परत ऐकायचा एक पॉईंट पहिला, Echo point म्हणतात त्याला ते आटा समजल. घास दुखेस्तोवर ओरडलो परत आवाज आला कि मज्जा यायची, काही १० वी च्या पोरांनी मुलींना दिलेली टोपण नावे घेऊन वातावरण तापवून सोडलं होता :D सकाळ पासून त्यांच्यात असल्याने असली राजकारणे कळायला लागली होती ;) त्यांची मजा वेगळी आम्ही फक्त हसण्याचा भूमिका पार पडायचो :D
                            पुढे कुठून तरी त्या गाईड भाऊ ने  राजा हिंदुस्थानी अमीर खान चा बंगला दाखवला असं काहीतरी आठवतंय .
नन्तर सनसेट पॉईंट ला गेलो २० मिनिटे बसलो सूर्य वरच्या वरच नाहीसा झाला असा सूर्यस्त पहिल्यांदाच पहिला होता नाहीतरी तोपर्यंत सूर्य डोंगराआड च जायचा. जास्त कौतुक नाही वाटलं काही, लायनीत मागे येऊन बस मध्ये बसलो अंधार झाला आता देव देव बाकी. श्री क्षेत्र महाबळेश्वर गाठलं, या कहाण्या ऐकल्या सप्त नद्यांचा संगम पहिला ते मात्र अजूनही लक्ख आठवतंय. कारण तो कोणती नदी ५ वार्ष्णीं येते तर कोणती १२ वर्षांनी येते असा काहीतरी फास्ट फास्ट सांगत हता आणि मी पुन्हा पुन्हा तेच विचारून त्याला भंडावून सोडत होतो तरीही अजूनही मला ते गणित कळलं नाही :D
झालं. हेही पाहून झालं
                      .आता बस महाबळेश्वर स्टॅन्ड मध्ये आली आणि सर्व जण जेवायला हॉटेल मध्ये गेले, मला भूक नव्हती मी बस  ठरवलं. झोप काही लागेना म्हणूनखाली उतरलो. बाजूला स्टॅन्ड मध्ये tv वर हाथी मेरे साठी सिनेमा चालू होता, बसलो बघत. अर्ध्या तासाने झोप यायला लागल्यावर उठलो व बस मध्ये जाऊन झोपलो जागेवर, काहीवेळात लक्षात आले बस मध्ये जी थोडीफार लोक आहेत ते अनोळखी आहेत आणि आपल्या बॅगा पण नाहीत इथे, कळालं चुकीच्या बस मध्ये बसलोय, ती महाड ला जाणारी बस होती. उतरलो.  बस शोधायला लागलो, सारख्याच बस दिसत होत्या सर्व , घाबरल्या मुळे आणखीच गोंधळलो होतो, रडूच यायचं बाकी होत इतक्यात दुरून शिट्टीचा आवाज आला धावत तिकडे गेलो एक कोणीतरी कमी आहे म्हणून मोजामोजी चालू होती मी धावत आलेलो दिसतात कदम सरानी एकाएकी माझ्यावर हल्ला चढवला पण आपले लव्हली घाडगे सर मदतीस धावून आले व वेळीच हस्तक्षेप करून माझा पार्श्वभाग लाल होण्यापासून वाचवला :D
                                    १० वाजण्याच्या दरम्यान बस निघाली सर्वजण गपगार झोपले होतो. त्या घटनेमुळे झोप गेलीच होती. पुन्हा एकदा सर्व दिवस आठवला (त्या रिवाइंड मुळेच आज १७ वर्षांनी पण सहज सर्व आठवतंय ) का दिवसात खूप काही पाहून शिकून निघालो होतो. नन्तर च्या सर्व सहलीला पहिले नाव द्यायचेच या इराद्यानेच. पहाटे ३ च्या दरम्यान शाळगाव च्या वेशीवर बस आली, १२ ला येणार म्हणून सर्व पालक मंडळी ३ तास वाट पाहत बसली होती, आपापली पोरं उचलली व चालू पडले.
        खूप आनांदात न उत्साहात झाला होता कार्यक्र्म त्यांनतर च्या वर्षी पुणे दर्शन ची सहलीत केलेल्या प्रतापाने मला वर्गाचा सहल मंत्री पद आपोआप मिळत जायलं लागलं ;)
प्रतापगड । प्रातिनिधिक चित्र 

हा आता जरा कामाचं ..


 • भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील  चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
 • निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा. 
 • सुशिक्षित वागा (नसले तरीही  दिखावा करा )

समाप्त :


Tuesday, 8 November 2016

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।


।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

                                              प्रागैतिहासिक काळात शेतीचा शोध लागला आणि माणूस भटकंती सोडून स्थिर झाला, पण प्रगत काळात मानवाला पुन्हा भटकंतीचे वेध लागले. या मधल्या काळात भटकंती या विषयामध्येही बरीच स्थित्यंतरे झाली व भटकंती किंबहुना ट्रेकिंग हा शब्द परवलीचा झाला किंवा हा एक छंद म्हणून नावारूपास आला. निसर्गापासून दूर गेलेला मानव या निमित्ताने पुन्हा निसर्गाकडे वाळू लागला, यातून आनंद मिळवू लागला. आता भटकंती करणे म्हणजे डोंगर, दऱ्या, पर्वत, नदी, नाले ,गावे, शहरे, विविध ठिकाणे, प्रांत सर्व सर्व आले. पैकी आपण शहरी किवा ग्रामिण जीवनास रुळलेली मंडळी तेव्हा इतर ठिकाणी भटकायचे तर काही नियम पूर्वतयारी मर्यादा यांचे हि अवलोकन हवे. नाहीतर आनंदावर विरजण पडू शकते ना! तर इथं आपण भटकंतीची पूर्वतयारी या विषयावर व फक्त याच विषयावर बघणार आहोत.

                            आता इथेही भटक्यांचे २ भाग पडतात पहिला भटकंतीतून इतिहासाकडे वाळलेले तर दुसरं इतिहासातून भटकंतीकडे वाळलेले किंवा इतिहासाच्या शोधात भटकंती करणारे म्हटलं तरी चालेल या इतिहास भटक्यांचे आत्मे सहसा गड किल्ले, खिंडी, युद्ध भूमी इ. ठिकाणी घुटमळतात, येथील इतिहास भटकंतीच्या पंखांना अमर्याद बळ देतो त्यामुळे भटकंतीचा श्री गणेश करण्या आधी काहीसा इतिहास हि माहित असावाच हि पहिली पायरी म्हणता येईल.
        त्या पुढे जाऊन प्रत्यक्ष भटकंतीची वेळ येते तेव्हा काही निसर्गाचे नियम, त्याच्या लहरीपणा, संभाव्य धोके याचा जरासा अभ्यास करून त्यानुसार आपली सैर यशस्वी करण्याची मजाच न्यारी, हि मजा अनुभवायची असेल तर आपले शरीर व मन कणखर व काटक असावे लागते तसे शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाला या गोष्टी ताशा जन्मजातच मिळतात पण आपली जीवन शैली पाहता आपला अंगभूत काटकपणा उजळवायला थोडी तयारी करणे गरजेचे आहेच  

 • सर्वात महत्वाचं शारीरिक तयारी. 
        भटकंती म्हटलं कि बरेच पायपीट होते मग त्याची सवय हवी नाहीतर अंगदुखीने आनंदावर पाणी पडणार. तशी जास्त काही तयारी नाही पण नियमित चालण्याचा व्यायाम हवा सोबतच जवळ एखादी टेकडी असेल तर ती चढणे उत्तम व्यायाम,मोठया ट्रेक साठी जात असेल तर हाच व्यायाम पाठीवर १० किलो वजन तेही टप्प्या टप्प्याने वाढवत करायचा . दिवसाला किमान ५/६ किमी चालू शकलो कि वरच पूर्ण केल्यासारखं आहे.  एकदा का ट्रेकिंग अंगवळणी पडलं कि मग अधिकच वेळ यासाठीनाही काढला तरी चालू शकत. ट्रेक जर हिमालयातील असेल तर दिनचर्येत थोडासा बदल करून घ्यायचा जस कि खाणं पिणं तिकडे जे मिळणार त्याची चौकशी करून त्याची सवय लावून घेणे, तिकडे अति उंचीवर हवा विरळ असलयाने प्राणवायू कमी मिळणार मग छातीचा भाता वर खाली होईपर्यंत चढाई उतराई करत राहणे श्वसनाचे योग प्रकार करण्यास हि हरकत नाही हा तास हिमालयात पहिल्यांदाच जात असेल तर मात्र जास्त काळजी घ्यावी व अधिक ची तयारी असावी लागते.

 • मानसिक तयारी
        हा भाग खूप महत्वाचा कारण मानसिक बळ एकदा खचले कि तुमचे बलदंड शरीरही काही कामाचे उरत नाही   म्हणून मानसिक तयारीही तितकेच महत्व द्यावे किंबहुना जास्तीच. डोंगर दऱ्यांत भटकताना उंची खोली आलीच काहींना त्याचे भय असते तसे असेल तर स्वतःहून च आपल्या मर्यादा ओळखून त्यापासून लांब राहणे उचित. नाहीतर या गोष्टींची भीती काढून टाकणे तेही सरावाने हाच एकमेव मार्ग पण ते करत असताना सुरक्षितेची साधने वापरावी व ती वापरणारा अनुभवी व्यक्ती चमूत असावा. तसेच आणखी एक तयारी म्हणजे घराबाहेर पडल्यावर आपणाला कोणत्याच सोयीसुविधा मिळणार नाहीत येईल त्या प्रसंगाला अगदी मजेत समोर जायचंय एवढं मनावर ठसलं कि तुम्ही या भटकंतीतील आनंदाचे सोने लुटायला पात्र झालात म्हणून समजा.
 • आता आपण पाहूया निसर्गात वावरण्याचे काही सामान्य नियम
यातील बरच मी अनुभवाने लिहतोय त्यामुळे हे सर्वानाच पटेल असे नाही.
           सर्वात महत्वाचं निसर्गातील सर्व गोष्टींप्रती आदर असणे अगदी एखादा कीटक जरी अंगावर बसला तरी त्याला न मारता बाजूला करणे इथपर्यंत. कारण आपण त्याच्या घरात गेलोय त्याच्या घरात जाऊन त्यांची जीवनसाखळी बिघडवून आनंद मिळविण्याएवढे कृतघ्न तरी भटक्यांनी होऊ नये यासाठी हे. दुसरी गोष्ट भावनेच्या भरात उत्साहाच्या भरात आपण स्वतःला निसर्गा पेक्षा मोठं समजण्याची चूक करू नये.
        आपल्या वर्तनाने प्राणिसंपदा वनसंपदा यांची हानी होणार नाही याची काळजी मात्र सदैव घावी. जस कि आग लागणे, कचरा करणे, फोटोग्राफी च्या नादात कधी कधी पक्ष्यांची घरटी अथवा अंडी हाताळली जाणे किंवा विनाकारण फोटोसाठी सर्प पकडणे अशा अनेक गोष्टीची माहिती घेऊन च निसर्गात वावर असावा. इथं गोष्ट सांगावीशी वाटतंय जंगलात फिरताना येथील प्राणी पक्षी वृक्ष फळे फुले यांची दैंनंदिनी व त्यानच्या निसर्गातील भूमिकेच्या गमती जमती अभ्यासण्याचा नाद लागला च चुकून तर तुम्ही निसर्गाशिवाय राहूच शकत नाही एवढं अप्रतिम जग मिळेल तुम्हाला पण त्यासाठी खूप अभ्यासाची गरज असणार.
असो,
 •  आता आपण सोबत घेण्याच्या माहात्व्हाच्या वस्तूंबाबत बघू.
      तयारीतील हि एक महत्वाची गोष्ट म्हणता येईल डोंगर भटकंतीत संभाव्य धोके टाळण्यासाठी, आपली क्षमता वाढविण्या साठी किंवा आहे ती टिकून राहावी याकरिता खूप उपयोगी वस्तू सोबत असणारे गरजचे असते

 • १) कपडे
माझ्या अनुभवानुसार नेमही सौम्य रंगाचे फुल्ल पॅन्ट व टीशर्ट फुल किंवा हाफ असतील तर extra sleevs सोबत असाव्या. डोक्यावर सदैव टोपी किंवा डोके झाकलेले असावेच.  बंडाना किंवा किंवा गमचा असेल तर मान व गळा  हि झाकून घ्यावा ऊन व धूलिकणांपासून त्वचेचे संरक्षण होते. पॅन्ट शक्यतो नायलॉन ची सध्या बाजारात मिळते ती असेल तर उत्तम कारण ती भिजली तरी सूकते  लवकर धूळ बसली तरी झटकली कि साफ होते. स्ट्रेचेबल असल्याने आपण त्यामध्ये सहजी वावरू शकतो.सध्या केमो कलर च्या मिलिटरी पँट्स हि मिळतात त्याचा उद्देश निसर्गाशी मिळतीजुळती रंगसंगती व मजबूत बांधणीचे असल्याने दीर्घकाळ उपयोगिता मिळते. टीशर्ट उत्तम २/३ दिवस सहज घालू शकतो त्यामुळे जास्त कापडायचे ओझे टाळता येते.उन्हाचे दिवस असतील तर अतिनील किरणांपासून संरक्षण देणारे गॉगल्स असावेत सोबत. महत्वाचा मुद्दा - चित्रात  विदेशी ट्रेकर्स हाल्फ कपड्यात दिसतात ते दिसायलाही छान छोकी दिसत म्हणून अपन अनुकरण करू नये, त्यांचे तिकडील हवामान निसर्गमन त्यानुरूप तो पेहराव असतो. आपल्याकडे विविध प्रकारचे विषारी कीटक, वनस्पती काटे सह्याद्रीत आढळतात त्यापासून संपूर्ण शरीर वाचावे हा हेतू.
फोटो प्रतीकात्मक आहे
 • २)बूट -
 अति महत्वाची गोष्ट. भटकंतीमध्ये पायाची भूमिका खूप मोठी त्यामुळे पायांची साथ मिळाली तर च आपण इश्चित स्थळी पोहचू. त्यासाठी उत्तम दर्जाचे आरामदायी बूट असावे त्यामुळे आपण न थकता चालण्याचा आनंद  नक्कीच घेऊ शकतो. चप्पल अथवा सँडल्स कधीच घालू नयेत कारण पाय उघडं राहिल्याने काटे घुसणे, सॅप विचू चावण्याची शक्यता, दगड पडून बोटे तुटण्याचा धोका असे प्रकार होऊ शकतात.
फोटो प्रतीकात्मक आहे

फोटो प्रतीकात्मक आहे

फोटो प्रतीकात्मक आहे

   -आता हे उत्तम दर्जाचे बूट ओळखायचे कसे ?   

 • -तळवा किंवा sole- sole शक्यतो रबरी असावे व त्यावर मोठ्या आकारात नक्षी असावी त्याने पकड (ग्रीप )उत्तम मिळते मातीत अथवा निसरड्या जागीही आपण व्यवस्थित चालू शकतो. sole मऊ पाहून घ्यावे हार्ड असेल तर त्याचा त्रास चालताना होतो.
 •  -माप : नेहमी योग्य मापाचे बूट असावेतच त्यासाठी दुकानात जाऊन स्वतः घालून पाहण्याला प्राधान्य द्यावे आजकाल ऑनलाइन खरेदी माडे मापात मितीलच याची शक्यता कमी कारण ती मापे पाश्च्यात्त्य लोकांच्या शरीररचनेनुसार बनविलेली असतात. बूट हा नेहमी हाय अँकल म्हणजे घोट्याच्या वरपर्यंत असावा त्यांमुले पायाला वर पर्यंत आधार मिळतो व आपसूकच मुरगळने, लचकणे या गोष्टी टाळल्या जातात 
 कॅम्पस या कंपनी चे action trekking हे बूट अगदी स्वस्त व मस्त मला वाटतात (मी इथे जाहिरात करत नाहीये पण हा सध्या तरी बुटाच्या बाबतीत दर्जेदार पर्याय आहे म्हणून नाव सुचवलं ) मटेरियल पाहताना उच्च दर्जाचे असावे कि ज्याने बुटात बुटात कोंदट वातावरण न होता हवा खेळती राहील म्हणजेच फेब्रिक जाळीदार असावं हल्ली काही कंपनीचे आहेत बूट जे जाळीदार फेब्रिक मुले हवेशीर असतात व पाण्यातही उत्तम चालतात

 • ३)सॅक . किंवा पाठपिशवी
      याशिवाय भटकंती होणे नाही त्यामुळे सॅक घेताना खूपच चोखंदळ राहावं. सर्व प्रथम आपण कोणत्या भटकंतीसाठी जास्त वापर करणार आहे त्यानुरूप सॅक घ्यावी मोठे हिमालयीन ट्रेक असतील तर ५०/५५ ltr एकदिवसीय असेल तर ३०ते ३५ लिटर ची सॅक पुरेशी ठरते. या अगदी ५०० रुपयांपासून ते १०००० पर्यंत मिळतील पण आपली गरज भागविणारी उत्तम दर्जाची योग्य किमतीत पाहून घ्यावी.


        - आता गरज भागिवणारी म्हणजे कशी ?

 • पुरेसे पण गरजेचे सहित्य बसेल अशी, बंध belt  मजबूत असावे त्याचबरोबर हवे तशे अड्जस्ट होणारे असावेत, बाजूचे कप्पे असावेत ज्याची खूप गरज पडते, मटेरियल उत्तम असावे वॉटरप्रूफ असेल तर उत्तमच बांधणी उभ्या आकारात असावी पाठीला मेटल सपोर्ट असेल तर उत्तम नसेल तर आतून पॅड असलेला तरी हवाच. व चेस्ट बेल्ट व वेस्ट बेल्ट असावेतच याने वजनाची विभागणी होऊन खांद्यावर भर कमी होतो व प्रवास आरामदायी होतो
 • त्याचबरोबर रेन कव्हर हि योग्य मापाचे घ्यावे सॅक जरी वॉटरप्रूफ असेल तरीही त्या भरवशे राहू नये रेन कव्हर असावेच याचा आणखी एक फायदा नेहमी रेणकवर लावायची सवय लागली तर बॅग जास्त मळतही नाही बॅग पेक्षा रेनकोव्हर धुणे कधीही सोप्पे. नाही का ?
 • सॅक व बूट नेहमी स्वतः पाहून दुकानातूच घ्यावी ऑनलाइन खरेदी जरी स्वस्त वाटली तरीही याबाबतीत मी अनुभवाने सांगेन कि बॅग स्वतः पाहून आपल्या पाठीच्या व उंचीच्या आकारास समरूप होईल अशीच घ्यावी कारण हि एकवेळीची गुंतवणूक खूप वर्षे साथ देईल.
खालील चित्रावरून बॅग कशी भरावी आपल्या लक्षात येईल 

 

 •  ४)औषधपेटी
        बाहेर पडताना काही पुरेशी औषधें सोबत असावेतच एका छोट्या पेटी मध्ये डॉक्टरांच्या सल्य्याने आपल्या प्रकृतीला अनुरूप औषधें त्या पेटिट घ्यावीत यासाठी जाणकारांचा सल्लाच घ्यावा कोणतेही औषध अपुऱ्या माहितीवर घेऊ नये रोगापेक्षा इलाज भयंकर करून ठेवाल.
 • आणि एक महत्वाचं काठी किंवा वॉकिंग स्टिक वापरण्याची सवय लावावी याचा फायदा उतारवयात होतो.वजनाने हलकी अशी स्टिक वापरल्याने गुडघ्यावर येणारे ओझे विभागले जाऊन गुढघ्यांचे कष्ट कमी होते व त्यांचे आयुर्मान वाढते. 
 •  आत्तापासूनच वापरल्यास गुडघ्यांची झीज कमी होते व आपण जास्त वर्षे ट्रेक करू करू शकू. (ज्यांचे वय आत्ता ४०+ आहे त्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून प्रेरित )
 • आधार घेणे म्हणजे कमी पणाचे लक्षण असा काही लोकांचा अहंभाव हि इथे मध्ये येऊ शकतो त्यांनी वापरू नये :)
 • वस्तूंची यादी
      प्रत्यक्ष भटकंतीला जाताना सोबत काय काय गोष्टी घ्यावा हे पाहूया आता.

        इंटरनेट वर किंवा विविध पुस्तकातुन आपणास अशा याद्या मिळतात माझ्या अनुभवानुसार त्यातील बरेचसे सामान बिनकामाचे असते इथे आपण २ दिवसीय भटकंती विचारात घेऊन साहित्य यादी पाहू

अंगावरील कपडे बूट मोजे टोपी व गॉगल्स सोडून बॅगमध्ये भरण्याच्या गोष्टी
१ )पुरेसे खाद्य                                     २) पाणी बॉटल
३) टीशर्ट                                           ४) टॉर्च व एक्सट्रा बॅटरी 
५) चाकू                                             
६)स्लीपिंग बॅग किंवा मॅट किंवा तत्सम झोपण्यासाठीचे साहित्य पण अगदी कमी जागा व्यापतील असे 
७) चप्पल (रात्री कॅम्प site वर फिरायला) ८)गरज असेल तर स्वेटर 
९) कानटोपी आवश्यक झोपताना कां बांधूनच झोपावे 
१०) गमचा (जो टॉवेल चे हि काम करतो व रुमलचेही व तुलनेने जागा कमी व्यापतो) 
११) एक दोरी ५/६ मीटर 
१२) टोपी
१३)औषधपेटी, माचीस व नोंद वही
१४) काठी किंवा वॉकिंग स्टिक
पावसाळा असेल तर रेनकोट बस. महत्वाचं सूत्र गरजा कमी करणे आपोआप यादी कमी होते, कमीत कमी पण गरजेचेच साहित्य जवळ ठेवीची सुरवातीपासूनच सवय लावून घ्यावी याचे पुढे खूप फायदे होतात.


आपली डोंगरयात्रा सुखर होण्यात आपण सोबत घेतलेल्या योग्य वस्तूंचा खुप मोठा सहभाग असतो हे विसरुन चालणार नाही त्यामुळे स्वतःची व आपल्या वस्तूंची काळजी घेऊन आपापल्या डोंगर यात्रा पूर्णत्वास नेऊन निखळ आनंदाची उधळण अनुभवावी इतरांस हि खुली करावी.

आपल्या तमाम भटकंती आराखड्यांसाठी खूप खूप शुभेच्छा
(टीप - लेखनाचा पहिलाच प्रयत्न व मी काही लेखक नसल्याने काही  त्रुटी असतील तर सांभाळून घ्यावे )


Friday, 23 September 2016

झपाटलेला ट्रेक

झपाटलेला ट्रेक
 जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता.  तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस  मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही.
         शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला  व सरळ घनगड ला गेलो. दुपारी घनगडावरून समोर सुधागड पाहत न्याहारी सोडली तर उजवीकडे तैलबैला रात्री मुक्कामाला खुणावत जो मुक्काम सुधागडावर होता. संध्याकाळी तैलबैला गावात मुक्काम करून सकाळी निवांत पणे सवाष्णीकडे निघाल. मळभ भरून आलेले. एकटाच भटकत होतो भुतासारखा रानोमाळ.  घाट उतरणीला जरा एका झाडाखाली गार सावलीला बसलो. १० मिनिटासाठी आडवा झालो न तब्बल २ तासांनी उठलो. भयंकर गाढ झोप. दचकून उठलो घड्याळ पाहिलं ३ वाजलेले, वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. माझी होती कि वातावरणाची माहिती नाही. उरलेला घाट घाईतच उतरलो . दातपाडी नदी पार करून सुधागडच्या धोंडसे वाटेल लागलो ४ वाजलेले. सुधागडच जंगल आज वेगळाच वाटत होत. गूढ. अनामिक भीती सुरु झाली होती. मावळतीकडे दिवस कलू लागला होता, जंगलाचा घनदाटपणा वाढत चालला होता, मी एक एक पाऊल महादरवाज्याकडे सरकत होतो. रविवारची संध्याकाळ होत होती, एकटाच गडावर जात होतो . उतरणारा एक ग्रुप माझ्याकडे पाहत निघून गेला, मी निःशब्द धीर गंभीर मुद्रेत. का कुणास ठाऊक पण एक नकारात्मकता आली होती अनामिक भीती दाटली होती. पावले जड झाली होती.. धोंडसे मार्गाचे जंगल आज भकास गूढ अनाकलनीय वाटायला लागला होत. तशातच गडावरून उतरणारे गावकरी भेटले त्यांनी वरती न जाण्याचा सल्ला दिलाच वरतून अमावस्या एक दोन दिवसावर आल्याची आठवण करून दिली, त्यामुळे   रात्र हि काळीकुट्ट असणार यात तिळमात्र शंका नव्हती. तरीही म्हटलं जाऊच जाऊन काय गपगार झोपायचंय काय फरक पडतो .
                             ७ ला बर्रोब्बर महादरवाज्यापुढे उभा एक इवलासा बिंदू होऊन . अंधार पडलाच होता. त्या दुर्गम भागात या वेळी मी एकटाच चहुबाजूनी गूढरम्य अशा जंगलाचा वेढा, व समोर हा अक्राळविक्राळ दरवाजा जणू मला गिळंकृतच करणार असं भासत होत. दुपारी झोपून उठल्यापासून सर्व दुनियाच बदलल्यासारखी वाटत होती, काहीतरी अघटीत घडणार आहे असच वाटत होत, त्यामध्ये त्या गावकऱ्यानी अमावस्येची घातलेली भीती, आणि आज हे जंगल पण कसे भयानकच वाटत होते आणि हा महादरवाजा ? नेहमीचा  परिचयाचा तरीही आज अनोळखी वाटत होता. जणू एकाद्या सापळ्याचं दे लोभसवाणं दार वाटत होत. का असं होत होत काहीच कळत नव्हतं फक्त काहीतरी विचित्र होणार याची जाणीव झाली होती. आणि मी त्या दरवाजातून आत प्रवेशलो जणू कोणत्यातरी अमानवीय शक्तीच्या सापळ्यात अलगद शिरलोय. आता वाट चांगलीच रुंद झालेली उंचच उंच झाडे त्या झाड्याच्या कचाट्यात सापडलेले भग्नावशेषातील पडके वाडे, घरे, जोत्यांचे अवशेष चित्र विचित्र पसरलेल्या वेली यावर विजेरी मारत भोराई मंदिरासमोर आलो. लांबून च वंदन करून एका जोत्यावर आडवा झालो. बाजूला एक ग्रुप शेकोटी पेटवून मजा मस्ती करत होता विचारपूस झाली. बॅग तिथेच ठेऊन मी शांततेच्या शोधात उजव्या बाजूला असणाऱ्या समाध्यांच्या परिसरात गेलो इतिहासकाळातील स्मशानच ते असंख्य समाध्या  आजूबाजूला आपल्या वीरपुरुषांची स्मरण लेऊन स्थिरावलेल्या अन तिथे मी एक जिवंत प्राणी!!
                       एका सपाट पृष्ठभाग असणाऱ्या समाधी च्या कट्ट्यावर आडवा होऊन आकाशाकडे पाहता पाहता मन कधी इतिहासात गेले कळलेच नाही. मूठभर मावळ्यांनी गवताच्या भाऱ्यात तलवारी लपवून गडावर आणल्या व शत्रू सपासप कापून काढले रक्ताला विजयाची किनार लाभली. तिथं पासून ते भोर संस्थान विलीन होईपर्यंत सुधागडच्या वाचलेला इतिहास मानपटलावरून सरकू लागला त्यातील युद्धांचे प्रसंग अंगावर काटा आणू लागले तशातच नारायणधारपांपासून ते शेरलॉक पर्यंतच्या सर्व कथा डोळ्यांसमोर नाचू लागल्या, म्हणून त्यातून बाहेर पडून जरा फेरफटका मारला ईशान्येकडे अंधुकशी तैलबैल्याची आकृती दिसत होती तर पश्चिमेला पाच्छापूर अन मागे संपूर्ण सुधागड पठार अंधारात काळाकभिन्न. वेळ झाला होता वाड्यात जाऊन खिचडी बनवायची होती मंदिराजवळील तो ग्रुपही वाड्यात जेवायला गेलेला ती मिन मिनती  शेकोटी विजवून मीही निघालो. उजव्या बाजूला असणाऱ्या अनामिक मूर्त्यांना नमस्कार करून डावीकडील काळ्याकुट्ट अंधारात चमचमणारा तलावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत वाड्या भोवतालच्या त्या गच्च रानात शिरलो विजेरी इतकीच जागा दिसेल इतका गडद अंधार. चाचपडत कसाबसा वाड्यात आलो. माझं धीर गंभीर आणि एक्कलकोंडं वर्तन पाहून प्रथमतः तो ग्रुप हि घाबरला असेलच पण नन्तर २ शब्द बोलल्यावर  वातावरण निवळल. त्याचं झालं कि मी त्याच चुलीवर खिचडी करणार हे समजतातच त्याची जेवणच आमंत्रण दिलं व मीही जास्त आढेवेढे न घेता स्वीकारल. गप्पाष्टकात जेवणे झाली तेव्हा मला समजलं कि हा ग्रुपही आता night trek चा आनंद घेत लगेच उतरणार आहे, रविवार ची रात्र त्यामुळे आता कोणीच नव्हतं माझ्याशिवाय गडावर. त्यांनी मला त्यांच्यासोबत निघण्याची विनंती केली पण आता उतरायचा म्हणजे खूप कंटाळवाणा काम त्यापेक्षा मस्त झोपण्याला मी प्राधान्य दिल.
वाडा (साभार गुगल प्रतिमा )
                                ११ ला हे लोक गेले. आता या ऐतिहासिक पडक्या वाड्यात, नव्हे या सुधागडच्या विस्तृत पठारावर अंधाऱ्या रात्री या भयंकर स्थतीत मी एकटाच !!! या कल्पनेनेच माझी झोप उडाली. दक्षिणेकडील ओसरीवर पथरी अंथरली बाजूला विजेरी व मिन मिनती, फडफडत तेवणारी एक मेणबत्ती . समोर वाड्याचा चौक.
आता हा भकास वाडा मला खायला उठला. दुपार पासून का असे होतंय याची गणितं उलगडायला लागली. चौसोपी हा वाडा मला भव्य दिव्या अक्राळविक्राळ वाटू लागला, वाऱ्याने फडफडणारे पत्रे मनात धडकी भरवू लागले. रात  किड्याची किरकिर्र मस्तकशूळ उठवू लागले.बाजूच्या बंद खोलीत उंदीर घुशींच्या हालचालीचे आवाज वातावरण शांत होताच लांबून कुठून तरी कोल्हेकुई तर कधी घुबडाचे आवाज .. !!
 जोत्याचे एक एक खांब माझ्याकडे रोखून पाहणाऱ्या राक्षसासारखे वाटू लागले, ज्या ज्या  गोष्टीवर नजर जाईल  ती ती गोष्ट अक्राळ विक्राळ आकृतीत रूपांतरित हात होती, वाऱ्याचा आवाजही मला कोणीतरी कर्कश: आवाजात बोलावताय असं भासू लागला होता   १२ वाजले. वातावरणातील गूढपणा वाढत चालला होता.
एक चित्र प्रयोग
 आता माझी शक्ती क्षीण होत आलेली न एक क्षणाला मी झोपी गेलो ते २  तासांनीच दचकून उठलो एका भयंकर स्वप्नातून बाहेर येऊन कि स्वप्नातच पुढेही माहिती नाही.. स्वप्नात तो वाडा चक्क ३ मजली झालेला व  तिसऱ्या माळ्यावर मी झोपलेलो एका जग्ग् विद्रुप चेहऱ्यच्या म्हाताऱ्या व्यक्तीने घरातील बेडकी बाहेर फेकावी तसं मला खाली फेकून दिलं. दणकन आदळताच मला जाग अली. मी होतो त्याच जागी होतो ते स्वप्न होतं याची जाणीव होताच त्या धक्क्यातून बाहेर आलो तोच दुसरा धक्का, स्वप्नांतील ती भयंकर व्यक्ती समोरच्या ओसरीवर उभी- रापलेला काळपट चेहरा मोठाले डोळे तुरळक पण विस्कटलेले केस कंबरेला गुंडाळलेलंमळकट वस्त्र हातात काठी व येरझाऱ्या घालणारी मुद्रा व मध्ये मध्ये माझ्याकडे खुनशी नजरेने बघत कोणत्या तरी अनाकलनीय भाषेत असंबंध बडबड चालू होती   . सोबतीला दोन्ही ओसरीवर अत्यंत वृद्ध, कातडी  हाडांनाच चिकटलेली वाटावी एवढ्या कृश स्त्रिया जणू सांगाडेच ते. अगतिक नजरेने माझ्याकडे पाहत. सारच अनाकलनीय इतक्यात त्या विक्षिप्त मनुष्याने हातातील कोणतीतरी वस्तू माझ्याकडे भिरकावली खाण कण आवाज !! मी सावरलो तो भास होता.  या आभासी जागाच मी एक बाहुलं बनून गेलो होतो. कोणत्यातरी अमानवीय शक्तीच्या कचाट्यात मी अडकलो होतो.  १५-२० फूट उंच उचलून फेकल जातं होत तर कधी अत्यंत क्रूर रित्या फरफडत ओढले जातंय, असले भास होत होते, बसल्या जागेवरूनच याची अनुभूती मिळत होती पण ते भासच होते एकटा जीव आयताच जाळ्यात पडला होता.
कोणे एके काळी सकाळी योगासन वर्गाला जात असताना भल्या पहाटे केंद्राच्या बाजूच्या इमारतीत नाथ संप्रदायाची प्रवचने चालायची त्यातील काही मंत्रोच्चार सतत कानी पडत. आत्ता त्यातील आठवलेले  काही शब्द जुळवून मंत्रोच्चाराचा केविलवाणा प्रयत्न चालला तोच त्या रानटी अमानवी आकृतीकडून एक  कोणती तरी मजबूत वस्तू माझ्याकडे फेकली गेली. पुन्हा आवाज खाणकनं . . . !!! मात्र यावेळी भास नव्हता कपाळावर टण्णू आला आणि मी मुर्च्छितावस्थेत प्रवेशिलो व या अघोषित वास्तुपुरुषाशी पुकारलेल्या युद्धात शरीराने हार मानली, मात्र मन अजूनही लढतच होतं संघर्ष संपला नव्हता रात्रीच्या भयाण काळोखात मनाच्या खेळांना उधाण आलेलं.  गडावरील घनदाट जंगलाच्या परिसरात वसलेल्या त्या वाड्यात अमावस्येच्या पूर्वरात्रीला एक मूर्च्छित देह, ३ अमानवी शक्ती व एक कणखर मन यांच्यात  एक संघर्ष चालू होता. पहाटे कधीतरी मनाची शक्ती संपल्यावर हा गूढ रित्या सुरु झालेला संघर्ष कोणत्याही निकाला विना संपला असावा. सकाळी ९ ला शुद्धीवर आलो कि जागा झालो माहिती नाही.  सर्व सामसूम झालेलं, उठलो. अंगात त्राण  नव्हता रात्रीच्या गूढतेमुळे शारीरिक व मानसिक बळ खर्ची पडलेलं कसाबसा उठलो बॅग पाठीवर टाकली न पाच्छापूर कडे उतरलो
शेकोटीवर आणखी एक चित्र प्रयोग करताना
वाड्याचे बाहेरून चित्र (गुगल वरून )

समाप्त:
तळटीप --
[ महत्वाची सूचना
वरील कथा 'मनाचे खेळ' या संकल्पनेवर आधारित कल्पना विस्तार आहे. यातील घटना, पात्र, ठिकाणे काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काही संबंध आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद ]

Tuesday, 6 September 2016

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा  

   जुलै मधील  एक रविवार, बाहेर मुसळधार पाऊस चालूय, गाडी काढून कुठेतरी नवीन ठिकाणी जाण्याचे वेध लागलेत. साम्याने उत्तर कोकणातील एक मजबूत किल्ला सुचवला , उत्तर कोकणात जायचे तर प्रचंड रहदारीचा सामना व त्यामध्ये पाऊस तर आणखी मंद गतीचा प्रवास. इति- योगेश आलेकरी.
 पश्चिम-मध्य महाराष्ट्राकडे माझा कल. अखेर सरतेसमयी सम्याच्या म्हणण्याप्रमाणं उत्तर पश्चिम किनारपट्टीवर लक्ष ठेऊन असलेला एक भक्कम डोंगरी किल्ला निश्चित झाला व आम्ही निवांत पणे गाडी हाकत निघालो नवी मुंबई - ठाणे - घोडबंदर - संजय गांधी अभयारण्यातून पलीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर आलो.
      एका प्रतिष्ठित लेखकाचे पुस्तक सोबतीला होते त्यातील चुकीच्या नकाशानुसार चुकीच्या फाट्यावर गेलो. स्थानिकांकडून योग्य माहिती मिळाली किल्ल्याकडे जाण्यासाठी, पण तोपर्यंत ४० किमी विनाकारणच भरकटणे झालेले. पुस्तकात दिलेला रस्ते मार्ग चुकीचा निघाला पण ट्रेन ने जाण्यासाठी दिलेला योग्य ,जो कि आमच्या कामाचा नव्हता.शोधमोहिमेत या पाऊसामुळे वैतागलो होतोच . शिरसाट फाट्यावर उभे होतो बाजूलाच एक हॉटेलवाला मस्त कांदा भजी काढत होता नाही चेतावतच होता म्हणा ! एव्हाना त्या किल्ल्याचा नाद सोडलाच होता आम्ही, घड्याळात दिड वाजलेले (बाकी कुठे वाजणार म्हणा ;) )समोरील कांदा भजी संपायच्या आतच बाजूच्या बोर्ड वरील "वज्रेश्वरी १६ किमी " वाचत च प्लॅन B तयार झाला हि व ताबडतोब गाडी वज्रेश्वरी च्या दिशेने फेकली (अर्थात हॉटेलवाल्याचं बिल देऊन :D ) 
सुंदर रस्ता

    आता रस्ता फारच सुंदर लागला होता. उजवीकडे बुटके डोंगर पण खुरट्या झाडांनी पूर्णपणे आच्छादलेले डावीकडे तानसा नदी आधी मधी दूरवर दर्शन देई, तर चहुबाजूनी भाताची खाचरे गढुळच पाणी भरून संथ पहुडलेली. स्वच्छ सुंदर रास्ता अगदी रिकामाच जणू आमच्या साठीच पायघड्या टाकलेत ! कधी तर एखादी सुसाट गाडी अथवा बायकर्स जायचे बाजूने आम्ही निवांत मजा घेत वज्रेश्वरीत दाखल झालो 
      नदीकाठावरील एका टेकडीवर असलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याभोवती मोठा कोट आहे. पेशवाईचा उदयापर्यंत येथील मंदिर खूपच लहान होते. वसई स्वारीनंतर चिमाजी आप्पांनी स्वतःच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधून घेतले असे सांगितले जाते. सभामंडपाचा भाग बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांनी, तर पायऱ्या व दीपमाळ नासिकचे प्रसिद्ध सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. सभामंडप व दोन गाभारे असे मंदिराचे तीन भाग पडतात . प्रमुख गाभाऱ्यात पाच मूर्ती . त्यांत मध्यभागी वज्रेश्वरी, तिच्या उजव्या बाजूला सावित्री-सरस्वती आणि डाव्या बाजूला लक्ष्मी-भार्गव यांच्या मूर्ती . दुसऱ्या गाभऱ्यात गणपती, वेताळ, कालभैरव इत्यादींच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. १८७० मधील इंग्रज-मराठा चकमक वज्रेश्वरीजवळच झाली होती असेही सांगितले जाते. (माहिती साभार -आंतरजाल )
मंदिर


ज्रेश्वरी गावाच्या परिसरात, नदीतीरावर ६.४ किमी. अंतरापर्यंत गरम पाण्याची अनेक कुंडे दिसून येतात . हे पाणी आरोग्यदायक असून त्वचारोगावर गुणकारी समजले जाते. या कुंडांना अग्निकुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड, वायुकुंड, रामकुंड, लक्ष्मणकुंड व सीताकुंड अशी नावे दिलेली आहेत; स्नानासाठी मोठ्या संख्येने येथे लोक येत असतात. व पावसाळ्यात हुल्लडबाजी करतात. 
अशा प्रकारे हुल्लडबाजी चालली असते पावसाळ्यात. वाईट

वज्रेश्वरीजवळील अकलोली आणि गणेशपुरी येथे अनुक्रमे गरम पाण्याची कुंडे, आरोग्यधाम, जलोपचार केंद्र आणि नित्यानंद स्वामींची समाधी असून भाविकांची समाधीच्या दर्शनासाठी गर्दी असते पण इकडे जरा शिस्त दिसून येते
 
नित्यानंद महाराज मठातील कुंडात जरा शिस्तीत लोक असल्याने असे गरम पाण्यात पाय सोडून बसता आले
आता इथून भिवंडी वरून कल्याणचा दुर्गाडी किल्ला मग वाशीचे वावखळेश्वर मंदिर असा प्लॅन B करून वज्रेश्वरीमधून बाहेर पड्तोयच तोच एका झाडावर एक पाटी दिसली - 'किल्ले गुमतारा' घोटवड. 
गाडी थांबली. मागे अली. एका गावकऱ्याशी विचारणा झाली, त्यांनाच माहिती नव्हती मग घोटवड गाव विचारलं. मिळालं. प्लॅन C तयार.. !!! किल्ले गुमतारा उर्फ दुगाडगड उर्फ घोटवड चा किल्ला. !
            वेळ सायंकाळचीची, पावसाने जोर धरला. रस्ता म्हाळुंगे फाट्यावरून उजवीकडे घोटवड कडे जातो तर सरळ पुढे भिवंडी. उजवे वळण घेऊन अजून एक उजवे घेतले कि आपण घोटवड गावातच. त्या वळणारच थांबावं लागल कारण वरूणराजे वरून भडकलेले. धो धो कोसळू लागले किल्ला पाहू देतोय कि नाही शंका वाटायला लागली, जरासं कमी झालं तस गावात पोहचलो  
तुफान पावसामुळे पायउतार व्हावं लागलं 
पावसामुळे गावात सामसूम होती, एका गृहस्थाला किल्ल्याबद्दल विचारणा केली आमच्या काळजीपोटी त्यांनी न जाण्याचा सल्ला दिला, कारण किल्ला चढायलाच अडीच तास लागतात व आत्ता ४:१५ मिनिट झालेत आणि भरीस भर म्हणजे किल्ल्याचा रास्ता सापडला तर पाहिजे या परिस्थतीत. मनात प्रश्न चिन्ह निर्माण झालं, पण आमचे इरादे पक्के होते. आणखी पुढे गेल्यावर गावातील एका उत्साही तरुणाशी गाठ पडली त्याने पुरवलेली माहिती अशी- 
  "आत्ता साडे चार होतायत इथून २ किमी ब्राम्हण पाडा, तिथून पुढे आदिवासी पाड्यावर गाडी जाणार नाही चिखलामुळे ते चालत जावे लागेल,तिथून भात खाचरांतून वाट काढत २ ओढे पार करणार तेव्हा दिशादर्शक खुणा दिसणार. न ते नाहीच सापडल तर ??? आणि आत्ता  विचारायला काळं कुत्रं देखील नसणार वाटेवर, एकंदरीत तुम्ही जाऊच नका."  निष्कर्ष !!!!
पण आमचे इरादे पक्के !! गुमतारा पाहून च गावातून पाय काढायचा यावर ठाम ! खरं तर खूप मोठीं रिस्क घेत होतो पुढे पुढे जाऊन. पण डोळसपणे. 
 
पाड्याकडे

 सांगितल्याप्रमाणे घोटवड मधून पुढे २ किमी वरील ब्राह्मण पाड्यावर(असं नाव का उत्तर मिळालं नाही ) आलो. दोन्ही बाजूनी भात शेती पाण्यात होती. ७/८ घरांची वस्ती ती. रास्ता विचारला. उजवीकडे चढणारी वाट दाखविण्यात आली, गाडी जाणार नाही याकडे समीररावांनी दुर्लक्ष्य करून गाडी घुसवली कुठे कुठे मला उतरवून गाडी पिळपाड्यावर दाखल झाली. ४/५विस्कळीत  घरांची आदिवासी वस्ती शाईन गावात बघून चकित झाले, अर्थात २ च स्री पात्रे दिसली तिथे, त्यांनीही ५ वाजलेत सांगून अशक्यता वर्तवली. तरीही आमच्या हट्टापुढे जाऊन त्यांनी उत्तरेकडे हात करून त्या टेकडीच्या पलीकडे वाट आहे सांगितले. 
        मग काय धावतच निघालो पाण्यातून शेतीतून वाट काढत ती टेकडी चढून आलो. पलीकडे एक घर दिसले काकांना बाहेर बोलावले त्यांनी मात्र चांगले काम केले. वेळ व आमच्या उत्साह पाहून त्यांनी अचूक मार्गदर्शन केले, त्याबरहुकूम चालू पडलो, भाजीपाल्याची सुंदर शेती पार करून २ मोठे ओढे दुथडी गढुळाचं पाणी भरून वाहत होते,  पार करून मुख्य चढणीला लागलो. 
भाजीपाल्याची शेती व ते घर


टेकडीवर जाणारी वाट


ओढा पार करताना समीर शिर्के


दुसरा ओढा पार करताना सदरहू ब्लॉगचे स्वयंघोषित लेखक ;)
सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने खुणा करून रास्ता दाखवला आहे प्रत्येक २० फुटावर (अंदाजे {नाहीतर काही वाद घालू मंडळी टेप घेऊन उभी राहतील मला खोटं ठरवतील }) बाणाच्या खुणा दिसू लागल्याने वेग वाढवला. अत्यंत वेगात चढाई सुरु झाली पाऊस थांबलेला जणू आमच्याचसाठी. 
बाणाच्या खुणा (याशिवाय किल्ला सापडणे अशक्य )आता एक डोंगरसोंड चढून काटकोनात डावीकडे वळलो. घनदाट पण पानझडी जंगल सर्वत्र. काहीच वेळात एक पठार आले हि पहिली माची म्हणता येईल. उजवीकडे उकसान धरण तर डावीकडे सर्वत्र तळी  साचलेली बाकी धुक्याचंच साम्राज्य. ५:३०झालेले. पलीकडील गावातील दोन जण चिंबोरीसाठी आलेले. अजून एक तास लागेल बोलले. 


पहिली माची
दुसरी माची 
    तसा वेग आणखी वाढवला अगदी सुसाट, धापा टाकत एका सरळ उभ्या खडकापाशी थांबलो. एक वाट उजवीकडे जराशी खालच्या दिशेने तर एक सरळ वरती. १० मिनिटात तेथील काही अवघड निसरडे टप्पे पार करून एकदाचे गडमाथ्यावर पोहचलो न हुश्श केले !! वेळ ६:११ मिनिट २:३० तसाची चढाई आम्ही केवळ ७० मिनिटात केलेली पाऊस सुरु झाला तरी घाम जात नव्हता. जाम थकलेलो बिस्कीट न पाणी आत ढकलला. नेमका पाऊस सुरु झाला ५/७ मिनिट सैरावैरा केली इकडे तिकडे शोधाशोध पण निष्फळ.  
शिखर गाठल्याचा आनंद


अवघड टप्पा


हेल्मेटधारी समीर
गुमतारा किल्ला हा वनदुर्ग आहे घनदाट जंगलात वसलेला १९४९ फुट उंच. या किल्ल्यावर नीरनिराळ्या प्रकारच्या अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात .किल्ल्यावर दगडात कोरलेले ७ टाक्या आहेत त्याचीतील एका टाकीची साधारण खोली हि ५ ते ६ फुट आहेत.इतर टाक्या बुजल्या आहेत. तसाच पुढे खालच्या बुरजाजवळ  दोन मोठ्या दगडांच्या मधोमध बारा महिने गोड पाण्याच्या नैसर्गिक झरा आहे. 
आता वेळ दवडून चालणार नव्हता उजेडाबरोबर उतरयाच  होत.
 • जरासं किल्ल्याच्या इतिहासाबद्दल-
किल्ला फारच दुर्लक्षित,त्यामुळे खचितच एखादा भटका एखादा फिरकतो .हा किल्ला टकमक किल्ल्याच्या पंधरा मैल दक्षिणेस दुगाड गावा जवळ आहे.किल्याला तसा इतिहासही आहे.ऐतिहासिक संदर्भातील नोंदणी प्रमाणे २४ मार्च १७३७ गुरुवारी मराठ्यांची टोळी माहुली किल्ल्याच्या रानातून बाहेर निघाली व पहाटे घोटवडाच्या अर्थातच गुमतारा दुगाडच्या रानात आली तो सबंध दिवस त्यांनी रानातच घालवला.दिवस उन्हाचे होते व प्रदेश अतिशय गर्मीचा होता त्यामुळे त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार होती.त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन दोन चार लोक ही मेली.
शिवकालीन संदर्भां पासून ते पेशवेकाळातील संदर्भात गुमतारा किल्ला  बरेच वेळा बेवसाऊ झाल्याची नोंद आहे.सध्या गडावर राबता न राहिल्याने वाटा सापडणे कठीणच किल्ल्यावर दुर्ग यात्रींचा फारसा सहवास नसल्याने हा किल्ला दुर्लक्षित आहे किल्यावरील दुर्ग अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.१८१८ मध्ये किल्ल्यावर काही बांधकाम झाल्याचे संदर्भ ठाणे ग्याझेट मध्ये उपलब्ध आहेत.

 (माहिती साभार - णेश रघुवीर यांच्या संकलनातून )
दुसऱ्या माची वरील वाट उतरताना
                  उतरून त्या फाट्यापाशी  आलो खाली जाणाऱ्या रस्तावर दौड सुरु केली बरेच आत गेलो बालेकिल्ल्याला वळसा घालून वाट मागून वरती जाते किल्ल्याचे बरेच अवशेष या वाटेनेहि पाहता येतात. जास्त वेळ गेलेला आता मागे फिरलो, अगदी धावतच. समीर न मी असे दोघेच त्या निबिड अरण्यात, काळोख सुरु व्हायला लागला. यात मनात एक विचार आला याक्षणी चकवा लागला तर गेलोच आपण.
 सम्याची प्रतिक्रिया - नावही काढू नको त्याच. 
पटापट उतरण चालू होती आडवे यणारे वेली, फांद्याआपोआप दूर फेकल्या जायच्या, रान डुकरांचे कळप रान कापत जावे तसेच चालले होते.तशातच "बालपणीच्या कारामतींनी गावात मांडलेला उच्छाद" याविषयावरील परिसंवाद रंगवत दोन्ही माच्या उतरलेल्याही कळलं नाही. गप्पा चांगल्याच रंगात आल्या असताना एके ठिकाणी अचानक थबकलो. तीन वाटा फुटलेल्या आता बाणाच्या खुणेची आठवण झाली.खुणा कुठेच दिसत नव्हत्या. वेळ ६:५० ची. 


समीर या वाटेवर गेला तर मी दुसऱ्या
उजवीकडील वाटेवर समीर गेला मी सरळ पुढे जाणाऱ्या वाटेवर गेलो  थोडा चाचपणीचा केविलवाणा प्रयत्न. एकमेकांना आवाज देत संपर्कात राहत शोधाशोध चाललेली. आमचं अंतर वाढलं प्रतिसाद मिळेना एकमेकांचा, अशा वेळी एकेकटे संपर्काबाहेर भटकणे म्हणजे भरकटनेच होते. मागे फिरलो समीर च्या दिशेने. त्यालाही काही सकारात्मक सापडले नाही न मलाही. पुरते वाट चुकलोय हे एव्हाना अधिकृतरित्या घोषित केलं होतच. 
          एकत्र आलो व खाली जाणाऱ्या वाटेवर जाईल तिकडे जायचं ठरल. वेळ कमी असल्याने इथं या घनदाट अरण्यात शेम्बडात माशी गुरफ़टावी तसे गुरफटत होतो. लवकर वाट मिळवणे गरजेचे होते. खाली उतरणाऱ्या वाटेवर वेगात दौडलो. जात जात फ्लॅश बॅक चालू केला. सर्व च  नवीन दिसत होतं, धबधब्यचा एक आवाज पुसटसा साथ देत होता हे आठवला, वाट,वळणे, झाडे, चढण, डोंगर सारेच नवीन वाटायला लागलं. अचानक थांबलो एका सागाच्या पानं झडलेल्या झाडावर सरसर चढलो. सर्वत्र दूरवर धुकच धुकं. काळोख होत होता त्यामुळे परिसर ओळखू येत नव्हता. उजवीकडे दूरवर नजर गेली न एक मोठ्ठ कोडं उलगडलं !!!
                      जिथं गाडी लावली होती ती वस्ती पुसटशी दिसत होती पण खात्री होती तीच ती. पण त्यामध्ये न माझ्यामध्ये आत्ता एक डोंगरसोंड आडवी होती जी कि गावात रास्ता दाखवला गेला तेव्हा मध्ये असं पार करून काहीच जायचं नव्हत. म्हणजे आम्ही त्या सोंडेवर जायचं सोडून पुढे खाली आलो होतो हि सर्व निरीक्षणे अत्यंत वेगात चालली होती त्याच वेगात तसेच त्या डोंगराच्या दिशेने धावलो झाडा झुडुपातून उतारावरून चाललो तर खरं पण जवळ जाताच एक कडा आडवा लागला आता समोर वाट तर दिसतेय पण जाता येईना ! पर्याय नव्हता. आता पुन्हा वरती चढायला सुरु केला उजवीकडे खुणा दिसत नाहीत तोपर्यंत चढाई चालू ठेवायचे ठरले तेही धावतच. आणि खूण  दिसली वेळ सायंकाळची ७:२२ ची. तब्बल ३० मिनिटं आमचं जहाज भरकटला होतं. या गडावर सहसा कोणी जात च नसल्याने वाटा पार पालापाचोळ्यात बुजलेल्या अंधार झाला न खुणा दिसल्या नसत्या तर रात्रभर फरफट झाली असती तस जीव घेणं नसतं  काही पण मच्छरांनी झोपू दिलं नसतं कि नीट बसू दिल नसतं. उपरमार झाली असती ती वेगळीच !! असो अनुभव व शारीरिक क्षमतेच्या जोरावर वाट मिळवण्यात यश आलं. 
              अजून बरंच बाकी होत उतरायचं. कधी दगडांत देव दिसला नाही पण आज खूण असलेल्या दगडांत मात्र देव दिसत होता. धावत पळत उतरलो आता ते दुथडी भरून वाहणारे ओढे, पाणी कमी झालेलं अंधारातच वाट काढत पार केले आता भाताच्या खाचरांत आलो बांधावर पाणी वाहत होते, चिखलतून वाट काढत ७:५५ ला गाडी पाशी पोहचलो एक टास्क पूर्ण झाला . 
त्या पाड्यावरून घोडवड गावात आलो काही गावकऱ्यांनी अगदी लक्षात ठेऊन आमचा वृत्तांत घेतला व वेगाची दाद दिली :D 
         आता म्हाळुंगे फाट्यावरून उजवीकडे ३ किमी आंबाडी फाट्यावर समोर एवढा मोठा फ्लाय ओव्हर  दिसल्यावर तोंडात बोटे गेली. 'ये कहा  आ गाये हम' असं आपसूकच बाहेर पडले!!! समोर ४ लेन रास्ता -भिवंडी वाडा-जव्हार आता सुसाट पणे समीर ने गाडी वाशीच्या दिशेने फेकली, वारेत-असनोली- पालखाने-धोंडावडवली- महापोली अशी बरीच गवे मागे टाकून भिवंडीचे गच्च ट्राफिक चे रान पार करून कल्याण मग शिळफाट्यानंतर तुरळक जंगल जे कि नामशेषीच्या मार्गावर आहे त्यातून पुढे नवी मुंबईत दाखल व एक सफल दौरा संपन्न. 

इथपर्यंत वाचणाऱ्याला धन्यवाद __/\__