लिंगाण्याचा समाचार
लिंगाण्याचा समाचार लिं गाणा !!! सह्याद्रीतील एक अजब रसायन. या एका शब्दाची व्याप्ती तोच जाणू शकतो ज्याने सह्याद्रीत पोटभर भटकंती केलीय आणि डोकंभर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केलाय. त्यास अधिक सांगणे न लगे. एक मानबिंदूच. प्रत्येक ट्रेकर चे स्वप्न असतंच एकदातरी लिंगाण्याच्या माथ्यावर पाय ठेवावा. तास हि माझ हि होतच परवाच ते सत्यात उतरलं... ! लिंगाण्याची अभेद्यता पाहावी ती रायलिंग वरून व रायगडाची भव्यता पहावी ती लिंगाण्यावरून च. असा हा मोक्याच्या जागी उठवलेला गगनचुंबी अभेद्य सुळका वजा किल्ला, किल्ले लिंगाणा _/\_ TEAM ULTIMATE _________________________________________________________________________________ हा तर झालं असं कि १७ मार्च २०१७ ला गंगटोक च्या MG रोड वर फेरफटका मारत असतानाच विषांत चा फोन आला ९ एप्रिल २०१७ रोजी देवा घाणेकर च्या नेतृत्वाखाली आग्याबॉईज मंडळ लिंगाणा करतंय आणि तुला यायला लागतंय. आता लिंगाणा ट्रेक ला नकार देण्याएवढं धाडस माझ्या अंगी नसल्याने आपसूकच कोणत्याही विचारांती होकार गेला. आणि मी ही ३ एप्रिलला महाराष्ट्रात पोहोचत होतो. गंगटोक च्या MG मार्