कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.
कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच .
Rayari kinara कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते. मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव वरून म्हसला मार्गे जाते येते. दुसरा मार्ग रोह्यातून केळघर घाटमार्गे राजपुरी आगरदांडा जेट्टी वरूनगाडी बोटीत टाकून दिघी बंदर असा प्रवास करत सायंकाळी सार्वा गावात पोहोचलो. गाडीची हि समुद्रउल्लंघनाची पहिलीच वेळ असल्याने याच मार्गाची उत्सुकता होतीच.
साबिरकाका वाट पाहत होतेच, एक डोंगररांग उतरून गावात प्रवेश केला,ते थेट काकांच्या घरीच गेलो. त्याचं घर हेच आमच मुक्कामाच ठिकाण आहे समजल्यावर तर आमच्या हरिणाचा उत्साह संचारला, कारणही तसच; अगदीच किनार्याला खेटून असं त्याचं घर इतकं कि, लाटांचे शिंतोडे अंगावर घेत ओसरीवर बसून चहा पिता यावा ! समोर अथांग समुद्र, अस्ताला जाणारा सुर्य, निळ्याशार सागरावर आकाशात भगवी छटा पसरवून सुर्यनारायण आकाशातच बुडाले होते . पाठीमागे नारळी फोफळी चे उंचच उंच वृक्ष , दूरवर काही सागरालाच समांतर होऊन आकाशात झेपावलेले. असा तो सुन्दर देखावा पाहत पाऊले कधी किनाऱ्यावरील वाळूत भटकायला गेली कळलच नाही. सूर्यास्त कॅमेराबद्ध करत असतानाच काका चहा घेऊन आले , तो वाफाळलेला चहा पीत आयुष्यातील एक सुरेख संध्याकाळ अनुभवत होतो. बराच वेळ किनार्यावर च होतो , मी, प्रशांत अन सोबतीला साबीर काका.काका त्या परिसराबद्दल भरभरून बोलत होते, तेथील जन्जीवानाबद्दल बोलत होते. त्यांनी तेथे फ्री फिशिंग (हाताने मासे पकडणे) हि दाखवले. तोपर्यंत रात्रीच जेवण तयार झाले होते, काकुनी मस्त अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण बनवलेले त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय.
जेवण आटोपून बाहेर पडलो, मस्त चंदेरी लाटांचा आस्वाद घेण्यासाठी चंद्राच्या उजेडात किनाऱ्यावरील वाळूत अनवाणी पायाने चालत फेऱ्या मारत असतानाच चांदणे ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करावा आणि क्षणार्धात फेसाळती लाट पायावरून जात बाजूला च दगडावर अडलावी न आपण भानावर यावे, असाच काहीसं होत होत. बराच वेळ बोचरी थंडी अंगावर घेत दूरवर समुद्रात होणार्या हालचाली न्याहाळत बसलो. एखादे शहर भासावे तसे त्य जहाजावरिल दिव्यांनी समुद्र चमचमत होता. दिघी बंदरात येण्यासाठी नांगरलेली ती जहाजे होती. १० च्या दरम्यान घरी आलो काकांनी झोपायची उत्तम सोय केलेलीच होतीच. खिडकीतून दिसणारा अथांग सागर व लाटांची लयबद्ध गुंज कानावर घेत कधीतरी निद्राधीन झालो.
सकाळी उठलो ते थेट किनाऱ्यावरच धावलो प्रशांतने कॅमेरा घेतलेलाच सोबत, चमचमणारे सूर्यबिंब ओहोटीमधील डबक्यामधून डोकावत होते, पाठीमागील डोंगरांतून सूर्योदय होत होता, माडाच्या झापामधून सुर्कीर्नाच्या होणारा शिडकाव भलताच गोड भासत होता. आन्हिक आवरून पुन्हा वाळूत येउन बसून नारळीच्या झापामधून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत हातात चहा बिस्कीट व सोबतीला समुद्रच सागर संगीत .…!!!!!
आता वेळ होती site seeing ची सार्वा गावाच्या मागच्या बाजूला जी डोंगररंग आहे त्यामध्ये एक धबधबा आहे, साधारण ५०/६० फुटाचा तो धबधबा साधारण जानेवारी पर्यंत वाहता असतो, अर्ध्या तासाच्या जंगल ट्रेक करून आपण थेट धाब्धब्यापाशी पोहचू शकतो. पूर्ण पणे सुरक्षित असा तो धबधबा family trip साठी छान पर्याय आहे.
इथून आजूबाजूला घनदाट जंगल तर समोर नारळीच्या बागेवरून थेट समुद्राचे दर्शन. मनसोक्त photography करून न्याहारीसाठी घरी येत असता वाटेत एक माडाचे बन लागले नारळाच्या उंचच उंच झाडावर लगडलेले शहाळे पाहून तोंडाला पाणी सुटले ना !! मग काय free climbing चा अनुभव कमी आला ना. सरसर झाडावर चढून तीन मोठे शहाळे काढले. न्घारी जाऊन मग मस्त प्रोग्राम ;) कोकणात जाऊन शहाळे पिणे तेही स्वत झाडावर चढून काढलेले वाहः मजा काही निराळीच !!
आता वेळ होती मणेरी येथील प्रसिद्ध light house दिप गृह पहायची. रस्ता किनाऱ्यावरूनच चालला होता बाजूलाच एक तले शाबीर काकांनी दाखवले तेथे मस्तपोहण्याची सोय होऊ शकते. नानावली गावात गाडी पार्क करून मणेरीकडे चालतच जाव लागते. डोंगराची एक निमुळती सोंड सरळ समुद्रात घुसलेली आहे त्यावर अगदी टोकाला तटरक्षक व बंदर (port) यांचे एक ठाणे आहे त्यावरच दीप गृह आहे ते ,अर्ध्या तासात च आपण तिथे पोहचतो. हे light house जहाजांना दिशादर्शकाचे महत्वाचे काम या ठिकाणावरून पार पडले जाते. संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने छायाचित्रणावर मर्यादा देऊन ते दीपगृह आतून पाहण्याची संधी मिळाली.
दीपगृह watch tower म्हणून हि काम पाहतो यावरून दूर दूर वर पसरलेला समुद्र दिसत होता, दिघी बंदरात येणारी व नागरलेली जहाजे दिसत होति. उजवीकडे कासा बेटावर शिवरायांनी वसवलेलं पद्मदुर्ग दिसत होता, जंजिरा जरासा डोंगरा आड असल्याने नजरेच्या टप्प्याबाहेर होता. तिथल्या अधिकाऱ्याचे आभार मानून परत नानवली गावात आलो जे आयुर्वेदिक औषधांसाठी ओळखले जाते. तिथून समुद्र दर्शन घेत दुपारच्या जेवणासाठी घरी अलो.
काकुनी मस्त जेवण बनवलेलेच होते येथेच्छ तव मारून काकांचा निरोप घेऊन आडगाव चौपाटी व वेलास चौपाटी कड रवाना झालो ४ किमी असणारी हि चौपटी खर्च या परिसराच्या सौदर्याला ४ चंद लावते. हि चौपाटी म्हणजे एक स्वप्नवत वाटणारासुंदर नजाराच अर्धचंद्राकृती आकाराचा किनारा, स्वच्छ पाणी ,गर्दी नाही, किंबहुना कोणीच नाही आपल्याशिवाय, निरव शांतता, किनाऱ्यावरील माडाची झाडे समुद्राला समांतर होऊन अचानक आकाशाला झेपावलेले, त्यावर चाललेली समुद्री पक्षांची किलबिल, लाटांचा लयबद्ध आवाज, आणि आम्ही दोघेच फोटो काढत उभे, एवढी निर्मनुष्यता खचितच मिळते !! सार्वा ट्रीप मध्ये हा बीच चुकूउच नये असा. "कोकण ,म्हणजे परमेश्वराला पाहते पडलेले सुंदर स्वप्नच" असौगिच नाही कोणी म्हणून ठेवले.
इथून पुढे वेळास १० किमी व दिवेआगार चौपाटी १८ किमी वे फक्त. व त्त्याना जोडणारा रस्ता म्हणजे निव्वळ स्वर्गच !!! उजवीकडे अथांग सागराचा लयबद्ध खेळ, तर डावीकडे झाडझूडपाणी वेढलेले बुटके डोंगर, अगदी दोइवरिल टोपी उडाली तरी समुद्रात जाऊन पडावी एवढा जवळून रस्ता . इथून मात्र वेळे अभावी वेळास व दिवेआगर येथील सुवर्णगणेश बघून म्हासला-माणगाव मार्गे मुंबईकडे रवाना झालो.
मळलेल्या पायवाटेव्यतिरिक्त आडवाटेवर रमणाऱ्यासाठी सार्वा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो . इथे आपल्यला काय मिळेल पाहायला ? -तर दिघी बंदर., जंजिरा तर अवघ्या १२ किमी वर जवळच पद्मदुर्ग, मणेरी दीपगृह, सार्वा धबधबा हा तर कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण, बाजूलाच सार्वा बीच, अद्गाव बीच, तसेच ग्रामीण जीवन जवळून बघण्यची संधी, किंभ्ना अनुभवण्याची संधी, see foods, साबीर काकांकडे तर माशांचे सर्व प्रकार उत्तमरित्या व चविष्ट केले जातात त्यामुळे आपले foodtravel पण होऊन जातेच समुद्रकिनारी टेंट लाऊन साग्रसंगीत ऐकत रात्र घालविण्याची मजाही घेत येऊ शकते.
या स्थळास भेट द्यायची असल्यास साबीरकाका 7588650329 यांना संपर्क करू शकता .
-विशेष आभार- मुग्धा येळकर -
कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच .
सूर्यास्त |
Rayari kinara कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते. मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव वरून म्हसला मार्गे जाते येते. दुसरा मार्ग रोह्यातून केळघर घाटमार्गे राजपुरी आगरदांडा जेट्टी वरूनगाडी बोटीत टाकून दिघी बंदर असा प्रवास करत सायंकाळी सार्वा गावात पोहोचलो. गाडीची हि समुद्रउल्लंघनाची पहिलीच वेळ असल्याने याच मार्गाची उत्सुकता होतीच.
बोटीत आमची गाडी चढवताना |
संध्याकाळीचे काही क्षण |
फेरफटका . ओहोटीला गेलेल्या समुद्रावरून |
साबीर काका तेथील परिसराची माहिती देत होते |
जेवण आटोपून बाहेर पडलो, मस्त चंदेरी लाटांचा आस्वाद घेण्यासाठी चंद्राच्या उजेडात किनाऱ्यावरील वाळूत अनवाणी पायाने चालत फेऱ्या मारत असतानाच चांदणे ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करावा आणि क्षणार्धात फेसाळती लाट पायावरून जात बाजूला च दगडावर अडलावी न आपण भानावर यावे, असाच काहीसं होत होत. बराच वेळ बोचरी थंडी अंगावर घेत दूरवर समुद्रात होणार्या हालचाली न्याहाळत बसलो. एखादे शहर भासावे तसे त्य जहाजावरिल दिव्यांनी समुद्र चमचमत होता. दिघी बंदरात येण्यासाठी नांगरलेली ती जहाजे होती. १० च्या दरम्यान घरी आलो काकांनी झोपायची उत्तम सोय केलेलीच होतीच. खिडकीतून दिसणारा अथांग सागर व लाटांची लयबद्ध गुंज कानावर घेत कधीतरी निद्राधीन झालो.
काकांच्या घरातील आमची झोपेची व्यवस्था |
मी व प्रशांत |
सकाळी उठलो ते थेट किनाऱ्यावरच धावलो प्रशांतने कॅमेरा घेतलेलाच सोबत, चमचमणारे सूर्यबिंब ओहोटीमधील डबक्यामधून डोकावत होते, पाठीमागील डोंगरांतून सूर्योदय होत होता, माडाच्या झापामधून सुर्कीर्नाच्या होणारा शिडकाव भलताच गोड भासत होता. आन्हिक आवरून पुन्हा वाळूत येउन बसून नारळीच्या झापामधून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत हातात चहा बिस्कीट व सोबतीला समुद्रच सागर संगीत .…!!!!!
सक्काळी सक्काळी |
आता वेळ होती site seeing ची सार्वा गावाच्या मागच्या बाजूला जी डोंगररंग आहे त्यामध्ये एक धबधबा आहे, साधारण ५०/६० फुटाचा तो धबधबा साधारण जानेवारी पर्यंत वाहता असतो, अर्ध्या तासाच्या जंगल ट्रेक करून आपण थेट धाब्धब्यापाशी पोहचू शकतो. पूर्ण पणे सुरक्षित असा तो धबधबा family trip साठी छान पर्याय आहे.
धबधब्यावर |
झाडावरून शहाळे काढताना |
चढायची कसरत |
आणि काढलेल्या शहाळे हातात घेऊन स्वतः ब्लोग लेखक |
मणेरीचा दीप गृह दुरूनच |
दुपारचे जेवण |
आदगाव चौपाटी |
एकांतात चौपाटीवर वावर |
इथून पुढे वेळास १० किमी व दिवेआगार चौपाटी १८ किमी वे फक्त. व त्त्याना जोडणारा रस्ता म्हणजे निव्वळ स्वर्गच !!! उजवीकडे अथांग सागराचा लयबद्ध खेळ, तर डावीकडे झाडझूडपाणी वेढलेले बुटके डोंगर, अगदी दोइवरिल टोपी उडाली तरी समुद्रात जाऊन पडावी एवढा जवळून रस्ता . इथून मात्र वेळे अभावी वेळास व दिवेआगर येथील सुवर्णगणेश बघून म्हासला-माणगाव मार्गे मुंबईकडे रवाना झालो.
काही निवांत क्षण |