|
बकथान्ग धबधबा |
सिक्कीम ची सैर
खूप दिवसाची
पूर्वांचल भटकंतीची इच्छा पूर्ण होणार होती, ऑगस्ट २०१६ कोलकाता येथून दुचाकीवरून सुरु झालेला प्रवास पश्चिम बंगाल, असम, मेघालय, त्रिपुरा, मिझो, अरुणाचलप्रदेश करून आता वेध लागलेले ते सिक्कीम या राज्याचे.
भूतान देशाला वळसा घालून असम, बंगाल प्रांतातून प्रवास करून सिक्कीम जावे लागणार होते. प्रचंड वादळी वारा व पाऊस यामुळे प्रवासाचा १८ वा मुक्काम अनपेक्षितरित्या धुपगुडी येथे पडला. ७ सिस्टर्स गटात अलीकडेच समावेश झालेले हे एक छोटंसं पण नितांत सुंदर राज्य आता माझ्यापासून फक्त १२८ किमी दूर होतं. १६४२ मध्ये
फूंटसोंग नामग्यालने नवे राज्य स्थापन केले म्हणून मग याचे नाव नवे घर किंवा राजवाडा म्हणजेच सिक्कीम. सिक हिम अशी संस्कृत मध्ये संज्ञा. तर तिबेटी लोक या भूमीला भाताचे कोठार म्हणून ओळखतात.
तब्बल ४५०० किमी प्रवासात सोबत केलेली होंडा शाईन आता हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सिक्कीम साठी सज्ज झालेली. भल्या पहाटे धुपगुरी सोडल व मायनागुरीतुन गाडी उत्तरेला
गोरूमारा अभयारण्यातून धावू लागली, हत्ती व बिबट्यांसाठी ओळखले जाणाऱ्या या जंगलात अनेकठिकाणी
'हत्ती रस्ता क्रॉस करत आहेत गाडी सावकाश हाका' अशा आशयाचे बोर्ड वाचून मन अगदी हत्तीच्या कळपात कधी फिरून आलं कळलंच नाही. वेळ सकाळची होती, सूर्यनारायण आपली प्रभा वाढवून रवीकिरणांना जंगलात खोलवर पोहचण्यास प्रवृत्त करू लागलेले, ती तिरकस सोनेरी सूर्यकिरणे उंचच उंच वृक्षराजीतून वाट काढीत काळ्याकभिन्न रस्त्यावर गालिच्याप्रमाणे पसरलेलं दृश्य डोळ्यांत साठवत आता मी महानंदा अभयारण्यात प्रवेश करता झालेलो. विविध प्रकारच्या माकडांची परिचित असलेले हे जंगल पार करून थेट आता
तिस्ता नदीच्या अवखळ पात्रासमोर जरा वेळ स्थिरावलो, हिमालयातल्या रांगांतून शुभ्र मातीचा गाळ सोबत घेऊन धावणारं या नदीचं हे अरुंद पात्र इथे मात्र बंगालच्या सपाट मैदानी प्रदेशात येताच शांतपणे मैलों मैल उभे आडवे पसरत सोबतचा गाळ नदीकाठाला साठवत जातं.
|
गोरुमोरा अभयारण्यातील एक सुंदर |
|
तिस्ता नदी |
तिस्ता नदीवरील सेवोक येथील पुलाला
कॉरोनॅशन ब्रिज असं नामकरण राणी एलेझबेथ च्या
१९३७ साली कॉरोनेशन कार्यक्रमामुळे दिले गेले आहे, हा पूल
१९४१ ला बांधून पूर्ण झाला, येथील २ वाघाच्या पुतळ्यामुळे स्थानिक याला
बाघ पूल पण म्हणतात. तर अशा या सेवोक पुलावरून आपण हिमालयत प्रवेश करतो ते या तिस्ता नदी काठाने नयन रम्य निसर्गाच्या कुशीतून, घनदाट जंगलातून जाणाऱ्या नागमोडी रस्त्याने. तिस्तानदी आपल्याला सांगताम इथपर्यंत साथ देते व नंतर या रस्त्यालाराणी खोला या नदीच्या काठावर सोडून उंत्तरेकडील पर्वतांत दिशेनाशी होते. आता रस्ता चढणीला लागतो व आपण हळूहळू गंगटोक च्या जवळ पोहचतो. उजव्या बाजू ला राणी खोला नदी व तिच्यावर उभारलेले हायड्रोपॉवर स्टेशन्स व त्यांचे जलाशय परिसराची शोभा आणखीणच वाढवतात. हे सर्व सृष्टी सौंदर्य मागे सोडून आता मी धुक्याची दुलई पांघरलेल्या व हलकेच झालेल्या रिमझिम पावसात न्हाऊन निघालेल्या गंगटोक या गिरीशहरात दाखल झालो.
१६०० मीटर्स उंचीवरील
गंगटोक हे भारतातील एक अप्रतिम हिलस्टेशन. स्थानिक
गान्तोक असाही उच्चार करतात. गंगटोक म्हणजे गिरीमाथा. तर अशा या शांत रम्य व व सुखद गारवा, स्वच्छ रस्ते व आल्हादायक हवेचा आनंद घेत तब्बल २ तास शोधाशोध करून MG रोड ला एक स्वस्त न मस्त हॉटेल मिळवलं व सामान टाकून गूगल ला सोबतीला घेऊन बाहेर पडलो.
|
एक सहज सुंदर क्लिक |
मुख्य चौकात एक नोटिस दिसलं "
SSB जवानांच्या तुकडीच्या वाद्यवृंद पथकाचे संचलन १५ ऑगस्ट निमित्त सायंकाळी ६ वाजता होणार होते, आत्ता २च वाजलेले त्यामुळे ६ ला यायचे ठरवून मी ताशी विव्ह पॉईंट कडे रवाना झालो, वाटेत
बकथान्ग नावाचा छोटासाच पण अतिशय सुंदर असा धबधबा पाहून पुढे ७ किमी वरील ताशी पॉईंट व वरून दिसणारं जगातील उंचीने ३ ऱ्या क्रमांकावर असणारे
कोन्गचेन्गडझोन्गा (कांचनगंगा ) तर बाजूचेच
सिनिऑलचू या बर्फाच्छादित शिखरे ढगांशी लपंडाव खेळण्यात मग्न होते ते विहंगम दृश्य डोळ्यात साठवून पुन्हा MG रोड कडे परतलो. आता इथे
ssb जवानांची मस्त संगीत मेहफिल रंगलेली, त्यांनंतर MG रोड मस्स्त फेरफटका झाला गंगटोक मधील हा एकमेव मोठा रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची दुकाने आहेत त्यामुळेच हा रस्ता नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. याच्या खालच्या बाजूला
लालबाजार नावाचा एक मोठा बाजार आहे इथे आपल्याला देशी विदेशी बनावटीच्या हर एक वस्तू पाहायला मिळतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी
नाथु ला पास साठी परमिट बनवणे वगैरे सोपस्कर पार पाडून १० वाजता खासगी वाहनाने नाथुला कडे निघालो. वाटेत
त्सोम्गो लेक व बाबा मंदिर हि दोन महत्वाची आकर्षणे या तिन्ही ठिकाणांसाठी एक संपूर्ण दिवस हाताशी असावा. गाडीची पुरेशी कागदपत्रे जवळ नसल्याने मला खासगी वाहनाने जावे लागले एका सुमोत १० जण स्वतःला कोंबून घेऊन आम्ही १६०० मीटर्स वरून ४३१० मीटर्स वरील नाथू ला कडे कूच केली. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा रस्ता, खडी चढण, तीव्र वळणे अरुंद रस्ता, बर्फ वितळून रस्त्यावर आलेले पाणी अशा भयानक परिस्तिथीतून गाडी चीन च्या दिशेने सरकत होती. एका बाजूला उंचच उंच पर्वत तर एकीकडे खोलखोल दऱ्या दूरवर बर्फाच्छादित शिखरे असे डोळयांचे पारणे फेडणारे दृश्य तळे १६ मीटर्स खोल आहे या संपूर्ण प्रवासाचे सार्थक झाल्याचे सूचित करत होते. ऑगस्ट असल्याने सभोवताली बहरलेली
ऱ्होडोडेन्ड्रॉन, प्रिम्यूला पॉपीज वगैरे फुले वातावरण कसे रंगीबेरंगी करत होती. बदके, स्थलांतरित पक्षी तर कधी रेड पांडाहि त्या जंगलात दर्शन देऊ शकतात.
|
पांडा (कसं बघतंय ) |
आता बऱ्यापैकी उंची गाठलेली असते, जंगल रास्ता, हिरवळ मागे पडून अतिउंचीवरील ओसाडपणा दिसू लागतोय, लवकरच आपण त्सोम्गो तलावापाशी पोहचतोय. ३७८० मीटर्स उंची वरील त्सोम्गो किंवा छांगु लेक म्हणजे एखादा सुंदर असा कॅनव्हास च !!! १. ६१ किमी लांबीचे हे लंबगोलाकार सरोवर १६ मीटर्स खोल आहे.
भुतिया भाषेत त्सोम्गो म्हणजे सरोवरांचा उगम. कितीतरी वेळ नजरेला समांतर राहणारे हे तळे हिवाळयात मात्र संपूर्ण गोठलेले असते. सिक्कीमी जनता या सरोवराला पवित्र मानतात. काठावरच एक शिवमंदिर आहे. ऑगस्ट मध्ये वातावरण अत्यंत बेभरवशी. त्यामुळे कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी दाट धुके त्यामुळे तलावाचं मनसोक्त असं दर्शन घेता नाही आलं. थोडं पुढे गेले कि स्टेथेन ताशी केव्ह नावाचं एक तीनमजली अप्रतिम असं लेणं आहे ते नक्की पाहावं सुमोवाले टाळाटाळ करतात पण आपण मात्र 'सारखं लावून धरायचं' !
|
नाथू ला खिंडीतील हि इमारत |
|
सिक्कीम मधील सौंदर्य |
आता आपण आणखी उंची गाठतो ते थेट नाथूला खिंडीच्या पायथ्यालाच पोहचतो.
३९६५ मीटर्स वर टॅक्सिचं शेवटचा थांबा असल्याने इथून पुढे उरलेलं अंतर पायीच जावं लागते. हा प्रवास खूपच आनंददायी ठरतो कारण आजूबाजूचं वातावरण ! विविध प्रकारची छोटी छोटी फुले आजूबाजूला वाऱ्याचा झोतावर नृत्य करत असतात तर दूरवर फेसाळते धबधबे स्वतःला खोल खाईत झोकून देताना दिसतात उंची ४३१० मीटर्स त्यामुळे कड्कयची थंडी व बर्फ सततच. विरळ हवा ऑक्सिजन ची मात्र अत्यंत कमी त्यामुळे काहींना खात्रीने त्रास होऊ शकतोच.
आता पायरीचा मार्ग सुरु होतो वाटेत मध्येच डाव्या बाजूला हुतात्मा जवानांचे एक स्मारक लागते. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांचे स्मरण करून शेवटचा टप्पा पार करायचं मग येतो आपण थेट चिनी सैन्यांच्या समोरासमोर इथे भारत व चीन यांच्या समोरासमोर एक एक इमारती आहेत दोन्हीच्या मध्ये तारेचे कुंपण आहे. इथे फोटो काढायला पार बंदी आहे. डावीकडे बंद केलेले एक गेट दिसते त्यातून चीन मध्ये रस्ते मार्गे जाता येते. भारत चीन यांच्यातील व्यापार वाढीसाठी या मार्गावर सरकारतर्फे भर देण्यात आला आहे चीनची वाहने
१६ किमी आत भारतात येऊन सूचित केलेला ठरावीक माळ भरून पुन्हा चीन मध्ये जातात तस या जागेबद्दल लिहायचं तर एक स्वतंत्र लेख च होऊ शकेल.
सिल्क रूट वरील हि अत्यन्त महत्वाची खिंड पाहून आम्ही परत फिरलो ते बाबामंदिर पाहण्यासाठी.
एका सैनिकाच्या स्मृतीसाठी बांधलेले हे एक मंदिर. पंजाबातील एक खेड्यातील हरभजनसिंह नावाचा युवक १९६६ ला लष्करात दाखल होतो व भारत चीन सीमेवर ४ ऑक्टोबर १९६८ ला एका चकमकीदरम्यान शत्रूला पिटाळून लावत असताना मृत्यूस कवटाळले. यांचा मृतदेह पाण्यातून वाहून गेला प्रचंड शोधाशोध करून हि सापडत नाही. शेवटी साथीदाराच्या स्वप्नात जाऊन हे आपल्या मृतदेहाच्या जागेबद्दल अचूक मार्गदर्शन करतात आश्चर्यकारक रित्या मृतदेह सापडतो. त्यानंतर त्यांची समाधी बांधली जाते व हरभजनसिंह यांचे बाबाहरभजनसिंह असे सैन्यांस स्पुर्ती देणारे दैवत बनून राहतात. आजही
बबहरभजनसिंह जिवंत आहेत असे मानून त्यांची सुट्टी, कपडे, बैठक खोली ची व्यवस्था भारतीय सैन्याकडून लावली जाते. नाथू ला खिंडीत बाबाहरभजनसिंह तर तिकडे अरुणाचलप्रदेशातील चीन सीमेनजीक बूम ला खिंडीच्या रस्त्यावर
जसवंतसिंह हे आज हि भारतीय सैन्यास प्रेरणास्थान म्हणून मानले जातात.
|
बाबा हरभजन सिंग मंदिराबाहेरील माहिती फलक |
आता पार्टीच्या मार्गवर आलेलो, तीव्र उतारावरून अत्यंत कौशल्याने चालकाने गंगटोक मध्ये पोहचवलं. दरम्यान च्या काळात मी राजभवनाशी इमेलच्या माध्यमातून संपर्क साधला होताच तिकडून सकारत्मक प्रतिसाद आलेला आणि पुढच्याच दिवशी माझी सिक्कीम चे राज्यपाल
मा. श्री. श्रीनिवास पाटीलसाहेब यांच्याशी भेटण्याची इच्छा पूर्ण होणार होती. इरफान सय्यद या त्यांच्या स्वीयसहाय्यकाशी फोन वर बोलणे झाल्यावर त्यांनी थेट राजभवतील विश्रामगृहात माझी राहण्याची व्यवस्था केली व राज्यपाल साहेबांनीही अत्यंत आपुलकीने विचारपूस केली राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती महाराष्ट्रातून येणाऱ्यांचे अगत्याने पाहुणचार करून मनमोकळेगप्पा मारताना पाहून मा. पाटील साहेबांचे आभाळाएवढे विशाल मन व मातीशी जोडलेली नाळ दिसून येते.तदनंतर मी दिवस भर येथेच्छ दुचाकीवरून भटकून रात्री राजभवनच्या विश्रामगृहात मुक्कमी.
|
सिक्कीम चे महामहिम राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील |
|
राजभवन परिसरातील सेल्फी |
रुमटेक मोनेस्टरी गंगटोक पासून २४ किमी पूर्वेला असलेली एक सुंदर मोनेस्टरी. गंगटोकची टेकडी उतरून एक नदी पार करून पुन्हा एका उंच डोंगरावर चढाव लागते रस्ता फार मजेशीर वाटतो, घनदाट जंगलातून जाणाऱ्या वळणावळणाचा रस्त्यावर गाडी चालवताना भलतीच मजा येत राहते. १तासाच्या प्रवसांनंतर आपण रुमटेक ला पोहचतो.
धर्मचक्रकेंद्र असेही ता मंदिराला म्हणतात लामा साठी बौद्ध धर्म व तिबेटी भाषा यांचे शिक्षण देणारी शाळाही येथे आहे. याच्या समोरील एका छोट्या सभागृहात ग्रेट गोल्डन स्तूप हि आहे यावर विविध रत्ने जडवलेली दिसून येतात. इथून बाहेर पडलो कि परतीच्या मार्गावर १ किमी अंतरावर २०००० मीटर्स उंचीवर
नेहरू बोटॅनिकल गार्डन आहे.
वनस्पतीशास्त्रात रुची असणाऱ्यांसाठी हे गार्डन म्हणजे नंदनवनच. ! शेकडो विविध दुर्मिळ प्रजाती इथे जातं कारण ठेवलेल्या दिसतात. तर अर्चिड चे कित्येक प्रकार फुललेलं असतात. इथून आता मी पुन्हा गंगटोककडे रावांना होते थेट गणेशटोकडेच तसं पाहिलं तर कांचनगंगा शिखर सिक्कीम मधून कुठूनही सहज दिसतं पण भन्नाट फोटो काढायचे असतील तर गणेशटोकावरूनच शक्य. याच्या समोरच
हिमालयीन झोलोजिकल पार्क आहे उत्तर पूर्व हिमालयातील अनेक हिंस्र प्राणी येथे मुक्त संचार करतात. एका भल्यामोठ्या टेकडीवर घनदाट जंगलात नैसर्गिकरित्या तयार केलेलं हे पाहिलं झू असावं.
संध्याकाळी पुन्हा एकदा बकथान्ग फॉल्स जवळ गाडी थांबवली. व मुक्कामी राजभन गाठलं. पुढच्या दिवशी भल्या पहाटे गंगटोक वरून दार्जिलिंग कडे गाडीने वेग घेतला व हळू हळू सिक्कीम मागे पडून मी पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करता झालो.
तसं लिहायला खूप आहे पण लेखनसीमा. !!
-योगेश आलेकरी
९७०२५२५४३५
अधिक ची छायाचित्रे
|
रुमटेक मोनेस्टरी |
|
महानंदा अभयारण्य |
|
ब्लॉग लेखकाची कॉरोनेशन ब्रिज च्या पार्श्वभागावर एक कडक छबी |
|
सदैव तय्यार होंडा शाईन |
|
म. गां. मार्ग गंगटोक |
|
SSB चे वाद्यवृंद |
|
ट्रेकिंग च्या मूड मध्ये ब्लॉग लेखक स्वतः |
|
जंगल । रास्ता । दुचाकी । एकांत |
|
घनदाट एकांत |
|
नाथू ला पास |
|
जवानांसंगे |
|
रस्त्याची देखरेख करतानाची छबी |
|
छांगु किंवा स्मोगो लेक |
|
छांगु किंवा स्मोगो लेक |
|
बोटॅनिकल गार्डनात |
|
पोराना लिफ्ट |
|
SSB |
|
पाठीमागे नाथू ला |
|
५००० किमी च्या पूर्वांचल प्रवासात साथ देणारी हीच ती |
हा आता जरा कामाचं ...
- भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
- निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा.
- सुशिक्षित वागा (नसले तरीही दिखावा करा )
समाप्त :
(कड काढल्याबद्दल धन्यवाद )