Saturday, 2 April 2016

आठवणीतील माणिकगड

आठवणीतील माणिकगड 

पट कथेचे नाव- आठवणीतील माणिकगड  
लेखन- योगेश आलेकरी
विषय- गिर्यारोहण
ठिकाण - सह्याद्री पर्वतराजी
कलाकार- योगेश , समीर , महेश
 हा… तर झाले असे कि, आम्ही माणिकगडावर गिर्यारोहण करायला निघालो व चित्रविचित्र अनुभव घेऊन परत आलोही हि, त्याबद्दल घेतलेला हा धावता आढावा-

इकडे महाराष्ट्रात सालाबादप्रमाणे यंदाही पावसाळा आला होता. नेहमीप्रमाणे तो मे च्या काहीसा नंतर व ऑक्टोबर च्या काहीसा आधी आला पैकी ऑगस्ट महिन्यातील एका दिवशी आम्ही वर उल्लेखलेल्या गडावर जायचं ठरवल अगदी अचानक !! मी, महेश, समीर व सोबतील चिले सर यांचे एक पुस्तक. पैकी आमची तत्कालीन परिस्थिती अशी कि, मी काहीसा तुरळक आजारी, समीर सक्काळीच रक्तदान करून आलेला(त्यामुळे झालेला उशीर), व महेशराव रात्रभर जागरण झाल्याने डोळे लाल करून आलेला.
   नियोजन (????)अचानक झाल्याने गडाबद्दल व वाटेबद्दल पुरेपूर माहिती घेता आली नव्हती. मी कोणत्याच मनस्थितीत नसल्याने नियोजन व पथदर्शन या दोघांवर सोपवलेले.
 पनवेल वरून ११:४५ ची बस पकडून १२:४७ ला वाशिवली गावात दाखल. पुढे खानाखजाना उरकून वडगावात २:०० IST  वा. दाखल . घाईनेच गावातून वाट विचारून घेऊन चालू पडलो. चुकीचा पहिला फटका बसला, चांगली दिसली म्हणून निवडलेल्या वाटेने पूर्ण गावाची भातशेती फिरून दाखवली. पुन्हा गावात येउन योग्य (??)वाट धरून निघालो पावसाने जोर वाढवल्याने परिसर अंधुक झालेला. एका पठारावर पोहोचलो व होती  नव्हती तीही  वाट वाढलेल्या गवताने गिळंकृत केलेली. शोधाशोध चालूच होती पावसाने पूर्ण धुमाकूळच घातला होता. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सैरभैर वाटचाल चाललेली (भलतीकडेच). तशातच तिथे एक गाववाला भेटला फुल तर्राट, गावठी इफेक्ट. जेमतेम १५ मिनिटे पुरेल  एवढी वाट त्याने पुरवली. पुन्हा एक पठार लागले माजलेल रान, गवत, डबकी याचाच अंमल. पावसाचा मारा चालूच.!!
एक चर्चासत्र रंगलं. तर्क वितर्क झाले न एक थोडीशी मळलेली वाटलेली वाट मिळवली व चालू पडलो, खाली मन घालून. !! एवढ  माहित होते कि गडाला उजवीकडून  वळसा घालून  वाट पाठीमागून गडावर जाते, दुरवर गड दिसत होता पण उजवीकडे वळण्याची संधी मिळत नव्हती. उजव्या बाजूला एक टेकडीवजा डोंगर सोंड होती तिच्या पलीडून गडची वाट असल्याची दाट शक्यता होती म्हटल हीच वाट जाईल त्यावरून पलीकडे. पण वाट वर न चढताच नुसतीच पुढे पुढे  घेऊन जात होती, निबिड अरण्य, मुसळधार धो-धो कोसळणारा पाऊस, झाडांचा आवाज व आमची चर्चा (सकारात्मक) वातावरण भेदत होती. पावसाने एवढे बधिर केलेले कि, वर बघणे पण मुश्कील. !
अन एका क्षणाला आम्ही अचानक थबकलो …समोरच्या झाडाझुडपांतून जोरदार हालचाली झाल्या, आम्ही स्तब्ध.…. थोडसं धाडस करून पुढे सरकलो आणि समोरचं  दृश्य बघून पटापट झाडे पकडून उभे राहिलो. आणीबाणी झालीच सरसर झाडावर चढता याव या उद्देश.
हां तर समोर ५०-६० गाई- बैलांचा कळप आमच्या आगमनाने सावध झालेला. सार्वजन आमच्याकडेच  तोंड करून कान टवकारून उभे, पहिल्या फळीत ४-५ उमदे बैल आक्रमक पवित्र्यात उभे, अगदी २० फुटांवर. मोकाट जनावरांचा भरवसा काय ?? पण इतक्यात एका अतिसंवेदनशील सदस्याने परिस्तिस्थिचे (आमच्या) गांभीर्य ओळखून पलायनवाद स्वीकारला व बाकीच्यांनी एक मताने त्याला अनुमोदन दिल्याने आजूबाजूची झुडुपे विस्कटत, चिखलगाळ उडवीत, पावसाच्या सुरात भसाडा आवाज  मिसळत तो कळप दिसेनासा झाला व आम्ही पुढे एका स्थानिक मद्यनिर्मिती केंद्राजवळ येउन दाखल झालो. पाण्यचा झरा पार करून पुढे  काही अंतरावर आणखी एक मोहमिश्रित मद्यनिर्मिती केंद्र लागले. रस राशीत निखारे पाहून अंदाज बांधला कि केंद्रावरचे कर्मचारी आमची केमो कलर कपडे पाहून पसार झालेले असावेत.
मध्येच जंगलातून गड दिसल्याने आलेली एक reaction 

पावसाची उघडीप मिळाली, वेग वाढवला. आणि जंगलातून बाहेर पडताच समोर माणिकगडाचा  सरळसोट  कातळकडा पुढ्यात. वाट संपली, वाट लागली. उजवीकडून मारायचा वळसा उजवीकडेच राहिला. आम्ही चक्क ३ तास चुकीच्या वाटेवर चालत होतो. उजवीकडील डोंगरसोंड आमच्याकडे कुत्सितपणे पाहु लागली होती. आता त्या डोंगरावर गेल्याशिवाय पर्याय नव्हता. कोणत्या तरी उंच ठिकाणी गेल्याशिवाय बरीच कोडी उलगडणार नव्हती. एक नाळेतून वरती चढण्यचा अयशस्वी प्रयत्न  झाला, तिथे एका निसरड्या दगडाने सम्याला दलेला प्रसाद सम्या त्यावर अधून मधून झेंडू बाम चोळून आठवत असतो.
अगदी गडाच्या पायथ्याला पोहचलो पण चुकीच्या जागी 


बाजूने वाढलेल्या गावातून उतार पाहून वर चढून गेलो आणि उलगडलेली कोडी अशी -
  • रस्ता पूर्ण पणे  चुकलेला. 
  • ज्या वाटेने आलो ती वाट 'मद्यपींनी मद्यपींसाठी चालवलेली' वाट होती . 
  • या डोंगराच्या उजव्या बाजूने खालून जी वाट दिसतेय ती गडावर जाणारी आहे, व अजून २:३० तासाची चढाई बाकी आहे व वेळ ४:४३ मिनिट. 
पडलेले प्रश्न -
  • भावनेच्या भरात आत्ता गडावर गेलो तर येणार कसा ? विजेरी एकही नाही. 
  • मग काय रिकाम्या हाती घरी परत ??
  • रहाच कुठ ? खायचं काय ? मुक्कामाचा कोणतच  साहित्य सोबत  नव्हत. 
सोबत आणलेल्या इडल्या खात खात उत्तरे मिळवली व मुक्काच्या  शोधात निघालो. नकाश्यावर एक कातकरवाडी दाखवत होती. तिकडे जाता जाता वाटेत पहिला धक्का बसला - सकाळी जिथून चुकीची वाट धरली तिथून थोड जरा पुढे आलो असतो तर आत्ता गड उतरून परतीच्या प्रवासाला असतो.
तिथ आलो अन् समजला वाडीच पुनर्वसन झालाय, भग्न उध्वस्त झालेला तो पाडा आमचे प्रश्नांकित चेहरे पाहून चिंतीत झाला असेल. दूरवर एक निळे छप्पर दिसले, ३७ मिनिटांच्या दुडक्या चालीने ठाकूरवाडी नावाच्या गावात आलो. हे वाशिवली पासून १५ मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजे आम्ही पुन्हा अगदी पायथ्याला आलेलो.
गावात आल्यावर चा एक क्लिक 

     गावात आलो आणि धक्क्यांवर धक्के मिळत गेले. एका सज्जन व्यक्तीकडे निवाऱ्याची मागणी केली त्यासाठी शाळा   मंदिराची चौकशी करता गुरुजींशी फोन वर बोलणी करून शाळेची चावी मिळवली अन् एक प्रश्न सुटला… !!या परिस्तिथित जिथे पाठ टेकवायला जागा मिळावी हि अपेक्षा असताना चक्क मार्बल ची रूम  मिळाली सोबत मोबईल व कॅमेरा चार्गिंग ची सोय म्हणजे अहो भाग्यं !!
ब्लोग लेखकाची लेखन मग्न अशी एक दुर्मिळ छबी ;) ;)

माह्या पुस्तक वाचनात गुंग 
 या धक्क्यांतून कसेबसे सावरून बाहेर आलो तोच एक प्रचंड धक्का बसला- उरलेले २ बिस्कीट पुडे व अर्धा पुडा ब्रेडवर भागेल या चर्चासत्रात गुंतलो असतानाच त्या सज्जन कुटुंबाची गृहिणी जेवणाची विचारपूस  करायला आली  'जेवणाचे किती ?' हा टिपिकल ट्रेकरी प्रश्न विचारून स्वताचेच हसे करून घेतले ना !!.त्यावर त्यांचे उत्तर - " तुम्ही पाहुणे आहात आणि पाहुण्याचे जेवणाचे पैसे घेण्याची पद्धत नाही आमच्याकडे." अक्षरश: पाणीच यायचं बाकी होत डोळ्यातून . झालं ... जेवण तयार असल्याची वर्दी आली, हात पाय धुवायला चक्क गरम पाणी पाहून तर रडूच कोसळलं !!काय ती खातिरदारी कधी घरातून गरम पाणी मिळालं  नव्हतं ;) हेही कसं बसं सहन केलं. आत गेलो, तिघांना तीन पानं  सतरंजी टाकून लावलेली . वरणभाताचा मस्त सुगंध येत होता पापड, लोणचं,वांग्याची भाजी जनु आमची वाटच  पाहत होते. T. V. वर फिर हेर फेरी मध्ये अक्षय व परेश रावल यांची   
ची मस्त विनोदी जुगलबंदी पाहत जेवणे आटोपली.
जाताना केरोसीन चा दिवा, हेडल्यम्प , नको नको म्हणताना ३ ब्ल्यांकेटस् हातात पडली. जरा शेकोटी पेटवावी म्हणून २ लाकडांची ओघवती मागणी काकांकडे केली न ढीग भर लाकडे शाळेसमोर पडली ऐन पावसाळ्यात सुख्या लाकडाचा दुष्काळ असतानाही. व गप्पाना साथ ही दिली.
दूरवर चमकणारा एक्स्प्रेस हायवे (मुंबई पुणे द्रुतगती मार्ग )  पाहत निरव शांततेत मन भरून  घेऊन कधी झोपी गेलो कळलेच नाही.
शेकोटीला सोबत देणारे गावातील मित्र 

लहान खेळत मग्न बालगोपाळ 

शेकोटी 
              आता उठून सकाळच्या धक्क्यांसाठी  सज्ज झालो, चहा घेऊन काका आलेच फक्कड चहा न् बिस्कीटाचा अपेक्षित धक्का पचवून नव्या दमाने, नव्या जोशाने माणिकगडाकडे कूच केली. ज्याने काळ खूपच अंत पहिला होता  आताही तेच चालू होते कितीतरी चालल्यानंतर ती माणिकगडाची लिंगी दिसली,
मग हनुमान शिल्प, पाठीमागून गर्द झाडीतून गडावर जाणारी वाट, ढगांची रेलचेल, ऑगस्ट असल्याने सर्वत्र हिरवळ दाटलेली, डोंगर उतारावरून खळखळनारे झरे सर्वच  कसे अल्हःदायक होत. मन प्रसन्न होत होत. मध्येच पावसाची सर चिंब करून जात होती
. बोलता बोलता गड माथा आला एक पाण्याच टाके डाव्या बाजूला ठेवून पुढे  चुन्याचा घाना पहिला चाक बहुदा कोणीतरी मास्तीखोराने लोटून दिल्याने सापडलेच नाही,
गडावरील चुन्याचा घाना 
पुढे एक बिन देवाची देवडी दिसली, सोबतच बाजूच्या तटात बुजलेला  दरवाजा दिसतो . तर त्यासमोर बाजूलाच एका दरवाज्याची कमान आपल्या गणेशपट्टीकेसाहित उभी दिसते. आता पण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो.
गणेशपट्टी व दरवाजा 

बालेकिल्ला 


बिन देवाची देवडी किवा घुमटी 
इथे २ भली मोठी पाण्याची टाके आहेत. तर काही घरांच्या जोत्यांचे अवशेष. त्यापुढे पश्चिमेकडे बुरुज व शिवमंदिर व एक भंगलेले गणेश शिल्प इथेही काही पाण्याची टाकी. व २ अर्ध्या वीरगळी पाहायला मिळतात. पुढे काही पायऱ्या चढून उत्तरेकडील बुरुजावर पोहचतो.थोद चाललं  कि आपली गड फेरी पूर्ण होते. इथून आपल्याला इरशाळगड, प्रबळगड, कलावंतीन, कर्नाळा, पाताळगंगा नदीचे खोरे व सर्व्र्त्र भरगच्च जंगल नजरेस पडते वरून पाहताना ढगांनी खाली उतरून झाडांशी घातलेला पिंगा भलताच विलोभानीय दिसतो, मन प्रसन्न !!! ज्यासाठी हा अट्टाहास चाललेला तो माणिकगड पाहून झाला भर पावसात एक एक्कालकोंड्या गडावर असणं म्हणजे खरंच  एक अल्लाहादायक अनुभवच. असो.
आज मैं उपर आस्मा निचे . 

सह्याद्रीचे सौंदर्य 

निवांत महेश 
परतीचा प्रवस हाती घेतला. एकदिवसीय माणिकगडाने दोन दिवस झुंझवले होते एक  निमुळती वाट धरून उतरत असता दूरवर पाताळंगंगेवर ढगांचे जमलेले पुंजके त्या हरित सौंदर्यात घातलेली भर न्ह्याहाळत गड अर्ध्यावर उतरून झाला आणि पाऊस ऐन भरात  आला त्याच्या टपोऱ्या थेंबात आमचा इवलसं जीव मुठीत घेऊन आम्ही जंगल उतरत होतो. आता सपाटी वरून वाटचाल चालू झाली, ओढे- नाले धो धो वाहत होते, काही बारकी पोरे चिम्बोर्या पकडण्यात गुंग होती. पावसाने जराशी उसंत दिल्याने फोटो काढता आले

. २:२९ च्या सुमारास  गावात दाखल झालो ते शेवटचा धक्का पचवायला. त्यांच्या अंदाजानुसार ५ ला  येणारे आम्ही लवकर आल्याने त्यांना गिल्टी फील झाल कारण त्यांना आम्हला जेउ घालावयास वाटू लागलेले. सकाळीच न्याहारीचा आग्रह नाकारला होता व आत्ता आणखी काही सेवा नको असाही बजावले होते. पण त्या सज्जन गृहस्थांनी एक धक्काच दिलाच. पाऊस  वाढल्याची संधी साधून म्हातारीशी (वय १०३) बोलण्यात गुंतवून ठेवत बिस्कीट आणले व त्यांच्या मिशेष ने पण  कटात सहभाग नोंदवत गुपचूप कधी चहा आणला कळलेसुद्धा नाही.
समीर व आज्जी यांच्यात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात बदलेले ग्रामीण जीवन यावरील संवाद 

पारधी काकांच्या आई वय १०३ वर्ष (२०१५ रोजी )

पारधी कुटुंबीय 

चहा- बिस्कीट घेत " अतिथी देवो भवं "ची प्रचीती घेतलि. पाहून चारापुढे निशब्ध होतो. पराधी  कुटुंबीयांचे आमच्यावर न विसरण्याजोगे उपकार आहेत. ज्येष्टाच्या पाया पढून निघालो ते पुन्हा यायचच या आग्रहानेच.
अशा प्रकारे माणिक गड व त्या पारधी कुटुंबीयांनी मनात एक वेगळे घर केलेय.!
                      सह्याद्री हा जेवढा मायावी आहे
                        त्याहून कैक पतीने मायाळूही आहे ….


-सविस्तर वाचनाबद्दल धन्यवाद  _/\_

Wednesday, 13 January 2016

अपरिचित अदगाव बीच

अपरिचित अदगाव बीच.
मनुष्याला पर्यटनाची हौस भारी !! अलीकडच्या काळात माणसाचा मानसिक त्रास वाढला व त्याला अनुसरून पर्यटन पण वाढले . पण आपण पर्यटनावर का निघतो ??रोजच्या धावपळीतून, सिमेंटच्या जंगलातून , बजबजपुरीतून , गर्दीतून बाहेर पडून शांततेचे एकांताचे क्षण शोधायलाच ना ? पण आपण जातो तिथे तर एवढे पर्यटन जोमात असते कि वाटते गाड्या आपली ती मुंबापुरी बरी !!! ;) त्यावर उपाय म्हणजे अलीकडेच बहरास येत असलेले ग्रामीण पर्यटन, काही अपरिचित किनारे, दुर्गम भागातील गडकिल्ल्यांच्या पायथ्याची खेडी हे चांगले पर्याय ठरू शकतात. असाच परवा एका अपरिचित ठिकाणी जाण्याचा योग आला त्याबद्दल जरासं…
सूर्यास्त

अस्ताला जाणारा सुर्य टिपताना
         अदगाव चौपाटी एक नितांत सुंदर ठिकाण. विस्तीर्ण समुद्र किनारा, छोटास गाव, नारळी-फोफळीच्या बागांनी वेढलेलं टिपिकल कोकणी बाज असलेले हे गाव दिवेआगर पासून १० किमी उत्तरेला आहे. मी व संतोष दोघेच बाईक वरून निघालो, मुंबई पासून व पुण्यापासून २०० किमी अंतर. सारथ्य संतोष कडे दिल्याने मी मागे निवांत होतो. त्याचाच फायदा म्हणजे रातोडी गाव च्या हद्दीत रस्त्याचे काम चालल्याने काही विरगळी खोदुन  वरती एका रांगेत ठेवलेल्या दिसल्या, जर वेगळ्या धाटणीची ती शिल्पे पाहून माणगाव, म्हसळा मार्गे वेलास ला थेट समुद्र किनाऱ्यावरच अवतरलो. इथून अदगाव पर्यंत चा प्रवास  भलताच मजेदार !! अगदी किनाऱ्याला लागून च रस्ता, इतका कि , घसरला तरी थेट समुद्रातच पडावा. : D एका बाजूला अथांग सागर तर दुसऱ्या  बाजूला बुटकी च डोंगररंग  असा नजर नजारा डोळ्यात भरून घेत असतानाच अदगावचा किनारा  लागला. गाव अगदी किनाऱ्याला खेटूनच !! सुदेश मोरे दादा यांच्याशी आधीच संपर्क झाल्याने गावात जाताच  झाली.  लगेच एका प्रशस्त घरात आमची केली व फ्रेश होऊन पाठीमागच्या  घरी   जेवायला गेलो. वहिनीनी अगदी  उत्तम प्रकारे घरगुती पद्धतीचे ते टिपिकल कोकणी चवीचे शकाहारी मांसाहारी दोन्ही. त्यावर येथेच्छ तांव मारून सोलकढी  पिउन बाहेर पायरीवर बसलो.
दुपारचा समुद्र
समोर अथांग समुद्र, मागे नारळीच्या-सुपारीच्या झापाची सळसळ  मध्येच एखाद्या लाटेचा धस्सकन आवाज यांची छान जुगलबंदी ऐकत असतानाच कुठूनतरी पक्ष्यांचे मनमोहक आवाज कानी यायचे. एक मस्त कोकणातील शांत दुपार अनुभवत होतपहुडलेला गांव, बाजूला पारावर एक आजोबा काहीतरी वचनात गुंग, समोर समुद्र त्याच्या धीर-गंभीर लाटांमध्ये व्यस्त, मध्येच विद्युत वेगाने  झडप घालून  पकडण्यासाठी समुद्री पक्ष्याची  लगबग,वाऱ्याची मंद झुळूक  अशा वातावरणात हरवून जात असतानाच ५ वाजले  व आम्ही मस्त आल्याचा चहा घेऊन समोरच्या गोठण्याच्या डोंगरावर सूर्योदय पाहायला  चालते झालो, वाटेत ग्रामदैवत कुंभळंजा देवीचे दर्शन घेऊन परतलो. संध्याकाळ झाल्याने मासेमारीच्या बोटी किनाऱ्यावर परतत होत्या काही नांगरलेल्या उगचच हेलकावे  होत्या.
जेवणाची  होइपर्यन्त  आणखी काहीतरी घ्याव सागराकडून म्हणून गाडी काढली व थेट वेळासच्या किनाऱ्यावर  झालो तेथील  पुलावर पाय सोडून मस्त गप्पा मारत बसलो एकादशीची रात्र असल्याने काळोखाच फार, दूरवर समुद्रात बोटीवरील lights एखाद्या छोट्या गावाप्रमाणेच भासत होत्या, बाकी वातावरण एकदम  होते. ९ वाजले  मात्र पोटातून भुकेचे संकेत यायला लागले, तस कोकणात आले कि जिभेला चांगलाच चोचल्याच भरते आलेले असते :p वहिनीनी मस्त शाकाहारी व मांसाहारी अस दोन्ही प्रकारचा  होता, आता वर्णन करून तुमच्या भावना चाळवत नाही. पण  जिभेचे चोचले पुरवायला २ दिवस वरचेवर यायचेच अस ठरवूनच  आटोपला.
पुन्हा रिकामा वेळ!! किनाऱ्यावरच गाव  घरात कोणाला बसवतय ? जेवलो कि शतपावली किनाऱ्यावरच !! तोपर्यंत दादांनी मस्त शेकोटी पेटवली.
किनाऱ्यावरील शेकोटी
थंडगार वाळूत, गार गार समुद्रावरून आलेल्या वाऱ्याला  शेकोटीच्या जोरावर थोपवले होते… साग्रासंगीताचा मंजूळ आवाजात बाजूच्या नारळी-फोफळीच्या झापांची सळसळ सुरांत सूर मिसळत होते,  दूरवर कुठेतरी एखादे कुत्रे केकातून आपलेही अस्तित्व त्या निरव शांततेत दाखून  देत होत होते. भलताच गोड अनुभव होता हा. बराच वेळ शेकोटी बाजूला गार वाऱ्यात वाळूवर पडून होतो,
संतोष
 शेकोटी विजली न थंडीने आपले अस्तित्व जाणवून दिले  मग सपशेल माघार नोंदवून आम्ही घरी जाऊन बिछाना जवळ केला पण खिडकीतून ऐकू येणारे लाटांचे आवाज स्वप्नातही  लागले होतेच.
६:१५ संत्या bc ने उठवले इच्छा नव्हतीच पण सूर्योदयाच्या लोभाने उठलो ते कॅमेरा घेऊन तडक किनाऱ्यावरच….
कातरवेळ फेरफटका
नुकताच उजाडत चालले चालले होते, शांत निखळ सागरावर एक लकाकी आली होती. समुद्रात घुसलेल्या एका डोंगर सोंडेवर जाऊन पूर्वेकडे डोळे लाऊन बसलो तब्बल ४७ मिनिटे वाट पाहायला लाऊन रविराज ७:१८ ला अवतरले तेच मुळी कोकणचे सौंदर्य लेऊन !!!
आणि रविराज ने दर्शन दिले एकदाचे
सूर्योदयाची येथेच्छ फोटोग्राफी करून लगेचच समुद्रात जलतरणाच्या कार्यक्रमावर रुजू झालो. दीड किमी लांबीच्या त्या स्वच्छ सुंदर किनाऱ्यावर आमचा फोटो काढायला सुध्दा कोणी भेटणारनाही याची खात्री
असल्याने घरातून च एक स्टूल as अ  tripod म्हणून घेऊन गेलो होतोच.
जलतरणाचा कार्यक्रम

सेटप ! स्टूल एज अ ट्रायपोड
मनसोक्त पोहून फोटोग्राफी करून गरमागरम पोहे ओले खोबरे टाकून खाल्ले व निघालो कोळीवाड्यात मच्छी लिलाव पाहायला हे सर्व मला नवीनच असल्याने भारी कुतूहल होत बाकी. सुदेशदादांनी हे सर्व माहित करून दिल्याबद्दल  त्यांचा. वेगवेगळ्या  प्रकारचे मासे येत होते ते तसेच कोणीतरी घेऊन जात होते.
माशांची आवक
बोली लागली

एका मात्स्याजीवाची भावमुद्र
आता  सटकलो व mission अदगाव दर्शन वर निघालो दादांनी सर्व गाव फिरून दाखवला मजा  आली. वेगवेगळी माणसे भेटत गेली घरे भेटत गेली . पूर्ण गाव हिंडलो नारळी फोफाळीच्या बागा पहिल्या , काजू, हापूस च्या बागा पहिल्या, एके ठिकाणी मस्त बोरे खायला मिळाली.
नारळी फोफळी च्या बागेतून फिरून माहिती घेताना
मग घरी आलो तर बाहेरील नारळाच्या झाडावर लागलेलेशहाळे खुणाऊ लागलेलेच, मग स्वताच त्या उंचपुऱ्या माडावर चढाई करून ५/६ नारळ काढले. कोकणात जाऊन स्वतः नारळ काढून खाण्याची मजाच न्यारी हो !!
लैच मोठा झाड

कसरत

शहाळे काढून त्यासोबत स्वतः ब्लॉग लेखक
१२:३० झाले भूक हि नव्हती …मग ठरल कि जवळच दिवेआगार बीच वर जाऊन येऊ, एव्हाना गाडी दिवेआगार रस्त्याला लागली सुध्दा. मनसोक्त कॅमेरा चालवून जेवायला २:३० ला आलो सुद्धा .
दिवेआगरात संतोषची एक प्रतिमा
दिवेआगार च्या चौपाटीवर फोटोसेशन

आता पुन्हा एकदा दणकून जेवायचं आणि मुंबईकडे रवाना व्हायचा एवढच टास्क बाकी होता.  सोल्लिड जेवण झाल होत. वाहिनी नंबर एकच्या सुगरण त्यामुळे कोकणात food travelling चा बेत असेल तर  हरकत नाही ! टिपिकल कोकणी पद्धतीचे घरगुती शकाहारी मांसाहारी तसेच विविध प्रकारचे मासे विविध प्रकारे बनिविण्याचे वहिनींचे कसब वाखाणण्याजोगेच !
नमुना
आता वेळ होती  निरोपाची ३ ला निघालो घाईतच दिघी बंदरात येउन दिघी क्वीन मध्ये गाडीसाहीतच घुसलो व खाडी उल्लन्घानास सज्ज झालो.
दिघी क्वीन या बोटीचा प्रवास
दिघी क्वीन च्या डेक वरून
आगरदांडा आले तिथून उजव्या बाजूला भली मोठी मिठागरे ठेऊनझाडा झुडुपातून वळणा वळणाचा रस्ता संपवत रोह्यात आलो आता वाकण पाली खोपोली मुंबई एवढ पार झाल कि दौरा आटोपला.
योगेश आलेकरी ;)

संतोष जुगदर
तर एका अपरिचित ठिकाणी जाऊन प्रसन्न वातावरणात, शांत, किनाऱ्यावर, निवांत क्षण अनुभवून आलो होतो. एक मस्त अनुभव घेण्यासाठी आडगाव ला भेट द्यायलाच हवी, सुदेश दादा हे आपली उत्तम प्रकारे सोय करतीलच.  .
वाच्य संयमाबद्दल आभारी :)

Tuesday, 1 December 2015

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

 कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन. 

कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग  त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील  ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच .
सूर्यास्त 

 Rayari kinara  कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू  पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते.    मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी  मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव वरून म्हसला मार्गे जाते येते. दुसरा मार्ग रोह्यातून केळघर घाटमार्गे राजपुरी आगरदांडा जेट्टी वरूनगाडी बोटीत टाकून  दिघी बंदर असा प्रवास  करत सायंकाळी सार्वा गावात पोहोचलो. गाडीची हि समुद्रउल्लंघनाची  पहिलीच वेळ असल्याने याच मार्गाची उत्सुकता  होतीच.
बोटीत आमची गाडी चढवताना 
साबिरकाका वाट पाहत होतेच, एक  डोंगररांग उतरून गावात  प्रवेश केला,ते थेट काकांच्या घरीच गेलो. त्याचं घर हेच आमच मुक्कामाच ठिकाण आहे समजल्यावर तर आमच्या  हरिणाचा उत्साह संचारला, कारणही तसच; अगदीच किनार्याला खेटून असं त्याचं घर इतकं कि, लाटांचे शिंतोडे अंगावर  
 घेत ओसरीवर बसून चहा पिता यावा ! समोर अथांग समुद्र, अस्ताला जाणारा सुर्य, निळ्याशार सागरावर आकाशात भगवी छटा पसरवून सुर्यनारायण आकाशातच बुडाले होते . पाठीमागे नारळी फोफळी चे उंचच उंच वृक्ष , दूरवर काही सागरालाच समांतर होऊन आकाशात झेपावलेले. असा तो सुन्दर देखावा पाहत पाऊले कधी किनाऱ्यावरील  वाळूत भटकायला गेली कळलच नाही. सूर्यास्त कॅमेराबद्ध करत असतानाच काका चहा घेऊन आले , तो वाफाळलेला चहा पीत आयुष्यातील एक सुरेख संध्याकाळ अनुभवत होतो. बराच वेळ किनार्यावर च होतो , मी, प्रशांत अन सोबतीला साबीर काका.काका त्या परिसराबद्दल भरभरून बोलत होते, तेथील जन्जीवानाबद्दल बोलत होते. त्यांनी तेथे फ्री फिशिंग (हाताने मासे पकडणे) हि दाखवले. तोपर्यंत रात्रीच जेवण तयार झाले होते, काकुनी मस्त अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण बनवलेले त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. 
संध्याकाळीचे काही क्षण 
फेरफटका . ओहोटीला गेलेल्या समुद्रावरून 


साबीर काका तेथील परिसराची माहिती देत होते 

जेवण आटोपून बाहेर पडलो,  मस्त चंदेरी लाटांचा आस्वाद घेण्यासाठी चंद्राच्या उजेडात किनाऱ्यावरील वाळूत अनवाणी पायाने चालत फेऱ्या मारत असतानाच चांदणे ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करावा आणि क्षणार्धात फेसाळती लाट  पायावरून जात बाजूला च दगडावर अडलावी न आपण भानावर यावे, असाच काहीसं होत होत. बराच वेळ बोचरी थंडी अंगावर घेत दूरवर समुद्रात होणार्या हालचाली न्याहाळत बसलो. एखादे शहर भासावे तसे त्य जहाजावरिल दिव्यांनी समुद्र चमचमत होता. दिघी बंदरात येण्यासाठी नांगरलेली ती जहाजे होती. १० च्या दरम्यान घरी आलो  काकांनी झोपायची उत्तम सोय केलेलीच होतीच. खिडकीतून दिसणारा अथांग सागर व लाटांची लयबद्ध गुंज कानावर घेत कधीतरी निद्राधीन झालो. 
काकांच्या घरातील आमची झोपेची व्यवस्था 


मी व प्रशांत 

सकाळी उठलो ते थेट किनाऱ्यावरच धावलो प्रशांतने कॅमेरा घेतलेलाच सोबत, चमचमणारे सूर्यबिंब ओहोटीमधील डबक्यामधून डोकावत होते, पाठीमागील डोंगरांतून सूर्योदय होत होता, माडाच्या झापामधून सुर्कीर्नाच्या होणारा शिडकाव भलताच गोड भासत होता. आन्हिक आवरून पुन्हा वाळूत येउन बसून नारळीच्या झापामधून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत हातात  चहा बिस्कीट व सोबतीला समुद्रच सागर संगीत .…!!!!!
सक्काळी सक्काळी 

आता वेळ होती site seeing ची सार्वा गावाच्या मागच्या बाजूला जी डोंगररंग आहे त्यामध्ये एक धबधबा आहे, साधारण ५०/६० फुटाचा तो धबधबा साधारण जानेवारी पर्यंत वाहता असतो, अर्ध्या तासाच्या जंगल ट्रेक करून आपण थेट धाब्धब्यापाशी पोहचू शकतो. पूर्ण पणे सुरक्षित असा तो धबधबा family trip साठी छान पर्याय आहे.
धबधब्यावर

इथून आजूबाजूला घनदाट जंगल तर समोर नारळीच्या बागेवरून थेट समुद्राचे दर्शन. मनसोक्त photography करून न्याहारीसाठी घरी येत असता वाटेत एक माडाचे बन लागले नारळाच्या उंचच उंच  झाडावर लगडलेले शहाळे पाहून तोंडाला पाणी सुटले ना !! मग काय free  climbing चा अनुभव कमी आला ना. सरसर झाडावर चढून तीन मोठे शहाळे काढले. न्घारी जाऊन मग मस्त प्रोग्राम ;) कोकणात जाऊन शहाळे पिणे तेही स्वत झाडावर चढून काढलेले वाहः मजा काही निराळीच !! 
झाडावरून शहाळे काढताना 
चढायची कसरत 

आणि काढलेल्या शहाळे हातात घेऊन स्वतः ब्लोग लेखक 
  आता वेळ होती मणेरी येथील प्रसिद्ध light house दिप गृह पहायची. रस्ता किनाऱ्यावरूनच चालला होता बाजूलाच एक तले शाबीर काकांनी दाखवले तेथे मस्तपोहण्याची सोय होऊ शकते. नानावली गावात गाडी पार्क करून मणेरीकडे चालतच जाव लागते. डोंगराची एक निमुळती सोंड सरळ समुद्रात घुसलेली आहे त्यावर अगदी टोकाला तटरक्षक व बंदर (port)  यांचे एक ठाणे आहे त्यावरच दीप गृह आहे ते ,अर्ध्या तासात च आपण तिथे पोहचतो. हे light house जहाजांना दिशादर्शकाचे महत्वाचे  काम या ठिकाणावरून पार पडले जाते. संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने छायाचित्रणावर मर्यादा देऊन ते दीपगृह आतून पाहण्याची संधी मिळाली.
मणेरीचा दीप गृह दुरूनच 
दीपगृह watch tower म्हणून हि काम पाहतो यावरून दूर दूर वर पसरलेला समुद्र दिसत होता, दिघी बंदरात येणारी व नागरलेली जहाजे दिसत होति. उजवीकडे कासा बेटावर शिवरायांनी वसवलेलं पद्मदुर्ग दिसत होता, जंजिरा जरासा डोंगरा आड असल्याने नजरेच्या टप्प्याबाहेर होता. तिथल्या अधिकाऱ्याचे आभार मानून परत नानवली गावात आलो जे आयुर्वेदिक औषधांसाठी ओळखले जाते. तिथून समुद्र दर्शन घेत दुपारच्या जेवणासाठी घरी अलो.
दुपारचे जेवण 
काकुनी मस्त जेवण बनवलेलेच होते येथेच्छ तव मारून काकांचा निरोप घेऊन आडगाव चौपाटी व वेलास चौपाटी कड रवाना झालो ४ किमी असणारी हि चौपटी खर्च या परिसराच्या सौदर्याला ४ चंद लावते. हि चौपाटी म्हणजे एक स्वप्नवत वाटणारासुंदर नजाराच  अर्धचंद्राकृती आकाराचा किनारा, स्वच्छ पाणी ,गर्दी नाही, किंबहुना कोणीच नाही आपल्याशिवाय, निरव शांतता, किनाऱ्यावरील माडाची झाडे समुद्राला समांतर होऊन अचानक  आकाशाला झेपावलेले, त्यावर चाललेली समुद्री पक्षांची किलबिल, लाटांचा लयबद्ध आवाज, आणि आम्ही दोघेच फोटो काढत उभे, एवढी निर्मनुष्यता खचितच मिळते !! सार्वा ट्रीप मध्ये हा बीच चुकूउच  नये असा. "कोकण ,म्हणजे परमेश्वराला पाहते पडलेले सुंदर स्वप्नच" असौगिच नाही कोणी म्हणून ठेवले. 
आदगाव चौपाटी 
एकांतात चौपाटीवर वावर 

इथून पुढे वेळास १० किमी व दिवेआगार चौपाटी १८ किमी वे फक्त. व त्त्याना जोडणारा रस्ता म्हणजे निव्वळ स्वर्गच !!! उजवीकडे अथांग सागराचा लयबद्ध खेळ, तर डावीकडे झाडझूडपाणी वेढलेले बुटके डोंगर, अगदी दोइवरिल टोपी उडाली तरी समुद्रात जाऊन पडावी एवढा जवळून रस्ता . इथून मात्र वेळे अभावी वेळास व दिवेआगर येथील सुवर्णगणेश बघून म्हासला-माणगाव मार्गे मुंबईकडे रवाना झालो. 
काही निवांत क्षण 

   मळलेल्या पायवाटेव्यतिरिक्त आडवाटेवर रमणाऱ्यासाठी सार्वा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो . इथे आपल्यला काय मिळेल पाहायला ? -तर दिघी बंदर., जंजिरा तर अवघ्या १२ किमी वर जवळच पद्मदुर्ग, मणेरी दीपगृह, सार्वा धबधबा हा तर कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण, बाजूलाच सार्वा बीच, अद्गाव बीच, तसेच ग्रामीण जीवन जवळून बघण्यची संधी, किंभ्ना अनुभवण्याची संधी, see foods, साबीर काकांकडे तर माशांचे सर्व प्रकार उत्तमरित्या व चविष्ट  केले जातात  त्यामुळे आपले foodtravel पण होऊन जातेच समुद्रकिनारी टेंट लाऊन साग्रसंगीत ऐकत रात्र घालविण्याची मजाही घेत येऊ शकते. 
या स्थळास भेट द्यायची असल्यास साबीरकाका 7588650329 यांना संपर्क करू शकता .

 
-विशेष आभार- मुग्धा येळकर -

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...