कळसुबाई एक सर्वोच्च अनुभव (खंड-१)

 २८/०९/१३

कळसुबाई - एक सर्वोच्च अनुभव 


         रोजच्या comfort zone मधून बाहेर पडून एक दिवस निसर्गात भटकणे हे स्वत;ला reboot करण्याचा एक उत्तम मार्ग. यामध्ये प्रत्येकाचे आवडी वेगळ्या, कोणाला समुद्रकिनाऱ्याची शांत गुंज आवडेल तर कोणाला फेसाळणारे धबधबे प्रिय तर काहीना घाटमाथे तुडवण्यात मजा, काहीना गडकिल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, मनाचा व शरीराचा कस पाहणारी गिरिशिखरे खुणावत असतात या प्रकारातला मी एक अवली. अशा मुशाफिरीत आनंदाने मनाची ओंजळ काठोकाठ भरत असते काहीना सदेह जाता नाही आले तरी एखाद्याचे अनुभव वाचून ते अनुभवत  असतात अशा माझ्या मित्रांसाठी शब्द्क्रीडेचा एक केविलवाणा प्रयत्न…कळसुबाई शिखर हे मला पाचवी पासूनच साद घालत होते माझ्या या इच्छेला गडवाट परिवारामुळे मूर्त स्वरूप मिळाले ते २९.०९.१३ रोजी सकाळी ११:३० वाजता. माझ्या या भ्रमंतीचा एक धावता आढावा म्हणून हा लेखप्रपंच (धावता आढावा असल्याने अनावश्यक नोंदी टाळल्या आहेत)   
            अखेर खुप दिवसाची प्रतीक्षा संपून, जाण्याची रात्र उजाडली (???!!!) सुहास च्या नियोजनानुसार आम्ही दादर चित्रा सिनेमा येथे जमलो. मला जरा उशीरच झाला(नेहमीप्रमाणे). सुहास,रवींद्र, देवेंद्र, विलासदादा, विठ्ठल, गीताताई राहुल गहरवाल व निवनगुने हे आधीच पोहचले होते. ११:३० ला बस आली ठाण्यापरयन्तचा प्रवास शांततेतच झाला. ठाण्यात उर्वरीत मंडळी चढली आणि बस गोकुलळासारखी गजबजली. पुढचा प्रवास सुरु झाला. ठाण्यातील खड्ड्यांमुळे व driver ने (सवयीप्रमाणे) एक दोन ब्रेक मारल्यामुळे सर्व मंडळी आपापल्या जागी चपखल बसली. गप्पांचे फड रंगले दंगा मस्ती हास्यकल्लोळ सर्वच चालू होते इतक्यात रोहिणी ने कळसुबाईची ऐतिहासिक रंजक (दंत)कथा सांगायला सुरुवात केली ती काही कोणाच्या पचनी पडेना, संकेत, निलेश, राहुल ग. यांनी जोरदार विरोध करत नानाविध प्रश्नांचा भडीमार केला पण रोहिणी आपल्या कथेच्या सत्यतेवर ठाम राहिली येथूनच ''येऊ का'' हा शब्दप्रयोग प्रचलित झाला…चिन्मयी किलकिल्या डोळ्यांनी सर्व पाहत होती…. रात्र होत होती तशी पेंगणाऱ्यानी झोप जवळ केली,,, सीटवर आपापले देह झोपवताना काहींना चांगलीच कसरत करावी लागत होती त्याचे फलित म्हणून समर्थांनी दासबोधात वर्णिलेले झोपेचे सर्व प्रकार पाहायला मिळात होते :p  मी आणि आबा मात्र मधल्या जागेत अगदी शवासनातच झोपलो होतो.,.,.,      
       सकाळी ४:३०  ला जग आली तीच मुळात रोहिणीच्या "ये दंगा करू नका रे" या गर्जनेने. एव्हाना बस कळसूबाईच्या पायथ्याशी असणाऱ्या बारी गावाच्या स्वागत कमानीपाशी दाखल झाली होती.  उठून पाय मोकळे केले(आणखीही काही :p ;) :D ) इतक्यात न्याहारीवालाही धावत धावत(कॉसमोस टोर्च घेऊन) हजर झाला. त्यांच्या घरी गेल्यावर दिवाणखान्यात एक तळवट टाकलेला निदर्शनास आला न काही कळायच्या आतच त्यावर सर्वांच्या झोपेसाठी धपाधप उड्या पडल्या, अक्षरश: जागा मिळेल तिथे… (अगदी काहींनी काहींच्या अंगावरील जागाही नाही सोडली :p )पण हा झोपेचा आनंद फार काळ टिकला नाही लगेचच सुहास ने 'चला रे उठा रे' ची आवर्तने सुरु केली ;) (साला झोपतो कि नाय कधी? !!!) त्यामुळे इच्छा नसतानाही उठाव लागल तोच सर्वांची नैसर्गिक क्रीयाक्रमासाठीची लगबग सुरु असलेली दिसून आली. त्याची opening राहुल गहरवाल (अन closing निलेश नलावडे) ने केलेली ऐकिवात आहे…या सर्व धुमश्चक्रीत सर्वांचे चेहेरे ताजेतवाने होऊन न्याहारीसाठी सज्ज कधी झाले समजलेच नाही मी पण त्यातलाच एक ;) :) ;) घाईतच न्याहारी उरकली ओळख परेड झाली. विशेष म्हणजे त्यादिवाशी राजू ठोकळ सर, ईश्वर व राजेंद्र सहाणे बंधू  आमच्या तीन सहकाऱ्यांची नव्याने ओळख झाली ती त्यांच्या कार्यामुळे सहाणे बंधू आपला शेती व्यवसाय सांभाळत मिळेल तिथे समाजकार्यात सहभागी होत असतात… तर राजू सरांनी शिक्षकी पेशाला नवीन आदर्शच घालून दिलाय त्यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी काही तरी करावे यासाठी आपली बदली आदिवासी भागात करून घेतलीय, त्यांच्या कार्यास गडवाट परिवाराकडून अनंत शुभेच्छा _/\_ । सहाणे बंधूनी याही वेळेस 'अतिथी देवं भावं' अनुसरून एक छानशी भेटवस्तू देऊन परिवाराचे स्वागत केले,,,,…।  
            ७ वाजले होते खानेसुमारी करून प्रत्यक्ष चढाईला सुरुवात केली अन १० मिनिटातच एक मंदिर लागले दर्शन घेऊन  पुढील मार्गक्रमण चालू ठेवले वाट अगदीच सुलभ असल्याने हालचाल गतिमान होती त्यात ताजातवाना जोश. आजूबाजूची भातशेती मागे टाकत आम्ही समोरील बेलग प्रचंड अशा सह्यागीरीला गवसणी घालायाल पुढे सरसावत होतो. सर्वत्र निसर्गाने हिरवळीची सढळ हातानी उधळण केली होती. कड्यांवरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडत होते… काही नागमोडी वळणे घेत रान तुडवत आम्ही एका लोखंडी शिडीपाशी पोहचलो व तिथूनच मुख्य पर्वत चढायला सुरुवात झाली, नजर फिरवील तिकडचे नजारे नजरेला सुखावत होते… या सह्याद्रीचे वर्णन शब्दांत ते काय मावणार त्यासाठी ''याची देही याची डोळा''  तो अनुभवणेच उत्तम… तरीही अपल्या छायाचित्रकारांनी होता होईल तेवढा तो आपल्या कॅमेऱ्यात साठव्लाय तो पहालच आपण…क्रमश:
भाग २

Comments

Popular posts from this blog

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

शाळा- मंतरलेले दिवस

झपाटलेला ट्रेक