मुरंजन उर्फ प्रबळगड NIGHT TREK...

मुरंजन उर्फ प्रबळगड NIGHT TREKK

प्रबळगडावर मागच्याच आठवड्यात एक छोटासा ट्रेक झाला होता, फक्त एक जवळचा साधा ट्रेक म्हणून याकडे पाहत होतो पण गडावर गेल्यावर लक्षात आले कि हा गड तसा खूप जुना आणि अभ्यास करण्यासारखा अहे. याच्या माथ्यावर असणारे घनदाट जंगल हे आणखी एक उत्सुकतेचा विषय. प्रबळगडावरून कलावंतीण दुर्ग दिसतो त्या ठिकाणावर जाता क्षणी इथे रात्री मुक्काम करावाच व रात्रीच्या शांततेत, चंद्राच्या मंद प्रकाशात कलावंतीण सह माथेरान चंदेरी विकटगडाचे सौंदर्य अनुभवायचच  अस ठरवूनच गड उतरलो होतो… !!!
                चैत्र शुक्ल १५ पौर्णिमा व चंद्रग्रहण असा दुहेरी योग साधून प्रबळगड night trek चे नियोजन ''NOMAD HIKERS" या ग्रुप सोबत केले… mumbai hikers वरून १३\१४ जमवले न रात्री निवृत्ती काकांच्या टाटा माजिक ने ठाकुरवाडीत उतरलो (कोणाला नं. हवा असेल तर मिळेल) माची प्रबळमधील निलेश भूताम्ब्रे यांनी जेवणाची सोय केलेलीच होती. ११:३० ला माची प्रबळहून जेवून पौर्णिमेच्या मंद उजेडात मार्गक्रमण चालू झाले, वास्तविक सर्वच जन या ट्रेकमध्ये माचीप्रबळ येथेच मुक्काम करतात पण आम्ही मात्र अगदी गड माथ्यावरील एक उगड्या जागेवर राहायचे ठरवलेले कारण खास तिथ कॅम्पिंग आहे म्हणून संतोष व सागर फटफटीवरून आलेले, कारण '"खुजली से बढकर खोईं खुजली नाही होती" ;) ;) असो, त्या भयाण जंगलातून रात्र पदभ्रमण करणे करणे जरा धोकादायकच पण आमचे जुनेअनुभवी  सहकारी मिलिंद गवसणे हेही सोबत असल्याने मोठा आधार होता, त्यांच्या सूचनेने नियोजनात थोडा बदल केला व तो फायद्याचा ठरला त्याबद्दल त्यांचे आभार … !!!!
       नुकताच ग्रहण संपल होत १२ वाजून गेले होते चंद्र हि आता पुर्णाकृतीने झळकत होता थाकाव्याविना या निरव शांततेत, रातकिड्यांच्या किर्कीरीत हलीवर चाललेल्या गप्पा मिसळून कधी आम्ही बैलशिंग्याच्या वाटेवर आलो कळलच नाही. हा एवढाच भाग फारच दमवणारा होता सरळ उभी चढण. मी, समीर, संतोष,सागर,सुनील, मनीष आघाडी सांभाळत होतो तर मिलिंद दादा बळवंत ला घेऊन पिछाडीवरून नेतृत्व करत होते थकवणारी वाट दोन्ही बाजूला कातळ कडे याच्या साक्षीने एव्हाना भग्नावस्थेतील दरवाजा चढून गडावर प्रवेश झाला होता. वाटेत मिळतील ती लाकडे घेऊन कलावंतीण सुळका पाहायला पोहोचलो आता रात्रीचे १:३० वाजले होते, मी व संतोष आगपेटवेपर्यंत  सर्वांनी आपापली बेड सेट केले व थंडीच्या आनंद घेत गप्पांची मेहफिल चालू झाली मी व संतोष खूप दिवसांनी अस निवांत भेटलो होतो त्यामुळे झोपेला फाट्यावर मारून पहाटे ५ पर्यंत विविध विषयांचा कीस पाडत गप्पांचा फड रंगवला होता, म्हणून जबरदस्तीच ५ ला झोपलो, तर ६ ला लगेच उठूनन्याहारी करून  गड भ्रमंतीच एक अवघड काम हाती घेतले किर्रर्र रान व अपुरा नकाशा यामुळे वाट शोधताना त्रास होतोच इथे कारण प्रबळ गड जंगल फिरणे सहसा कोणी करत नाही त्यामुळे वाटा मळलेल्या नव्हत्या, पण अडवाटे वरच जाने हा माझा छंद…!! वाट शोधतच आपण आता एका भग्न इमारतीपाशी पोहचतो, एकास एक लागून ४ इमारतीचे अवशेष अगदीच झाडा झुडुपाच्या, वेलींच्या मगरमिठीत अखेरचा श्वास घेत असणारे ते दुर्लक्षित अवशेष पाहून मन विशन्न झाले...
इमारतीचे अवशेष

. त्यापुढे थोड उत्तरेकडे गेल्यावर एका समाधीचे अवशेष लागतात . कोणा एका ह्ख़ोरने त्यावर स्वताचे नाव लिहून आपला अज्ञान दाखवलाय(अशी प्रवृत्ती कोणास आढळल्यास जागीच ठेचा)
समाधीचे अवशेष
                            इथून पुढे उजवीकडे थोडे खाली एक गणेश मंदीर लागतं, त्याच्या पाठीमागून जाणारी वाट ही काळा बुरुजाकडे जाते तर समोरून जाणारी वाघाची नळी कडे जाते( अनुभवांती समजले ) वाघाच्या नालीकडे जाणारी वाट काळा बुरुजाकडे जात असेल या भाबड्या आशेने आम्ही पुढे एका घळीत वाट शोधत असतानाच अपम एका विचित्र ठिकाणी पोहोचतो. इथे एक वाघाचे शिल्प आढळते व त्यापाठीमागे एक चौथरा,कदाचित ते या चौथर्यावरचे असावे.
गणेश मंदिर

वाघाचे शिल्प
                            तिथून खाली थोड पुढे भले मोठे पाण्याचे टाके लागते पण मातीने व्यापलेले व झाडांनी वेढलेले असल्याने पाणी नाहीच पण त्याची खोलीही लक्षात येत नाही. त्याच्या उजवीकडेच ओहोळासोबतच बांधकामासाठी लागणारे असंख्य दगड दिसून येतेत व विशेष म्हणजे इथव ती ओहोळ अडविणारा बंध आहे व मोठेमोठे दगड एकमेकांत उत्तमरीत्या सांधलेले पाहायला ममिळतात. पण हा एकाच थर  असल्याने त्याचा उद्देश पाणी अडविणे अथवा आणि काही हा अभ्यासाचा विषय आहे. त्याच्या पलीकडे प्रवाहातच एका उतरच्या दगडावर प्रवाह छेदणाऱ्या आडव्या पायर्या खोदल्या आहेत त्या पार करून (उतरून नव्हे) थोड खाली आणखी एक भांबावून सोडणार बांधीव अवशेष आढळतात. इथे तो प्रवाह थोडा विस्तृत होतो व त्याचे २ भाग एका ४ फुटी तटबंदीसदृश भिंतीने केलेले अधल्तत. पुढे दोन्ही भाग अडवून उजव्या बाजूने सांड ठेवलेली आढळते. हे तुलनेने सुस्थितीत दिसतं. इथे आपण आता एका सरलं तुटलेल्या कातळ कड्यावर पोहोचतो. इथून समोर मग आपल्याला माथेरान चे हिरवेगार डोंगर व मोरबे धरणाचे पाणलोट क्षेत्र असा डोळ्याला  सुखावह अनुभव देतात.
आता आपण मागे फिरून पुन्हा मंदिराच्या बाजूने जाणार्या वाटेने एक विस्तीर्ण असा बांधीव तलाव डावीकडे ठेऊन वर मोठमोठ्या वृक्षांचे छत डोक्यावर घेत बरीच पायपीट केल्यावर जंगलातून बाहेर डोकावण्याची संधी मिळते तोच समोर इरशाळगड आपले दोन्ही सुळके आकाशात खुपसून निश्चल उभा दिसतो.
समोर इरशाळ गड
त्याच्या पाठ्मोरीला मोरबे चा जलाशय व र माथेरानचे डोंगर तर विरुद्ध दिशेला मुंबई-पुणे हमरस्ता. आपण काळा बुरुजावरून हे सर्व पाहत असतो इथे पाण्याची २ टाके व चुन्यात एकसंध बांधलेलं टेहळणी बुरुज दिसतात यातील एक दुभंगलेला अहे.
चुन्याच्या बांधकामातील तटेहाळणी बुरुज
बाजूला चुण्याची घाणी आपले लक्ष वेधून घेते तर डावीकडे आखीव आखीव रेखीव वाटावा असा काळा बुरुज…
काळा  बुरुज
 हे सर्व कोणी व कोणत्या काळात बांधलं ताची माहिती मिळू शकली नाही, जर असेल कोणाकडे तर स्वागत असेल. ।!!!!
       आता आम्ही उतरण्याच्या वाटेच्या पूर्ण विरुधः दिशेला आलो होतो  उनं चढायला लागली होती, रोहित व बळवंत यांची इथेच गात्र गळीत झालेली. १०:४५ ला उतार्याला सुरुवात केलेली तर बरोबर ठरल्याप्रमाणे १२ ला माची प्रबळमधील बाळूच्या हॉटेलात स्वादिष्ठ जेवणावर तव मारत होतो. आता उरलेला ट्रेक हाती घेतला या टप्प्यात बर्याच जणांनी असहकार पुकारला होता पण पण २;३० ची बस मिळवाय्चीच होती, त्यामुळे सर्व शक्ती पणाला लाऊन आम्ही ती मिळवली पण आणि एकदाच हुश्श केले….!!!!!

प्रबळगड उर्फ मुरंजन हा तसा दुर्लक्षित किल्ला पण किल्ल्यावर अभ्यासारखे खूप काही आढळते. इथली प्रमुख अडचण म्हणजे वाट चुकणे, निबिड अरण्यामुळे दिशेचे आकलन होत नाही तर गडाचा कोणताही परिपूर्ण असा रान्वातासाहित नकाशा उपलब्ध नाही. तो बरयापैकी उपयुक्त ठरेल असा नकाशा बनउन मी लवकरच ब्लॉग वर टाकणार आहे… पुढच्या भ्रमंतीच्या वेळी काही मित्रांसोबत दिशादर्शक  लावण्याचा विचार  करतोय मदत मिळाल्यास उत्तमच !! तसेच गडावर सेवाभावी संस्थाना करण्यासारखी बरीच कामे आहेत त्यावर पुन्हा कधीतरी योग जुळून आल्यावर…. !!!
 असो एकंदरीत आवडलेल्या ठिकाणांच्या पंक्तीत वरचं  स्थान मिळवलेला हा प्रबळगड एकदातरी पाहावा असाच अहे.

Comments

Popular posts from this blog

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

शाळा- मंतरलेले दिवस

झपाटलेला ट्रेक