हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.

हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने. 
टंक लेखनाविना बरीच हस्तलिखिते पडून होती आज लक्ष गेले न इरीलाच पेटलो…घेतलाना भो टायपायला. ;)
असो,
 सह्याद्रीच्या मुख्य रंगांपासून थोडी वेगळी झालेली हरिश्चंद्र- बालाघाट रांग, यामध्ये असणारा हा गड व तो सर्व भटक्यामध्ये  प्रसिद्ध करणारा सह्याद्रीने प्रसवलेले रौद्र भीषण अस सौदर्य प्रदान झालेला कोकणकडा ,  महाराष्ट्रतील सर्वोच्च शिखरांपैकी एक असे तारामती शिखर. या सर्व गोष्टीं पाहण्याची, जगण्याची एक अनामिक ओढ आंतरिक ओढ इच्छा नसेल असा गिर्यारोहक मिळणार नाही. माझ्याही मानगुटीवर हे भूत होताच कि.!!!! मध्ये मध्ये google map वर satellite mode  ताकाने तहान भागवत होतोच. आणि याच धामधुमीत आबासाहेबांचा मेसेज आला "गडवाट आयोजित हरिश्चंद्रगड"  येतोय का ??? योग जुळला. मी निघालो. !!
            या गडाला बुरुज, तटबंदी, तोफा यासारखी दुर्ग सौदर्याची आभूषणे दिसणार नाहीत पण याचा इतिहास मात्र २००० वर्षापुर्वीपर्यंत घेऊन जातो. राजा हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास, चांगदेव या ऐतिहासिक लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या गडाला लाभली आहे.
       गडाचा विस्तार तसा खूप मोठा. त्यामुळे  आपसूकच वाटाही खूप गडाला. खिरेश्वर - टोलार खिंड, पाचनाई या सर्वश्रुत परिचयाच्या पूर्वेकडील तुलनेने सोप्या वाटा पूर्वेकडेच ठेऊन आम्ही पश्चिमेकडील नळीच्या वाटेने जायचा बेत केला व उतरण भरीस भर म्हणून तितकाच अवघड साधले घाटमर्ग. व्वा… !!! मेजवानी तर भन्नाट होती वwhatsapp वर मिटक्या मारता मारता प्रत्याक्ष तव मारण्याचा दिवस आला आणि सुरु झाला एक marathon ट्रेक . माझी तर bike ride  हि Marathon झाली होती कारण हि तसच होत, रात्री १०;३५ सांताक्रूझ मधून  दिप्याची Unicorn घेतली., सांताक्रूझ ते कल्याण या मार्गाचा काहीही गंध नसताना Domestic Airport वरून  जीतुदाला Pickup करून साकीनाक्यावर बापू पवार चा नकार घेऊन, पश्चि- पूर्व उपनगरे पालथी घालत कांजूर-मुलुंड-तीनहात नाका-ठाणे-भिवंडी बायपास- दुर्गाडी-कांदा-लसुन-कल्याण अस करत १२;३० ला कल्याण गाठलं. तिथ आधीपासूनच ताटकळत उभे असलेल्यांनी मी दिसताच क्षणार्धात आपापल्या गाड्या मुरबाडच्या दिशेने फेकल्या, एकूण ७ दुचाक्यांचा आमचा ताफा त्या नगर रोड वर मध्यरात्री सप्तर्षी तारकासमुहाप्रमाणे झळकू लागला,मुरबाडच्या पुढे टोकवडे हा आमचा पहिला थांबा होता, तिथे बस ने आलेल्यांना tripsy घेऊन घेऊन पुढील नियोजित प्रवास होता.
त्या किर्रर्र ज्झादीतून जाणार्या रस्त्यात मध्यरात्रीच्या वेळी भयाण शांतता कापत गाड्या आडव्या तिडव्या झापझुप  करत  मार्गक्रमण चालू होत. या रस्त्याचे वैशिष्ठ म्हणजे कावळा बसायला पण पथ दिवे नाहीत पण ठेचेला गतिरोधके!!याच्या आठवणी जीतुदा च्या मनावर/तनावर चांगल्याच कोरल्या गेलेत ;) असाच एका गतीरोधाकाने मला सरळ कोकणकड्याला जाऊन धड्कल्याची जाणीव करून दिली होती,,,,,असो ,, !!!
आदल्या रात्री कराड-मुंबई प्रवास व आजचा ५ तासाचा यामुळे गलितगात्र झालेला मी मागे तिसरा कोण आहे हेही माहित नवते सिद्धेश होता नंतर कळले . मोरोशीवरून डावीकडे जायचे होते पण झापाझुपगिरीच्या नादात समोरच्याच्या पृच्छदिव्याकडे पाहत सच्या व स्नेहल अगदी माळशेज घाटाला भिडले,आबाने वेळीच मला रोखण्यात यश मिळवल्याने माझा माळशेज घाट हुकला :( तब्बल पाऊन तासाने हि स्वारी चहा मारून परत आली आणि आम्ही शेवटच्या टप्प्यातील ८ किमी चे अंतर पार करून बेल्पद्यातील वेळीवारे या गावी दाखल झालो. तातडीने कामादादाच्या घरी सामसूम झालो.
५;३०ला उठलो, अगदी थंडगार हवेत, सह्याद्रीच्या कुशीत, कोकणकड्याला खेटून वसलेले त्या गावाचे सौंदर्य न्याहाळत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटू लागल. गावांत झुन्झुमुन्झू झाल, पाखरांची किलबिल, माणसांची शेतावर जायची लगबग पाहत असतानाच अजस्र सह्याशिखारांचा पट हळूहळू उलगडू लागला व लक्षात आले रात्रीच्या त्या किरर्र जंगलातील खाचखळग्याच्या वाटेने आपल्याला सरळ कोकणकड्याच्या पुढ्यातच आणून सोडलाय. तारामतीसह रोहिदास शिखर आपल्या इतर साथीदारांसह आपापली करवतीसारखी शिखरे आकाशात खुपसून निवांत असलेली दिसत होते तर नजर नळीच्या वाटेचा शोध घेत होती पण अजूनही तिने आपली ओळख दाखवली नव्हती. ती वाट कुठेतरी कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असणार याचे अंदाज बांधतच नाष्टापाणी उरकून प्रतक्ष चढाईला सुरुवात केली हवेतील गारवा, समोरून कोकणकाड्याचे व उजविकडून रोहिदास शिखराचे प्रेरणास्थान याचा एकत्रित परिणाम म्हणून आम्ही जोशातच नदीतील मोठमोठ्या शिळा पार करत किंबहुना उड्या मारतच म्हणा ९ ला नळीच्या वाटेच्या तोंडाला आलो. आघाडीवरून टीम कामादादा तर पिछाडीवरून टीम विठ्ठल नेतृत्व करत होते…!
1. 
आता इथून पुढचा प्रवास खरा नळीच्या वाटेने होता, नळीची वाट म्हणजे काय ???? तर २ कड्यांमधून जाणारी चिंचोळी वाट. उजवीकडे १८०० फुटाचा उभा कोकण कडा तर समोर ३०/४०अंशातून जाणारी उभी चढण तीही जवळ जवळ १००० फुटाची सह्याद्रीमध्ये क्वचितच अशी सलग उभी चढण आढळेल कारण हि वाट कोकणातून सरळ घाटमाथ्यावर जते. इथून पुढे वाट घासार्याची होत जाते, तर चढण खडतर,,,!!


2. सदरहु ब्लोग लेखकाची एक दुर्मिळ छबी 

३.समिर 

४, सिद्धेश 

५. 

६. free climber सुरज 
! काही वेळातच आपण एका प्रस्तारापाशी (Rockpatch )येतो, वाटेतील हे पहिले प्रस्तरारोहण (climbing )इथ २० ते २५ फुटाचे साधे प्रस्ताराहोण करावे लागते, जवळ रस्सी (rope) असावीच,, ! आम्ही मात्र काहीजणांनी मुक्त प्रस्तरारोहणाचा (free climbing) आनंद घेतला, ;) 
सूर्यदेव माथ्यावर येउन आग ओकाण्याच्या तयारीत होतेच त्यामुळे पाण्याच्या बाटल्या खाली करत आपण जवळ जवळ मध्यावर आलेले असतो ,दोन्ही बाजूना प्रचंड उंच कातळ कडे, माकडांनाहि धडकी भरेल असे कोरीव कडे जणू काही आपणास गिळंकृत करतायत कि की अशा अविर्भावात उभे. तर पाठीमागे उजवी नळी जी माकडनळ म्हणून ओळखली जाते. ती अतिप्रचंड अवघड या सदरात येते.  
एका अवघड patch वर रोहिणी 
    नळीची वाट ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो प्रकार एव्हाना सुरु झालेला असतो (वरीलफोटोतील रोहिणीच्या धडपडीवरून लक्षत येईलच )समोर उभी चढण त्यात मोठ मोठे कडे आपल्याला खिजवायला आ वासून पुढ्यात उभे। !!!! पाय ठेवलेला दगड निसटेल कि हातात पकडलेला  हातात येईल काही नेम नसायचा. जराशी चूक उरत धडकी भरवायची, चूक झालीच तर सरळ जिथून आलो तिकडेच मध्ये आधी थांबा नाहीच !!
             जस जस वर चढू तस एक एक पाऊल आपणास आणखी अवघड वाटेवर आणून ठेवत असे, आणि हाच तो थरार आहे ज्याच भूकेला गिर्यारोहक असतो. ;) 'वाट लागणे' हा वाक्प्रचार या वाटेतूनच प्रसवला असावा असाही विचार मनाला चाटून गेला !! एव्हाना सर्व द्विपाद प्राण्यांनी चातुष्पद्गिरी चालू केलेलीच होती. छायाचित्रकारांची विविध कोनासाठी चाललेली फोटोग्राफी दिसून येत होती. यामध्ये राहूल आघाडीवर होता. 
     इथून पुडे थोड वर आल्यावर वाट दुभंगते व एक उजवीकडे तर एक डावीकडे जाते उजवीकडे वर काहीही दिसत नसल्याने आपण डावीकडे कूच करतो व काही वेलची चढाई कुचकामी ठरून आपण परत उतरतो व उजवीकडे जातो (एक अनुभव )  अ सर्वात अवघड टप्पा अत्यंत अरुंद जागा खाली नजर जाईल तिथेपर्यंत खोल दरी उजवीकडे कातळ कडा तर डावीकडे निव्वळ दगड धोंड्यांची उतरण,

८. दुसरा rockpatch 
अशा या खतरनाक घळीत गिर्यारोहणाचे सर्व कसब पणाला लाऊन चढाई करावी लागते एवढे दिव्य पार करून आपण एका छोट्याच पण अवघड अशा प्रस्तारापाशी येतो रस्सिशिवाय काम होत नाही इथे. एक एक मावळे स सर सर वर चढू लागले (८ न छायाचित्र )खाली रांगेत बसलेले वर चढनार्यांची लटकेगिरी पाहत होते. व स्वताचाही नंबर येणार  हे आठउन आवंढा गिळत असणार नक्कीच !!!!!!
      मी सुरुवातीस चढून आल्याने वरून निवांत पाहण्याची मजा घेत होतो. इथला थरारक गम्मत तर वेगळीच, इथून वर चढून आलेला कार्यकर्ता त्याला नीटसा बसून आराम करायलाही एका अवघड प्रस्तरला वळसा घालून जाव लागते व नळीची वाट कधी विसरणार नाही याची जाणीव ठेवून पलीकडील नाळीत चढून जावे लागायचे, इथ एक मस्त सावली देणार टिकण आहे. इथ आपले बरेचसे कष्ट संपले असे वाटते कारण आपण जवळ जवळ  वर पोहोचलो असतोच. इथे साधले घाटातून आलेली वाट मिळते. व आणखी एक rock patch वाटेत हजर.
9. shevatch tappa 
चिढून चवताळून तो पार करून आता आपण थेट हरिश्चंद्र गडावर पोह्चल्याच्या आनंदात उड्या मारण्याचा मोह आवराव लागतो कारण आणखी १ rockpatch जरास मध्यम श्रेणीचा पण कोकण कड्यावरून खाली आपला देह कुठे पोहचू शकतो हे LIVE दाखवणारा आहे. जिकिरीने ते कार्य उरकले व सरळ कोकण कड्याच्या मुखाशी अवतीर्ण झाल्यासारखं झाल. दूरवर पसरलेलं सह्यमंडळ, ती भव्यदिव्य शिखरे, विराट खोली, खोलगट आकाराचा अंतर्गोल कोकण कडा, चाहु बाजूंची सुप्तावस्थेतील पर्वतराजी … वाह !!!!! निव्वळ अप्रतिम …. !! एवढ सह्याद्रीच सौदर्य पाहायच, अनुभवायचं असेल तर अशा नळीच्या वाटा धुंडाळाव्या लागतातच …
अडवा करून पहा ;)
४ वाजले होते सलग ९ तासांची चढाई झालेली, कड्यावर निशब्द होऊन मन:शांती होईपर्यंत, शांत चित्ताने मंद डोळ्यांनी ते चित्र मन:पटलावर कोरून हरिश्चन्द्रेश्वरच्या मंदिराकडे निघालो. तहान भूक तर विसरली होतीच पण झोपायची जम इच्छा होती. 
       मंदिर परिसर अभ्यास व निरीक्षण हा कार्यक्रम उद्यावर टाकून एका गुहेत जागा मिळवली व पुन्हा डोम्बाच्या मंदिरापाशी एका टेकडीवर मी, सुरज, राहुल, समीर गप्पांत रंगून गेलो इतक्यात जेवण तयार झालेले वृत्त आले. सोबतच रोहिणीनेजेवण  बनवण्यास चिक्कार मदत केल्याच खात्रीलायक वृत्त होत ;) ८ वाजता हा कार्यक्रम आटोपले व त्या duplex गुहेत जे अग्निकुंड  होत त्यामध्येच आग पेटउन त्या तांबड्या पिवळ्या मंद प्रकाशात सचिन, आबासाहेब, देवा, अनिकेत, सुरज, शंकर बापू, जीतुदा,अशा दिग्गजांसोबत वैचारिक जुगलबंदी सुरु झाली. ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक, जातीय-आंतरजातीय, राजकीय, शैक्षणिक तसेच संघटनात्मक विचारप्रवाहिक , बखर-कादंबऱ्या ते दिल्ली निर्भया - आतपासून इतपर्यंत असे एक वैचारिक चर्चासत्र झडल, व त्या चांगदेव गुहेत गपगार झालो … क्रमश ;
       त्या चांगदेव गुहेत झालेली झोप कोणत्याही आलिशान शयनगृह पेक्षा नक्कीच छान होती.पहाटे थंडगार वाऱ्याने जाग आली. संधिप्रकाशत हरिश्चंद्रेश्वर मंदिर उजळून निघाले होते। बाहेर थोड़ा फेरफटका मारला, उत्कृष्ट बांधकाम शैलीमध्ये हरवून गेलो. मध्यभागी शिवलिंग दोन्ही बाजुंना नंदी  एक छोटा  मोठा, पश्चिम बाजूला चांगदेव गुंफासमूह, प्रत्येक गुहेच्या अथवा लेण्याच्या प्रवेशद्वाराखाली अतिशय ठण्ड आशा पिण्याच्या पाण्याचे टाके, दक्षिणेला दोन मंदिरे तिहि खोदीव व् आखीव रेखीव,  या सर्वांच्या उत्तरेकडून केदारेश्वर मंदिर किंवा गुहेकडे जाणारा मार्ग व् मंगळगंगा नदीचे उगमस्थान, अन पूर्वेला या सौंदर्यलेण्यात येण्यासाठी एक बांधीव प्रवेशद्वार. पूर्वेला बरेचश्या दगडी मूर्त्या व् भग्नावस्थेतील शिल्पे, व् तय बाजूला पुष्करणी तलाव तलवाच्या दक्षिण तीराला कही कही बंधिव देवदया आहेत बजुलाच जमिनीखाली आणखी एक गुम्फामूह आहे, या एकंदर परिसरात काही शिलालेख दिसून आले (बहुदा ८ होते) पैकी चाँगदेवगुहेतील शिलालेखावर चांगदेवानी या गुहेत बसून 'तत्वसार' ग्रंथ लिहल्याचा उल्लेख अहे. तर 'नंदतुतस्तसुतुविकटदेउ' हा शिलालेख ७०० वर्षे जूना आहे. पुढे तारामती शिखराच्या उत्तर उतारावर ४ मोठ्या गुहा आहेत त्या गणेशगुम्फ़ा या नावाने ओळखल्या जातात।
       मुख्य  हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला थोड़े खाली उतरून गेल्यावर वैशिष्ठ्यपुर्ण अशी केदारेश्वराची गुहा  त्यामध्ये साधारण ४ फुट पाण्यात  असणारे शिवलिंग, साधारण ३०*३० फुट प्रचंड सभागृह कृती गुहेत मध्यभागी  शिवलिंग आहे, याला ४ खंबानी  आधार दिलेला दिसतो  पण यातील एकच खांब आपल्या प्रचीनतेची साक्ष देत  उभा आहे.
१० केदारेश्वर 
केदारेश्वर पाहून आपण पुन्हा आलेल्या वतीने वाटेने बालेकिल्याकडे जायचे  शेवटी राहते ते तारामती शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांपैकी एक. इथून उत्तरेला कळसूबाई, रतनगड ,कात्राबाई खिंड तर तर दक्षिण-पश्चिमेला माळशेज घाट,सिद्धगड, आजोबा, नाणेघाट, इ. चे स्पष्ट दर्शन घडते।

११ हरिश्चंद्रेश्वर मंदिर 

१२ 
तारामती शिखरावर  एक उत्तुंग भगवा फडकवून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला,,,,,
१३ तारामती शिखरावर एक उत्तुंग भगवा लावताना गडवाटकरी  
पश्चिमेकडील वाटेने पुन्हा कोकणकड़ा डोळ्यात साठवून नळीची वाट दावीकडे ठेवून साधले घटाची वाट तुडवायला सुरु केली, ही वाट नलीसारखी अवघड नसली तरी थकवणारी आहे जंगल संपताच कलाडगड उजवीकडे ठेऊन एका निमुळत्या खिंडीपाशी पोहोचलो. नळीच्या वाटेसारखेच दोन्ही बाजूला खडे पाषाण, काही साधे patch पार करून घात तर उतरलो पण नंतर बेलपाडा हे गाव मृगजळा प्रमाणे भासू लागले, कित्येक मैल रान तुडवला तरी गावाचा मागमूस लागत नव्हता. हरिश्चंद्रची दाहकता इथे स्पष्ट होते.
बेलाग आणि अफाट या शब्दांतही अचूक पकडणे या गडाला शक्य नाही , मग केव्हातरी ४ वाजता गावात पोहोचलो व एक भला मोठा ट्रेक संपत आला होता. सह्याद्रीतून परतताना अंत:करण जड होत होते, खूप काही शिकऊन अनुभव देऊन सह्याद्री पुन्हा एकदा खुणावत होता, याच विचारचक्रात असतानाच समोर आलेल पिठलं भाकरीच ताट कांद्यासह कधी फस्त झालेलं समजलाच नाही !!!



१४ साधले घाटातील एक कातळी दृश्य 






१५

व सरतेसामयी कोकणकड्याला राम राम ठोकून  गाड्या चालू केल्या व वेल्हिवरे-मोरोशी-टोकावडे-मुरबाड-कल्याण-ठाणे-मुंबई पोहोचलो एकदाचं !!!!
RIDERS 
       संयमी  वाचनाबद्दल धन्यवाद :) :) 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

शाळा- मंतरलेले दिवस

झपाटलेला ट्रेक