Thursday, 23 November 2017

सफर मेघालय

सफर मेघालय

शान्य भारत तसा पर्यटन दृष्ट्या समृद्ध असला तरी पर्यटकांच्या नकाशावर मेघालय हेच प्रामुख्याने येत असत. आणि ते गैर हि नाहीये कारण मेघालय राज्य आहेच तसे. त्यामुळेच तर मेघालयाला  माझ्या ३ भेटी झाल्या आजपर्यंत. प्रत्येक भेटीत रा राज्यात मला नवीन काहीतरी गवसत असतं. मग पुन्हा पुन्हा भेटीची ओढ.

आमचा चमू
      'अल्टिमेट हायकर्स आणि ट्रॅव्हलर्स' आयोजित 'ऑफ बिट मेघालय' हि नोव्हेंबर ची बॅच यावेळी मी घेऊन गेलेलो. ३१ ऑक्टोबर ला सर्वजण गुवाहाटी येथे भेटलो. कामाख्या स्थानकातून मला पिकअप करून ड्राइव्हरसहित मी विमानतळावर आलो. बाकी सदस्य तिकडेच भेटणार होते. जिमभाई हा आमचा सारथी त्याच्या lodgy या गाडीसह  ८ दिवस सारथ्य करण्यास समर्थ. लगेचच मेघालयाकडे कूच केली वेळ घालवणे इकडे महागात पडू शकत, कारण दिवस ४:३०वा च मावळतो. वाटेतच एक शुद्ध शाहाकारी हॉटेलवर दणकून खाऊन घेतले कारण असे पुढे भेटेल न भेटेल खात्री नसते. मेघालायची हद्द सुरु होते तीच मुळात घनदाट जंगलात झाकोळलेल्या डोंगरांनी. रास्ता वेडीवाकडी वळणे घेत खासी टेकड्या चढू लागतू, हवेत गारवा वाढत राहतो आणि काहीच वेळात एक भला मोठा जलाशय ओलांडून आपण शिलाँग मध्ये प्रवेश करतो आणि थंडीने उचांक गाठलेला असतो मस्त वाफाळलेली कॉफी घेऊन थेट वेळ न दवडता थेट बांगलादेश सीमेवर असणारे डावकीच्या जवळ थोडे वरच्या बाजूला 'शनॉन्गडेंग' येथे 'उमङोत' नदीच्या किनारी बांबूच्या घरात मुक्कामी पोहचतो
. एव्हाना ओळखी झालेल्याच. डॉ. रवींद्र बागूल व रेखा बागूल, रवींद्र शेलार व कल्पना शेलार, पुण्याहून अश्विनी पेंडसे व मी असा आमचा छोटासा चमू, नदीकिनारी डोंगरउतारावरील सुपारीच्या वेढ्यात वसलेल्या टुमदार गावातील एका लाकडाच्या घरात मस्त गरम गरम दाळ भात भाजी खाऊन झोपी गेला .

लाकडाची घरे


कॅम्प site

बांबूची घरे

 खरंतर सकाळी उठल्यावर कळालं कि आपण किती नयनरम्य परिसरात रात्र घालवलेली आहे. घरातून समोरच दिसणारी संथपणे  वाहणारी उमङोत' नदी तिच्या विस्तारलेल्या पात्राचं झालेलं तळे तेही इतका स्वच्छ कि पाण्यात आपल्या प्रतिबिंबाऐवजी थेट तळ च दिसावा. ! उत्तरेकडून वाहत येणारा अवखळ प्रवाह दक्षिणेकडे सीमावर्ती भागात काहीसा संथ होतो व पाणी एवढे नितळ होते कि जणू काचेचा थर च अंथरलाय आणि त्यावरून बोटी चालू आहेत कि काय.  वाह्ह काय वर्णावा महिमा!
Umngot River

बोट ride

Umngot river झुलता पूल

               थंडी कितीही असली तर पाण्यात उतरण्याचा मोह आवरता नाही आला, पण तिथे एक अट  आहे तुम्ही कितीही मोठे पाणीपट्टू असा, अगदी इंग्लिश खाडी पोहून जलसम्राट का असेना इथे तुम्हला लाईफ जॅकेट घालूनच पाण्यात उतरण्याची अनुमती मिळते. हा नियम स्थानिकांना लागू नाही.   पाण्यात येथेच्छ डुंबून नंतर बोटिंग करून नदीच्या प्रवाहा विरुद्ध एक मोठा फेरफटका मारून  लगबगीनेच तमाबील येथे पोहोचलो . भारत बांगलादेश यांच्यातील रस्ते यामार्गे व्यापार या चेकपोस्ट वरून चालतो. AH१ हा हा महामार्ग येथून बांगलादेश ला ढाका पर्यंत जातो. आता सीमेवरील चेकपोस्ट म्हटलं कि BSF आलीच. आणि भारतीय आर्मी च्या  भारतातील  कोणत्याही चेकपोस्ट वर जावे आणि मराठी जवान भेटला नाही ऐसे होणे नाही. साताऱ्याचे सुपुत्र ड्युटी वर तैनात होते.
भारतीयांचे भारत भूमीवर स्वागत
                भेटून छान वाटलं गप्पा झाल्या आणि आम्ही आमच्या मार्गाला लागतो. वाटेत डावकि येथील भारत बांगलादेश ला जोडणारा लोखंडी पूल लागतो. इथून दोन्ही बाजूचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडेल असाच. इथून पुढे आले कि शिलाँग कडे जाण्यासाठी २ रस्ते फुटतात एक सीमावर्ती भागातून तर एक थोडासा उजवीकडून पठारावरून जाणारा. आम्ही बोरहिल्स धबधबा पाहण्यासाठी खराब असूनही सीमावर्ती रास्ता निवडला व तो पाहून मावलीनॉन्ग ला आलो. हा बोरहिल्स धबधबा तोच ज्यामध्ये ७१ च्या युद्धात एक लढाऊ विमान कोसळले होते व ते अजूनही तेथेच आहे. २ टप्प्यात कोसळणाऱ्या या धबधब्याच्या सर्वात वरच्या टप्प्यावर या विमानाचे अवशेष दिसतात , यावेळी वेळेअभावी वरती गेलो नाही.
 आशिया खंडातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव असा लौकिक मिळवलेले हे मावलीनॉन्ग गाव. छोटंसं टुमदार खेडे, जणू एखादा पार्क च ! प्रत्येक घर कसे आटोपशीर, स्वच्छ, फुलझाडांनी वेढलेलं कुंड्यानी सजलेलं जणू  एखाद्या शुभकार्याचें चैतन्यच  ल्यायलेलं आहे.गावाच्या बाहेर एक मस्त देवराई आहे. इथून  तासभर चालत गेल्यावर एका कड्यावर जातो आपण इथे मुळांच्या शिड्या पाहायला मिळतात पण हाताशी  वेळ हवा. कड्यावर उगवलेल्या झाडांच्या मुळ्या मोठ्या कल्पकतेने एकमेकांत गुंफून खाली शिड्या करून सोडल्या आहेत 
                या चैतन्यपूर्ण वातावरणाचा मोह सोडून आम्ही पोहोचलो नोहवेट या अडवाटेवरील गावी. इकडे सहसा कोणी नसतं, इथे एका व्यक्तीने १०वर्षे कष्ट घेऊन रबराच्या झाडावर बांबूचा पूल बांधून बांबूचाच मनोरा उभा केलाय. पाहण्यासारखं ठिकाण. त्यातील एक मनोरा घनदाट झाडीतून थेट दरीच्या तोंडावरच घेऊन घेतो तर दुसरा एका उंच झाडावर घेऊन जातो इथून दूरवर बांगलादेश चा सपाट मैदानी भूभाग पाहता येत तर उजवीकडे पेनुर्सला चे पठार व खाली कोक्सर नदी. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला अर्ध्या तासाच्या अंतरावर एक मुळांचा पूल आहे, हा मेघालयातील सर्वात मजबूत पूल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हत्ती चालत गेला तरीही तुटणार नाही अशी पुस्ती स्थानिकांकडून जोडली जाते. हा तो आहे  जो रिवाई  वरून सर्व जण जातात आम्ही उलटे कामे करणारी लोक. आम्ही हा पूल पाहायला कमी वर्दळ असणाऱ्या वाटेने जातो.
मुळांचा मजबुत असा पूल टॉप विव्ह मध्ये

रबराच्या झाडावरील बांबूचे मचाण
      आता आमची गाडी अगदी सीमावर्ती भागात असलेल्या नॉन्ग्जरी या गावाकडे धावू लागली. हे तेच गाव जिथे आम्ही मार्च मद्ये ५ दिवस राहिलो होतो. सुमित लकीआंग ने स्वागमोठ्या दिमाखात पार पडले त केले त्याच्याच घरी मस्त खिचडी भात कल्पना काकी व अश्विनीताईंनी बनवला.
चुलीवर खिचडी भात बनवताना शेलार दाम्पत्य
त्याचेही घर लाकडाचेच एकदम उबदार. मस्त झोप लागली. सकाळी उठून एका मोठ्या साहसी मोहिमेवर जायचे होते. क्रेम २लिंपुट ७ किमी लांबीची नैसर्गिक गुहा. खाच खळग्यांचा ७किमीचा  रस्ता १०० मिनिटात पार करून पोहोचलो BSF  ने बनवलेल्या दुर्गम रस्त्यांपैकी हा एक. इकडे बरच दळण वळण ट्रेक रूट नेच होत असल्याने हा रास्ता फक्त मिलटरीच्या वाहनांना पुरेल असाच ओबड धोबड आमच्या जिमभाऊ ने त्याची कार या रस्त्यावर चालवून स्वतःच्या काळजाच्या चिंधडया उडवून घेतल्या असंच म्हणावं लागेल कारण खालून उडणारे आणि चिसी वर खाणकनं आपटणाऱ्या दगडांचा आवाज कोणत्या कारमालकाला सहन होईल? हा पठ्या त्यापलीकडील सर्व्हिस महत्वाची हा अप्रोच घेऊन व्यवसायात उतरलेला तरुण इथे चन्गलाच भाव खाऊन गेला. सुमित आणि बिडास हे स्थानिक एका नदीजवळ उतरले व आम्ही परत येईपर्यंत मस्त नदीकिनारी खिचडी भात तयार. १ तास गुहेतील दुनिया अनुभवून नदीवर  वनभोजन मोठ्या दिमाखात पार पडले.


गुहेचं अंतरंग

नदीकाठीचे दिमाखदार वनभोजन
संगणक शिक्षकांना हस्तांतरित करताना
आता लगबगीनेच परतलो सोबत नेलेला संगणक सर्व शिक्षकसमवेत शाळेला दिला,  मुलांना नाव MS वर्ड लिहायला दिले त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून केलेल्या कामच चीज झालं. पुण्याच्या अमिता बेहेरे यांनी घरातील एक संगणक या कामासाठी आम्हाला उपलब्द करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी. त्यांच्या मुळे  येथे आनंदाचे क्षण आम्ही वेचू शकलो. लगेचच मुक्कामाच्या ठिकाणी निघालो माझा मित्र मॉर्निंगस्तार वाट पाहत होताच सोबत पाहू तरुण मंडळी पारंपरिक खासी वेशभूषा करून स्वागतासाठी तयारच होते. आम्हा ६ लोकांसाठी शाळेच्या आवारात स्थानिकांनी एक मस्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला सगळा गाव पाहायला जमलेला. भारीच फील होत ते सर्व. मग सर्वांसोबत सामहिक नृत्य हि झालं बागुल सरांनी हि एक मस्त  हिंदी गाणे गाऊन मेहफिल चांगलीच रंगवली. एका गावकऱ्याच्या घरात मस्त प्रीतिभोजन करून निद्रिस्त झाले.
बागूल काका गायन करताना

पारंपरिक वेशभूषेतील स्वागतकार


बांबू चे मचाण
         दुसऱ्या दिवशी सकाळी ३  जणांनी शाळेत काही गप्पागोष्टी संगीत खेळ याद्वारे मुलांना आपलेसे केले  तर मी व शेलार दाम्पत्य जवळील जंगलात ट्रेक ला गेलो घनदाट जंगल, खळाळत्या नद्या विविध फुले वनस्पती इ. ने समृद्ध जंगल पाहताना भलतीच मजा येत होती सिकड्याचा आवाज तर अगदी मेंदूत घुसत होता या किड्याचा आवाज ३००/४०० मीटर पर्यंत अगदी घंटेसारखा कानात घुमत राहतो. जवळच नदीपात्रावर मस्त धबधबा होता चूल पेटली पटेल ठेवलं गेलं, कॅमेरा बाहेर निघाला, दोघांनी मस्त बांबू तोडून त्यापासून लगेचच कप व चमचे बनवले मस्त गरमागरम सूप suuuup करून गट्टम गेले नि परतलो, जेवलो आणि चेरापुंजी मुक्कामी.
        दुसऱ्याच दिवशी जागतिक वारसास्थळांच्या यादीत नाव मिळवलेला, मेघालयाची ओळख ठरलेला दुमजली मुलांचा पूल पाहायला गेलो शेकडो पायऱ्या उतरून खोल दरीत नोंग्रीयात या गावात हे आश्यर्य दडलंय. हा दुमजली पूल पाहण्यापेक्षा तिथपर्यंत पोहचण्याची जर्नी भारी मजेदार वाटते, छोटी खेडी, मुबलक फ्लोरा फौना, स्वच्छ पाण्याच्या नद्या, झुलते पूल लोखंडी पूल. असा बराच मसाला या ट्रेक मध्ये   मिळतो. परतीच्या वाटेवर असताना एका पर्यटकाला हार्ट चा त्रास जाणवू लागला, जवळील स्थानिक युवक जमले उचलून वरती न्यायचे ठरले पण नेणार कसा ? साहित्य जमवा जमाव झाली बांबू न गोणपाट बस, ते स्थानिक युवक गोंधळलेले दिसताच मी पुढाकार घेतला कारण जर त्यांच्याकडे आपल्यापेक्षा उपाय हि असू शकतो. उगीच पुढे पुढे करून एखाद्या कामात आपला अढथळा नको !! पण जेव्हा माझी खात्री पटली माझ्या माहितीच्या इथे उपयोग होऊ तेव्हा मात्र क्षणाचाही विलंब न करता मी अगदी मजबूत असा स्ट्रेचर बनवला त्या व्यक्तीला मदत करू शकलो. (फोटोत पहा )
संध्याकाळी इको पार्क पाहून सोहरा येथील स्थानिकांसाठी भरणारा बाजार अनुभवला विविध स्थानिक फळे, भाज्या,लोणची. औषधी जडीबुटी, सुपारी, तांबूल, नाना तर्हेच्या वस्तूंची देवघेव पाहून हॉटेल वरती परतलो. आता पुढच्या दिवशी आणखी एक विशेष अनुभवणार होतो ब्रिटिशकालीन डेव्हिड स्कॉट ट्रेक हा ४ तासाच्या ट्रेक म्हणजे निसर्गप्रेमींना एक पर्वणीच, पाईन .फर, च्या जंगलातून जाणारी वाट, कधी नदीकिनारीवरून तर कधी डोंगर सोंडेवरून आपल्याला फिरवते, एक दोन खेडी लागतात, निवांत पणे  खासी लोकांच्यात मिसळण्याचा अनुभव या ट्रेक दरम्यान नक्की घ्यावा.
बांबूचे कप बनवून सूप पिताना ब्लॉग लेखक व स्थानिक

मुळांचा दुमजली पूल

नमुना

घटपर्णी

तहान भागवण्याचा नैसर्गिक मार्ग

निशब्द
             पॅराडाईज या आमच्या स्थानिक गाईड ने विविध पाने फुले, ऑर्चिड्स, यांची छान पणे ओळख करून देत असल्याने ट्रेक मध्ये चांगलीच रंगत आलेली. ब्रिटिश अधिकारी डेव्हिड याने आसाम ते बांगलादेशातील सिल्हेट हि गावी जोडणारा एक रस्ता तयार केला, नंतर तो घोडे जातील एवढा रुंद केला तब्ब्ल २१० किमी चा मार्ग आज बराच मुजलेला न नष्ट झालेला आहे पण याचे काही टप्पे मात्र जे अजूनही शाबूत आहेत ते आपण ट्रेकिंग करता पाहू शकतो त्यापैकीच एक तुकडा म्हणजे मावफलांग ते लाडमावफलांग हा १६ किमीचा टप्पा. लाड म्हणजे जंकशन. या १६ किमी चा ट्रेक आपल्याला मेघालयातील फ्लोरा फौना चा खूप जवळ नेतो. कमी अधीक चढ उत्तर, स्वच्छ निर्मळ नद्या, विविध फळझाडे, प्राणी, पक्षी, फुले, अर्चिड्स इ . अगदी मसालेदार मिश्रण म्हणजे हा ट्रेक. ४/५ तासात आपण मावसिंराम रस्त्याला लागलो कि समजायचे ट्रेल संपली. उजवीकडील मावफलांग धरणाचा जलाशयच विहंगम दृश्य सर्व थकवा बुडवून टाकतो पाहावा असाच नजारा.
                            दरम्यान बागुल काका काकी ट्रेक ऐवजी मावफलांग येथील देवराई येथे  फेरफटका मारायला गेले. दुपारी सर्व एकत्र येऊन शिलॉंग कडे रवाना झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्ड्स लेक जवळ सर्वानी खासी वेशभूषा परिधान करून उत्तमोत्तम फोटो काढले आणि लगेचच बागुल सरांचे विद्यार्थी जे आता शिलॉंग मध्ये वनस्पतीशास्त्र विभागात वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत त्यांना भेटून, एलिफन्ट फॉल्स हा एक प्रसिद्ध धबधबा पाहून पुढे शिलॉंग पीक वरून संपूर्ण शहराचं १९००मीटर्स उंचीवरून दिसणारे विहंगम दृश्य पाहण्यात भलतीच मजा आली. दुपार झालेलीच आता सर्वात महत्वाच काम बाकी होत ते म्हणजे खरेदी! २तास सर्वानी तुंबळ खरेदी करून आपापल्या बॅगा भरून ठेवल्या ते थेट दुसऱ्या दिवशी विमानतळ गाठायचा तयारीनेच.!
दिवस आठवा, गुवाहाटी मध्ये लछित बरफुकन यांचे ब्रह्मपुत्रा नदीतील स्मारक पाहून कामाक्षी मंदिरात कामाख्या देवीचे दर्शन घेऊन गुवाहाटी विमानतळावर एकमेकांना निरोप देऊन एक भन्नाट प्रवास तळहातावर नव्या आठवणी ठेऊन भूतकाळात जमा झाला.

पण विषय इथे संपत नाही,
      ट्रिप संपली तरी मी ४दिवस हाताशी राखून ठेवलेले, शिलॉंग येथे होणारा चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल २दिवस व काही अपरिचित ट्रेक्स २ दिवस. एकटाच होतो. पण मला एकट्याला तिकडे फिरू देतील ते भाऊ कसले ?? ७ तारखेला गुवाहाटीला आला तब्बेत ठीक नसतानाही. त्यामुळे ट्रेक रद्द करून आम्ही नॉन्ग्जरीला गेलो मस्त सुमोच्या टपावरून प्रवास करत नॉन्ग्जरीला दाखल झालो वांगटगेंन सर यांच्या घरी जेवन  गप्पा रंगल्या.
दुसऱ्या दिवशी शाळेत मस्त छोटेखाणी कार्यक्र्म घेतला गेला आमचं स्वागत विद्यार्थिनींनी  म्हणून ओल्या सुपारीच्या माला आम्हला घातल्या. काही क्षण अनमोलच  असतात त्यापैकी हे काही क्षण होते. दुपारीनंतर पुन्हा शिलाँग. चेरी ब्लॉसमचे काही कार्यक्रम पहिले . सेवाभारतीच्या कार्यालयात मुक्कामाची सोय असतेच :)
दुसऱ्या दिवशी सकाळी स्कुटर घेऊन स्मीत ला जाऊन आलो स्मित येथे खासी राजाचे पारंपरिक घर आहे, आजही परंपरा पाळली जाते उत्सव होतात संस्कृती टिकवून ठेवण्याची धडपड तिथे मात्र उठून दिसते.
संध्याकाळी पुन्हा शिलाँग पुन्हा फेस्टिवल, आज मात्र विषय वेगळा. नॉर्थ ईस्ट ची सुंदरी कोण याचा निकाल लागणार होता, १८ सौंदर्यवतींनी आमच्यापुढे त्यांच्या अदाकारी आमच्यासमोर पेश केल्या :D आमच्या वतीने  जज  मंडीळीनी एक मस्त बाणेदार युवती निवडली पण तिच्या आखीव रेखीव सौंदर्य मनात साठवताना नाव मात्र विसरून गेलो. ८ वाजलेले आता पोटातून संकेत मिळू लागलेले बाजूला फूडफेस्टिवल्स मध्ये असंख्य स्टॉल्स लागलेली मनसोक्त खाद्यान्न चाखून या निर्णयावर पोहचलो कि 'घरी जाऊन शंकरपाळ्या खाल्ल्या असत्या तरी या पेक्षा मज्जा अली असती.. !

                                                                                                                                   योगश आलेकरी
                                                                                                                                    ९७०२५२५४३५

अधिक ची छायाचित्रे
सदरहू ब्लॉग लेखकाची समोरून घेतलेली छबी

तीच आपली मस्त वाली कॅम्प साईट

नमुने

अनमोल क्षण

बोटिंग बोटींग

असा हा फक्कड बेत

नालंग्रे गेस्ट हाऊस चेरापुंजी

सेल्फी स्टिक चा झुगाड

डेव्हिड स्कॉट ट्रेक दरम्यान एका मुलीची समाधी

लछित बरफुकन यांचे स्मारक

कामाख्या मंदिर गुवाहाटी

टपावरून हवेत

ईशान्य भारतातील संस्कृती

प्राचीन दगडी पूल (डेव्हिड स्कॉट ट्रेक)

ग्रामीण जीवन (डेव्हिड स्कॉट ट्रेक)

चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल मधील काही सुरेख क्षणचित्रे

मुलांसोबत खेळ  खेळताना अश्विनी ताई



किती ते स्वच्छ सुंदर पाणी 

 साहसी प्रवासी

राजाचे पारंपरिक घर

चेरी चे मनमोहक फुले

आपला ट्रायपॉड न बाजूला शिजत असलेल सूप
वॉर्ड्स तळ्याचं सौंदर्य

डेव्हिड स्कॉट ट्रेक मधील निवांत पण

क्षार जमा होऊन झालेल्या आकृत्या (स्टेलाग्माईट)

चुनखडीचे गुहा

गुहेचा अंतर्भाग

... वाच्यसंयमाबद्दल धन्यवाद ....

No comments:

Post a Comment

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...