एक दिवाळी सैनिकांसोबत
THE TEAM |
इंडो-चायना बॉर्डर वरील गुरूडॉग्मार सरोवर जे जगातील अतिउंचीवर व अतिशीत सरोवरांपैकी एक व त्यापासून काही अंतरावर असणारा झेरॉ पॉईंट जिथे रास्ता संपून डोंगरापलीकडे तिबेट ची भूमी लागते, कटाव युमथँग व्हॅली आणि सीमेवर तैनात भारतीय सैन्यांची सोबत. अशा या थरारक वातावरणात या वर्षीची दिवाळी अल्टीमेट हायकर्स & ट्रॅव्हलर्स साजरी करण्यात आली. आणि याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला व टीम ला लाभलं.
दरवर्षी प्रमाणे अल्टिमेट हायकर्स तर्फे उत्तर पूर्व भागात कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम आयोजित केले जातातच , गतवर्षी प्रजासत्ताक दिन अरुणाचल मधील तवंग जवळील बूम ला सिमेवर साजरा करण्यात आलेला तर त्याआधीच्या वर्षी मेघालयात वनवासी लोकांसोबत होळी चा सण साजरा केला गेला होता. त्याचबरोबर शिवजयंतीला डिजिटल शाळा बनविण्याची धडपड समूहातर्फे वेगवेगळ्या शाळांना डिजिटल साहित्य वाटप करून चालू आहे. तर यावरवर्षीच्या दिवाळी साठी उत्तर सिक्कीम निवडण्यात आले आणि विषय होता 'एक दिवाळी सैनिकांसोबत' झालं !! सर्वजण तयारीला लागले १० जण आणि ५ रॉयल एन्फिल्ड हिमालयन बाईक्स सिलिगुडीतून घेण्यात आल्या, आमच्या उपक्रमात सहभाग नोंदवत मुंबईतील महर्षी दयानंद विद्यालयातून १०० ग्रीटिंग्स मिळाले,
M.D COLLAGE PAREL |
तर भोर जवळील पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे या शाळेतील विद्यार्थ्यांनी हि खूप सारी शुभेच पत्रे दिली, सिद्धिविनायक मंदिरामधून प्रसाद व श्रींच्या प्रतिमा मिळाल्या. कोलकात्यातून अनिलदादानी एक मोठा बॉक्स मिठाई हावरा स्थानकात आणून दिली. आता हे सर्व साहित्य आम्ही घेऊन चाललो इंडो चायना सीमेवर उत्तर सिक्कीम भागात.
कोलकाता येथे अनिल दादा यांनी मिठाई चे बॉक्स दिले |
सिलिगुरीतून ५ दुचाकी घेऊन १० भटके गंगटोक च्या दिशेने झेपावले. योगेश आलेकरी - शैलेश कदम, विषांत वचकल - अमोल लिमन, वैभव बांदल- तुषार दुधाने, सुनील जाधव- रोहित तुपे, महेश आरोटे - संतोष जुगदर. अशा जोड्या दुचाकी दामटत होत्या.
टीम अल्टीमेट |
सेवोक चा कोरोनेशन ब्रिज पाहून सकाळीच आम्ही तासाभरातच ६००० फूट उंचीवरील गंगटोक ला पोहचलो. तिथे ब्लॅक कॅट च्या आर्मी संग्रहालयात न्याहारी करून लागणारे सर्व परवाने घेतेले जे कि आधीच मित्राने तयार करून ठेवलेले, गणेश टोक ला जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरु झाला उंची बऱ्यापैकी असल्याने हवेत प्रचंड गारवा जाणवत होता, जाणारा नागमोडी रास्ता कपात ५ वाजता मांगन ला पोहचलो, उत्तर सिकींम भागात प्रवासाला निघताय तर लक्षात ठेवा मंगन हे पेट्रोल मिळण्याचे शेवटचे ठिकाण आहे. इथून प्रत्येक गाडीसाठी ८ लिटर या हिशोबाने ४० लिटर पेट्रोल कॅन मध्ये भरून घेणे गरजेचे होतच.
रात्री ८ ला चुंगथांग चेकपोस्ट परवाने दाखून झाले, सर्व सोपस्कार पार पडल्यावर त्या मेजर साहेबाना मिठाई आणि शुभेच्छा पत्रे दिले . क्षणभर ते फक्त त्याकडे पाहत राहिले डोळ्यांच्या कडा पाणावल्या, आमहीं सर्व शांतच. शांतता भंग करत ते बोलते झाले - "माझी मुलगीही अकरावी ला आहे तिला हि असे ग्रीटिंग्स बनविण्याचे वेड आहे. पण आता ती कॉलेज साठी कोलकात्याला वसतिगृहात राहते आणि ६ महिने गाठभेट हि नाहीय झाली, दिवाळीत ती सुट्टीला आलीय पण मला सुट्टी नाही. तुमच्या रूपाने तीच ग्रीटिंग्स बनवून आलीय माझ्यासाठी असं च काही क्षणांसाठी वाटलं मला" !! आम्ही स्तब्ध झालो. केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखं वाटलं . एक कडक सलाम ठोकून त्या बापलेकीच्या नात्याचा विचार करत करत कधी मुक्कामाच्या जागी - लाचेन ला पोहचलो समजलेच नाही.
एक दिवाळी सैनिकांसोबत |
आमचा ताफा |
रॉयल लोकांच्या रॉयल गाड्या |
भल्या पहाटे उठून आता १७१०० फूट उंचीवरील गुरुदोगमार सरोवराकडे जायची तयारी झाली. तापमान उणे ४ पर्यंत सरकलेल. लाचेन ते गुरुदोगमार ६८ किमी अंतर. ट्री लाईन संपवून आता थंगु व्हॅली या,मध्ये दाखल झालो, विरळ हवा, बर्फाच्छादित शिखरे, खुरटी झुडपे असा परिसर बदल झालेला दिसून येऊलागला . ३५ किमी वर थंगु चेकपोस्ट ला परवाने दाखवले व आर्मी कॅन्टीन लाच गरमगरम चहा घेतला, उन्ह पडू लागलेली, हवेत प्रचंड गारवा होताच. आणि मजल दरमजल एकदाचे गुरुदोगमार ला पोह्चलोच. इथून पुढे सर्व रेताड वाळवंटच दिसते ३हि बाजूला बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले हे तळे सिक्किमी जनता याला खूप पवित्र मानते. हिवाळ्यात हे सरोवर पूण[अणे गोठलेळेच असते. याच्या मागच्या बाजूस माऊंट स्वन्गचेन्गहावो व चोमो योमो या बर्फाच्छादित शिखरांमुळे गुरुदोगमारच्या सौंदर्यात भरच पडली आहे. बाजूलाच इथे एक गुरु पद्मसम्भव यांचे एक छोटे मंदिर व सर्वधर्म प्रार्थनास्थळ हि आहे.
Team ultimate at #Gurudogmar lake |
इथे जास्तीत जास्त २० मिनिटे थांबावे अशा सूचना सैन्याकडून दिल्या जातात कारण अतिशय विरळ हवा असल्याने ऑक्सिजन ची मात्रा खुपच कमी आहे.
We are at 17300 feet #Gurudogmar lake |
मनसोक्त फोटोग्राफी केल्यानंतर परतीला सुरुवात झाली, थंगु चेकपोस्ट ला ठरल्याप्रमाणे थांबलो छोटेखानी कार्यक्रम करून शुभेच्छापत्रे कॅम्प मध्ये दिली, सर्वानी मिळून सिद्धिविनायकाच्या प्रसादाचा आनंद घेतला. त्यांच्या आनंदात भागीदार होता आले याचा समाधान घेत आम्ही उतरायला लागलो, ५ वाजता लाचेन आले. न्यहारी करून आता दुसऱ्या टोकाला असलेल्या लाचेन कडे प्रयाण केले आता पुढचा ३ तासाचा प्रवास हा अंधारातूनच होता. वाटेल पुन्हा चुमथांग लागले रात्री पुन्हा काही काही फौजी मित्र भेटले. त्यापैकी औरंगाबादचे एक होते.
चुंग थांग चेकपोस्ट |
इथेही त्यांच्या परवानगीने आयत्या वेळी एक छोटासा कार्यकेम पार पाडून पुढे निघालो. लाचुंग गाठले
ला चुंग म्हणजे छोटी खिंड २६८४ मीटर्स उंचीवरील हे एक विकसित होत चाललेलं गाव बरीचशी वस्ती भुतिया जमातीची. चू नदीच्या कधी वसलेले हे एक सुंदर गाव आहे, इथे एक निवांत मुक्काम करावाच
लाचुंग पासून २४किमी वर युमथँग खोरे आहे हे झेरॉ पॉईंटच्या जरा अलीकडे येते , दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही तिकडे प्रस्थान केलं. हा प्रवास भलताच नयनरम्य !! रस्त्याच्या दुतर्फा ऱ्होडोडेंड्रॉन आणि विविध प्राकाराच्या आर्किड च्या रंगाच्या रांगा दिसूनयेतात. हे युमथँग खोरे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणूनही ओळखले जाते. वसंत ऋतूत येथे अतिउंचीवर फुलणाऱ्या विविध रंगांच्या ऱ्होडोडेंड्रॉन, चिमल, आणि निळ्या रंगाच्या पॉपीज फुलांचा अक्षरशः सडा पडलेले दिसून येतो. पण हे सौंदर्य अनुभवताना दुचाकी वर असाल तर कमालीची काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते कारण रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा रात्रीच्या थंडीने बर्फ झालेला असतो आणि त्यावरून गाडी हमखास घसरतेच. आम्हाला सर्वाना एकेका झाऱ्याने बर्फाचा प्रसाद दिलाच ! तुम्ही कितीही काळजी घ्या एखादा पारदर्शक बर्फाची लादी घात करतेच.
वाटेत एक सिक्कीम पोलीस ची चेकपोस्ट लागते
इथेही परवाने दाखवावे लागतात आणि पुढे एक मोठा वरच्या दिशेने घेऊन जाणारा घाट चढलो कि आपण येतो ते झेरॉ पॉईंट ला. इथे रास्ता संपतो म्हणून झेरॉ पॉईंट. छोटासा पाठार १२ महिने बर्फात असते चू नदीचा उगम बहुदा इथलाच !!
इथेही ऑक्सिजन ची मात्रा कमीच आहे त्यामुळे आपल्या हालचालीवर मर्यादा येतात.तरीही आम्ही उत्साही तरुण- येथेच्छ मौजमस्ती केली याचे परिणाम हि भोगावे लागलेच आम्हाला.झेरॉ वरून परतीचा प्रवास चालू असताना वाटेचं मध्येच मला झोप आली तिकडे कानाडोळा करून प्रवास चालूच होता पण एके ठिकाणी मात्र झोपेने उग्र रूप धारण केले आणि क्षणात मला जाणीव झाली हि झोप नसून ऑक्सिजन कमी पडल्याचा इशारा आहे क्षणाचाही विलंब न करता गाड्या बाजूला घ्यायला लावल्या कारण सर्वाना हि नक्कीच हा त्रास होत असणार ताबडतोब सर्वाना झोपण्याची आदेश दिले झोप अली असो व नसो या स्थितीत शरीराला अराम मिळून जास्तीत जास्त ऑक्सिजन आत घेणे गरजेचे होते त्यासाठी सर्व शारीरिक हालचाली शांत असणे गरजेचे असते. आणि काय आश्चर्य पुढच्या १ मिनिटात सर्व जण गाढ झोपी गेले सुद्धातब्बल अर्ध्या तासाने सर्वजण शुद्धीवर कम जागे झालो. सर्वजण टवटवीत झालेले आता वेगात च सर्वानी पुढचं अंतर कापायला सुरवात गेली रात्री ९ वाजता गंगटोक ला पोहचलो. आता कुठे सर्वजण निवांत पणा अनुभवत होते, रात्री मस्त MG मार्ग ला फेरफटका झाला गप्पा रंगल्या.
सकाळी ब्लॅक कॅट संग्रहालयात शेवटचा आर्मी सोबतच कार्यक्रम आटोपून गाड्या सिलिगुडीकडे धावू लागल्या.
आणि एक अविस्मरणीय दिवाळी सार्थकी लागलीच आनंद अनुभवाच्या झोळीत जमा झाला
योगेश आलेकरी
९७०२५२५४३५
Yogesh sir lovely post. We remembered our ride done in 2015.
ReplyDeleteमस्त लिहलय
ReplyDelete