फल्लूस - भूतनीज परंपरा
चौंक गाये ????
लाजू नाका 😃 हे भूतान मध्ये नॉर्मल आहे.फल्लस म्हणतात याला. पुरुष जननेंद्रिय.
कुनले द्रुकपा या साधू ने 16 व्या शतकात फर्टिलिटी या विषयावर अभ्यास करून त्यामध्ये बरीच जागृतकता निर्माण केली. लोकांच्या मनातील taboo नाहीसा केला.५०० वर्षांपूर्वी भूतानी संत द्रुकपा कुणले ह हे ,मानत होते कि संभोग मधून मोक्ष प्राप्ती होते
असेही म्हणतात कि या संताने ५००० स्त्रियांशी संभंध ठेवले होते. यांचा जन्म १४५५ मध्ये पश्चिम तिब्बत मध्ये झालेला.
आणि मानवी वंशाचा कणा म्हणून लिंग पूजा सुरू केली.
अशी पेंटिंगस घरावर चित्रित करणे म्हणजे शुभ चिन्हे समजली जातात. वाईट शक्तींपासून घराचे रक्षण होते अशी इथली धारणा. अगदी सर्रास मुली देखील गळ्यात, अंगठी मध्ये फल्लस प्रतिकृती अभिमानाने घालून मिरवतात. चिमी गावात तर सर्वाधिक प्रमाणात अशी पेंटिंग्ज आढळतात. इथे एक मंदिर आहे यामध्ये लिंग पूजा होते.
ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी इथून आशीर्वाद घेतल्यास पुत्रप्राप्ती होते असे म्हणतात. आणि लोक लांबलांबून येतात ही.
अजूनही बरीच माहिती देऊ शकतो पण शब्द मर्यादा आणि विषय व्याप्ती टाळण्यासाठी इथे एवढंच...!! 😃😄😄
आणि हो,
भारतातील असम येथील गुवाहाटी मध्ये कामख्या एक शक्तीपीठ आहे तेथे योनी ची पूजा होते दोन्हींमधील अंतर 500km असेल. मदन कामदेवाची ही कामभूमी . त्याबद्दल ही एक पोस्ट करेन 😊
(टीप- like आणि शेयर केल्याने तुम्हाला कोणी अश्शील समजणार नाहीत. जे समजतील त्यांनी समजून जावं आपण खूप मागास विचारसरणीत जगतो आहोत.)
#Ultimate_Travellers. #Travelstories
No comments:
Post a Comment