Saturday, 11 January 2014

सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग -१

भाग - २  साठी       
साहसी खेळ खेळणाऱ्या गिर्यारोहकांना व निसर्गसौंदर्यावर लुब्ध असणार्यांना आपल्या सह्याद्रीसारखा जिवलग नाही. या सह्याद्रीच्या गिरीशिखारावरील किल्लेकोट म्हणजे आमच्या आनंदाचे खजिनेच. असाच एक खजिना लुटण्यासाठी गडवाट परिवाराकडून नाशिक जिल्ह्यातील किल्ले हरिहर गड, अंजनेरी व रणधुरंधर रामसेज अशा भ्रमंतीचे नियोजन करण्यात आले. चाकोरीबाहेरील दुर्गभेटी हे गडवाट परिवाराने जपलेले वैशिठ्यच आहे, कारण "इये "इये दुर्गाचिये नगरी, बहुत किल्ल्यांचा सुकाळ" असे वैभव असताना त्याच त्याच चाकोरीत का राहावे?? "नित्य नूतन हिंडावे!" या उक्तीप्रमाणे आमचे गिरीभ्रमण चालणार होते. अन असेही डिसेंबर संपत आला तरी मुंबईतील थंडीने थंडीची भूक काही भागवली नव्हातीच. तशी मागच्या रविवारी ढाक बहिरीच्या वनात रात्र गवतात झोपून काढावी लागल्याने भूक भागली होतीच. (नव्हे जिरलीच  होती ;) :p )…तसे नाशिक म्हंटले कि गार गार वारा, सह्याद्री, सातमाळ, नद्या, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिकता व धार्मिकता यांचा सुरेख मिलाप अन त्यातही सोबत गडवाटची म्हणजे दुग्धशर्कराच. गडवाट सोबतचा trekk चुकवणे म्हणजे मी अक्षम्य अपराध च मानतो त्यामुळेच प्रचंड अडचणींचा सामना करत जायचं नक्की झालच. आदल्या रात्री bag pack करते समयी घरातून विरोधाच्या वावड्या उठल्या, नाराजीचे सूर उमटले, निषेधार्ह वल्गनाही झाल्या पण मी मात्र माझ्या उद्धीष्टापासून यत्किंचितही ढळलो नाही. (निर्लज्जम सदासुखी अस काहीतरी genral मराठीत म्हणतात)… ही चकमक संपवली व सकाळी मटरेल पाठीला बांधून ६ ला दादरला आलो. मी जर उशीरच पोहचलो(नेहमीप्रमाणे ) बाकी दादरला येणारे आलेलेच होते तपोवन एक्स्प्रेस आली तुफान गर्दीशी सामना झाला परिणामी बसलेल्या प्रवाशांना इगतपुरीपर्यंत standing ovation द्यावी लागली।
           ठाणे, कल्याण ला उर्वरित मंडळी चढली त्यानाही तेच भाग्य !त्यातही रोहीनीने डब्यात चांगलाच कल्ला केल्याच ऐकल…इगतपुरीमध्ये उतरलो नेहमीच्या  आनंदभुवनमध्ये गरमा गरम मिसळ व फक्कड चहा झाला. नाशिककर  स्वागताला तयार होतेच ईश्वर् दादा,अमितदादा सचिन दादा ज्ञानेश भाऊ यांनी छान व्यवस्थापन केल होते, त्यानुसार २ महिंद्र pickup ने आम्ही बराचसा प्रवास करून वैतरणा धारणाचा शांत शीतल जलाशय  मागे टाकून कोटमपाडा या हरिहर गडाच्या पायथ्याच्या गावात १२:३०  च्या  सुमारास  दाखल झालो.  खानेसुमारी करुन trekk  चे नियोजन, नियम अटी, मार्गदर्शक सूचना सुहास ने केल्या व लगेचच विक्रांत च्या खर्ड्या आवाजातील गारद झाली. शिवगर्जनेने अंगभर शहरे आले होते अंगात एक जोश आला  होता त्या जोशातच जोशातच आम्ही गडाकडे कूच केली .आदिवासी गाव व भात शेती मागे टाकत आम्ही झापा झप मार्गक्रमण करत होतो. एक छोटे खाणी ओढां पार करून  प्रत्यक्ष डोंगर चढाईला सुरुवात झाली झाडा-झुडपातील वाट असल्याने उन्हाचा तसा त्रास नव्हताच। मध्ये मध्ये झाडांच्या कवडश्यातून नजर थेट हरिहर गडाच्या कातळभिंतीवर जाऊन थडकत होती तर कधी कधी त्या गडाच्या सर्वोच्छ माथ्यावरील भगवा खुणावत होता, तसे तिथे पाय ठेवण्यासाठी मन अधिकच उतावीळ होत होते.
एक चढण  पार झाल्यावर क्षणभर विश्रांती घेऊन पुढे सरसावलो काहीच वेळात एका सपाटीवर  फासलेले काही अनामिक देव दिसले. त्या देव दरबाराने क्षणभर का होईना पण लक्ष वेधून घेतल. तिथून पुढे मोठमोठ्या दगडी शीला उजव्या हाताला ठेऊन चालत राहिलो अन त्या ऐतिहासिक ,रौद्रसुंदर, निष्ठुर रानटी इंग्रजांच्या हृदयालाही पाझर फोडणाऱ्या कातळ कोरीव पायर्यांपाशी पोहचलो. गड त्रिकोणी आकाराचा असून तिन्ही बाजूंनी  २०० मीटर  तशीव कड्यांमुळे अधिकच भक्कम व अभेद्य वाटतो…थोडा वेळ नजरेत तो नजर साठवून  सरळ सरळ आम्ही त्या कातळ कड्यातील दगडी शिडीला भिडलो. निसर्गातील रौद्रतेला मानवी कलाकृतीने सुंदर रूप दिल्याने इथे एक रौद्रसुंदर नजराणा  आपल्याला पहायला मिळतो. ती २००फुट उंच वाट चढल्यावर दोन आखीवरेखीव बुरुजामध्ये बसवलेला दरवाजा  स्वागताला तयारच असतो. त्यातून आत प्रवेश करते होताच उजव्या बाजूच्या सुबक गणेश मूर्तीला नकळतच हात जोडले गेले.
      तिथून पुढील दुष्य तर त्याहून मनोहारी, पुन्हा दगडात खोदलेले एक  भुयार आपणास पुढे घेऊन जाण्यास सज्ज असते. उजव्या बाजूला कातारलेला कातळ वर दगड अन् डाव्या बाजूला २०० फुटाची सरळसोट दरी अशी या भुयाराची रचना. मनपटलावर ती आकृती साठवतोय तोच समोर आणखी एक नागमोडी वळणाची शिडीची उभी चढण. चढण खडी. पाठीमागे २०० फीत खोल दरी, या patch मध्ये मला तर फक्त माझा जीव अन् पुढील पायरी एवढच दिसत होत बाकी जग शुन्य!!(तस न करतो तर प्रकाशवेगाने पायथा गाठला असता :p ) इथेही दगडी पायऱ्यांमध्ये  असल्याने चढण थोडी सुकर होते. दगड फटीतून असे बोटे अडकून वर जात असताना नराचा वानर होतोच ;) :) पुढे आणखी एक दरवाजा पार करून आम्ही गडाच्या पठारावर पोहचलो, तो पठारी वारा अंगाला झोंबताच एक नवे चैतन्य निर्माण झाले. "जीव भांड्यात पडणे" या म्हणीचा प्रत्यय इथे आल्यशिवाय होत नाही. सार्वजन सुखरूप आल्यानंतर पुढे आम्ही सरकलो समोरच पाण्याच्या काही टाक्या होत्या पण पाणी पिण्यायोग्य नव्हते, त्यापुढे एक तलाव व हनुमान मंदिर दिसले समोरील शिवलिंग विनाछतच होते. मुख मार्जिन केले भुकेची जाणीव झालेली, तसे मन त्या चढण प्रकारात जाणीवेच्या पलीकडे    गेलेलेच पण आत्ता मात्र जाम भूक लागलेली. नाशिककरांनी गडाच्या पूर्व टोकावर भोजनव्यवस्था ठेवलेली ४ च्या सुमारास उतरणीचे उन अंगावर घेत गोल करून जेवायला सार्वजन बसले 

No comments:

Post a Comment

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...