Saturday, 11 January 2014

सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग - २

बरीच पायपीट झाल्याने भुकेने सार्वजन व्याकूळ झालेले. अन् जेवणाचा मेन्यु पण भन्नाट होता चपाती, टोमाटोची व बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, पापड, लोणचे व महाभयंकर असा हिरव्या मिर्चीचा ठेचा बस् !!!!! भुकेचा तडाखा एवढा मोठा होता कि, अर्धे पोट भरल्यावर सर्वांच्या संवेदना जाग्या झाल्या व ठेच्याची जहालता जाणवली. हाsss हुssss श्श्शssss हुश्यss अशा उद्गारांनी गाझाब माजवला. डोळे तोंड नाक पाणीदार झालेले ;) त्या धुमश्चक्रीत ठेच्याची झळ बसलेल्यान्साठी दोन ओळी -                                                    
                   भाजी एवढा ठेचा
                   कधीच खायचा नसतो
                   बिघडलेल्या सिस्टीम चा दोष
                  वाढणाऱ्यावर लादायचा नसतो !!

   हालचाली मंदावल्या होत्यच. घासांची वारांवारिताही न्यूनतम पातळीवर स्थिरावली होती, इतक्यात राजू सर दत्त म्हणून उभे राहिले अन् तब्बल अडीच किलो पेढे बाहेर काढले व वाटप सुरु केले. ठेच्याच्या आगीवर पेढ्याची फुंकर  मनाला दिलासा देणारीच ठरली राजू सरांचे पेढ्या पेक्षा गोड शब्दात कौतुक करून तो रसभरीत भरगच्च कार्यक्रम आटोपून गडाच्या शिखराकडे कूच केली. वाटेतच एक ३०×२० ची बंदिस्त इमारत लागली. गडावरील एकमेव छत असलेली व राहण्यायोग्य वास्तू. जाता जाताच राजू सारणी छायाचित्रणातील काही बहुमुल्य कानमंत्र  दिला. संक्या खुश. अन् तसाही दिवसभर संक्याचा DSLR व रोहिणीचा दुबईचा कॅमेरा यांचीच चर्चा होती. असो.गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलोही आम्ही खुओ थंड वारा झोंबत होता अंगाला. ११३० मीटर उंची असलेला हरिहर, इथून सह्य्द्रीची खूपच उदात्त रूपे दाखवत होता. पूर्वेला भ्रम्हगिरी, त्रिंबक रांग, अंजनेरी पर्वत. दक्षिणेला दूर कुठेतरी कळसुबाई, त्रिंगलवाडी, सोबत अनामिक पर्वत राजीची वर्दळ होतीच. या ठिकाणीही काही अनामिक देव शेंदूर फसलेले दाटीवाटीने बसलेले होतेच वर भगवा अखंड फडकत होताच. खरेतर कळसुबाई शिखरावरून धुक्यामुळे     जे काही अपूर्ण राहिला त्याची पूर्तता हरिहरि गडावरील या टोकाने केली.  धन्य झालो. आनंदाची ओंजळ तुडुंब भरली होती. सह्याद्री ज्या ज्या गोष्टीसाठी वेड लावतो ते ते सर्व हरिहर वर मिळत. वर्षातील तिन्ही ऋतूत हरिहर गडावर यायचाच हा निश्चय करूनच गड उतरण्यास सुरुवात केली. वाट घासार्याची असल्याने काहींना भुई भेटही मिळाली. दरवाज्याच्या डाव्या बाजूला एक कैदखाना दगडात खोदला होता सुहास्कडून त्याची माहिती घेतली वव गर्दी झालेल्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो,गर्दी झालेली कारण वाहतूक मंद गतीने चालू होती, कारण हरिहर ची वाट सुंदर दिसत असली तरी वाट लावणारी होतीना.उतरताना चांगलीच कसरत करावी लागली. गडाची रचनाच अशी आहे कि, मुख्य दरवाजा बंद केला कि'गडावर प्रवेश केवळ अशक्य!! अशा या अभेद्य  गडच रूप ओजारत्या डोळ्यांनी मनी साठून उतरणीला लागलो. सूर्यास्त झाला होता. काही दमलेले तर काही अजूनही उत्साह टिकून होते. त्यातच आमचा एक शिलेदार खूपच थकला होता अक्षरश: चालेच अशक्य झालेले त्याचे मग काय सुहासराव आले घेतले त्याला पाठीवर अन् प्रवास चालू. जबाबदारी ती हीच. ७ च्या दरम्यान गावात पोहचलो सहाणे बंधूंनि गडाचा इतिहास अगदी मोजक्या शब्दांत मांडला. व कांटाळलेले सार्वजन मुक्कामासाठी त्रिंबकेश्वरला रवाना झाले. साधारण ३० कि मी अंतर असेल. तिथे एका प्रशस्त इमारतीमध्ये   तिसऱ्या माळ्यावरील ती शयनगृहे पाहून मन अगदी हेलावून गेले.भरुन आले. एका खोलीत आठ अशी पांगापांग झाली. जेवायला गेलो तर आणखी एक सुखद धक्का :* पुरी भाजी मसाले भात वाटच पाहत होता. ट्रेक च्या नियमात हे तास काहीच बसत नव्हत, उघड्या माळावर अथवा गुहेत मंदिरात धरणीमायचे अंथरून न अभाळ पंघारायची सवय असणारे आम्ही भटके, जीव गुदमरला या इमारतीत पण वेळेची गरज अन् नाशिकारांचे प्रेम पाहून स्वताला सावरले व "एन्जोय टू बी कंटिन्यू" म्हणत मस्त उशी घेऊन निद्रिस्त झालो :)             
        
       सकाळी ४ ला उठले व तब्बल २ तासाने तयार होऊन न्याहारीसाठी जमलो एवढा निवांत पणा प्रथमच मिळाला होता! त्या २ तासात प्रत्येक खोलीत खूपच नाट्यमय घडामोडी झाल्या ;) काहींनी पहिल्या, काहींनी अनुभवल्या :p (ठेचा म्याटर) असो. पोहे व चहा भरपेट हाणला व चौकातील शंभू महाराजांचे स्मरकाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. गारद देऊन महाराजांना मनाचा मुजरा करून किल्ले अंजनेरी ला प्रस्थान केले. साधारण १ तासातच   गडाच्या पायथ्याला पोहचलो. हनुमानाचे जन्म ठिकाण म्हणून याची प्रसिद्धी. पायथ्यालाच हनुमानाची पद्मासनातील भव्य अशा मूर्तीच मनोभावे दर्शन करून गडचढाई सुरु झाली.वन विभागाने बांधलेल्या पायऱ्या एका खिंडीपर्यंत घेऊन आल्या गच्च भरलेली ब्याग, पायात बुट्ट, हातात कॅमेरा  अशा वेशात छातीचा भाता खालीवर करत त्या खिंडीतील नळीच्या वाटेने वर जात असतानाच डाव्या बाजूला कातळात कोरलेली जैन लेनी पाहायला मिळाली,१०/११ जैन तीर्थकरांच्या मुर्त्या काही पद्मासनात तर काही उभ्याच होत्या. गावकरी याला पार्श्वनाथगुंफा म्हणून ओल्खत. पुढे ५ मिनिटातच पठारावर पोहचलो. अतिप्राचीन काळी इथे एक दरवाजा होता यावर विश्वासच बसणार नाही. या पर्वताचे पठार तसे विस्तीर्ण, सगळीकडे गवताचे साम्राज्य. कोणे एके काळी इथ अम्भीर नावाच्या राजाची राजधानी होती. चालता चालता अंजनी मातेच्या मंदिराजवळ आलो काहींनी तिथेच आराम ठोकला तर आम्ही काही जन पुढे चाललो. थोडासच वर चढल्यावर सगळा थकवा घालवणार' अस ते दृश्य- जांभळीच्या गर्द हिरव्या वनात एक निळाशार जलाशय अंगावर कोवळी सूर्यकिरणे घेत पहुडला होता. त्यामध्यें जलक्रीडा करण्याचा मोह टाळून त्याला वळसा घालून पुढे चाललो उजव्या बाजूला एका भग्न वाड्याचे अवशेष दिसले त्याचा अंदाज बांधत गाई-बैलांच्या कळपातून वाट काढत एका अश्रामाजवळ आलो. इथ अस काही पाहायला मिळेल यावर  विश्वासच बसेना!! गर्द हिरव्या वृक्षांची दाटीवाटी, निरव शांतता, किन् किन् घंटानाद करत रवंथ करणरे गाई-बैल, कफनी घातलेले शिष्य असा तो प्रपंच रामायणातील आश्रमच भासला. त्यातून वाट काढत थोड्याशा चढणीवर असलेली सितागुम्फा तर अप्रतिम नमुना. आत टोर्च मारून साप विंचू नसल्याची खात्री करून प्रवेश केला रामायणातील काही प्रसंग कोरलेले होते. काहींची पूजा झालेली होती. बर आज राम्सेज हि पाहायचा असल्याने ते सर्व तिथेच मागे टाकून पटापट उतरणीला सुरुवात केली.  जाताना जे जे मिळाल ते ते मन पटलावर पुनश्च : चक्षून घेत्ल. ती साधी वाटणारी पण सोपी नसणारी वाट उतरून जेवणासाठी पंचवटीला रवाना झालो (रोहिणी व विठल च्या फोटोसेशन मुळे अर्धा तास उशीर झाल तो भाग वेगळा :) :p) गाडीत मस्त झोप झाली. पंचवटीतील चौकातील शिवस्मारकाचे दर्शन घेतल. जेवण तयारच होत ते मिळमिळीत पंचपक्वान्न घरत असताना कालच्या ठेच्याची कमी मात्र जाणवली. जेवण आटोपून सुस्तीतच रामसेज गाठला

No comments:

Post a Comment